Breaking News

महत्वाच्या बातम्या

सावधान-एक अद्भुत कहानी चित्रपट प्रदर्शित

पनवेल ः वार्ताहर एनएसजी निर्मिती असलेला सावधान एक अदभुत कहानी हा हॉरर चित्रपट आज शुक्रवारी (दि. 26) ओरियन मॉल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शित झाला. यानिमित्ताने पनवेल ओरियन मॉल येथे विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमास उपस्थित असणार्‍यासाठी एक शो ठेवण्यात आला होता. तालुक्यातील एका स्थानिक निर्मात्याने नवेदित मराठी …

Read More »

पनवेल ः भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या वतीने शुक्रवारी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भाजपचे राष्ट्रीय सदस्यता सहप्रमुख डॉ. अरुण चतुर्वेदी, प्रदेश सचिव व सदस्यता सहप्रमुख संजय उपाध्याय आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण केले. या वेळी कोकण …

Read More »

कार्यकर्ता हाच भाजपचा विश्वास ः डॉ. अरुण चटर्जी भाजप सदस्य नोंदणी आढावा बैठकीला प्रतिसाद

पनवेल ः प्रतिनिधी आपल्या देशात सत्तेसाठी सर्व एकत्र येतात. पराभव झाल्यावर काँग्रेस पक्षाचे अनेक तुकडे झाले, पण भाजप हा सामान्य कार्यकर्त्यांच्या विश्वासावर चालाणारा पक्ष असल्याने त्याचे पराभव झाल्यानंतर तुकडे झाले नाहीत, असे भाजपाच्या सदस्यता नोंदणी अभियानाचे सहप्रमुख राजस्थानचे माजी मंत्री डॉ. अरूण चटर्जी यांनी पनवेल येथील सदस्य नोंदणी अभियानाच्या आढावा …

Read More »

आयर्लंड संघ 38 धावांमध्ये गारद

इंग्लंड : वृत्तसंस्था इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या इंग्लंडविरूद्धच्या कसोटी सामन्यात आयर्लंडच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. इंग्लंडने आयर्लंडसमोर 182 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडचा संपूर्ण संघ 38 धावांवर बाद झाला. विश्वचषक जिंकल्यानंतर अवघ्या आठवड्याभरात सुरू झालेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघाची दाणादाण उडाली होती. नाणेफेक जिंकून कर्णधार …

Read More »

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे लंगडी खेळाडूंना आर्थिक मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर अध्यक्ष असलेल्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे लंगडी खेळाडूंना आर्थिक मदत करण्यात आली आहे. मदतीचा धनादेश मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 26) खेळाडूंकडे सुपूर्द करण्यात आला. बॉक्स लंगडी असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने आयोजित स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून प्रथमच …

Read More »

बाद नसतानाही युवराजने धरला तंबूचा रस्ता

ओटावा : वृत्तसंस्था युवराज सिंग याने काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. निवृत्तीची घोषणा करतानाच त्याने देशांतर्गत ट्वेन्टी-20 स्पर्धेत आणि इतर लीगमध्ये खेळणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार निवृत्तीनंतर त्याने टी-20 कॅनडा या स्पर्धेतून पुनरागमन केले, पण निवृत्तीनंतरच्या पहिल्याच सामन्यात त्याचा ‘डाव’ फसला. आपण बाद झाल्याचे वाटून घेऊन तो बाद …

Read More »

बास्केटबॉल निवड चाचणी स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त बास्केटबॉल असोसिएशन ऑफ रायगडच्या वतीने 18 व 13 वर्षाखालील वयोगटातील मुले व मुली यांच्या जिल्हा निवड़ चाचणीचे आयोजन रविवारी (दि. 28) सकाळी  7.30 वाजता खांदा कॉलनी येथील महात्मा स्कूलच्या मैदानात करण्यात येत आहे. स्पर्धेत सहभागी होणार्‍या खेळाडू रायगड जिल्ह्याचा रहिवासी असावा किंवा तो शिकत असलेली शाळा, …

Read More »

शेवटच्या क्षणी दिल्लीची बाजी

क्षुल्लक चुकीमुळे थलायवाजचा पराभव इंदूर : वृत्तसंस्था अखेरच्या सेकंदापर्यंत रंगलेल्या सामन्यात तामिळ थलायवाजचा अनुभवी बचावपटू मनजीत छिल्लरने केलेल्या क्षुल्लक चुकीमुळे दबंग दिल्लीने प्रो-कबड्डीच्या सातव्या पर्वात आपल्या दुसर्‍या विजयाची नोंद केली. 30-29 अशा एका गुणाच्या फरकाने दिल्लीने हा सामना जिंकला. पहिल्याच सामन्यात विजयाची चव चाखलेल्या तामिळ थलायवाज संघाने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात आक्रमक …

Read More »

पेणच्या गणेशमूर्ती उरण बाजारपेठेत दाखल

उरण ः वार्ताहर उरण बाजारात पेणच्या सुप्रसिद्ध गणेशमूर्ती विक्रीस उपलब्ध झाल्या आहेत. सालाबादप्रमाणे जगे यांच्या श्री सिद्धिविनायक कला केंद्र येथे सुप्रसिद्ध व सुबक मूर्ती आल्या असून उरण शहरात विनीत आर्ट कला केंद्र, गणपती कला केंद्र, चिन्मय कला केंद्र, रिद्धीसिद्धी कला केंद्र, लंबोदर कला केंद्र, गणेश कला केंद्र, एकदंत कला केंद्र, …

Read More »

‘जनतेला चांगले प्रशासन देणे हे सरकारी कर्मचार्यांचे कर्तव्य’

अलिबाग : प्रतिनिधी शून्य प्रलाम्बिता (झीरो पेंडंसी) कार्यपद्धत ही चांगली संकल्पना आहे. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सरकारी कर्मचार्‍यांनी आपले कर्तव्य योग्यप्रकारे पार पडले पाहिजे. जनतेची कामे वेळेत पूर्ण करून चांगले प्रशासन देणे हे सरकारी कर्मचार्‍यांचे कर्तव्य आहे, असे मत भारतीय प्रशासन सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी चंद्रकांत दळवी यांनी येथे व्यक्त केले. …

Read More »