दोन आरोपींकडून चोरीची 10 वाहने हस्तगत पोलादपूर : प्रतिनिधी सातारा जिल्ह्यातील कोडोली परिसरात दोघा इसमांकडे चोरीची टूव्हिलर आढळून आल्यानंतर त्यांची पोलिसांनी झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडून तब्बल 10 वाहने हस्तगत करण्यात आली. त्यामध्ये पोलादपूर शहरातील चोरलेली नेक्सा बलेनो कारदेखील असल्याचे उघडकीस आले आहे. पोलादपूर शहरातील शिवाजीनगर येथील किराणामालाचे व्यापारी अभिजित मेहता …
Read More »महाडच्या ‘सिल्व्हालायकल’ला आग
बंद कारखान्यात रसायनाने भरलेले ड्रम, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष महाड : प्रतिनिधी येथील औद्योगिक क्षेत्रातील सिल्व्हालायकल या बंद कारखान्यात बुधवारी (दि. 10) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आग लागली. महाड एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी रसायनाने भरलेले ड्रम होते. आग आटोक्यात आली नसती …
Read More »नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट
रोजंदारी कर्मचार्यांना सेवेत कायम करावे पेण : प्रतिनिधी नगर परिषदेतील रोजंदारी कर्मचार्यांना सेवेत कायम करण्यासाठी पेण नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना तसे निवेदन दिले आहे. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, नगर परिषदेतील गटनेते अनिरुद्ध पाटील उपस्थित होते. पेण नगर परिषदेत अनेक कर्मचारी …
Read More »नागोठण्यात आदिवासींच्या घरांची दुरुस्ती
नागोठणे : येथील ग्रामपंचायत हद्दीतील मिरानगर आदिवासीवाडीतील हरिश्चंद्र वाघमारे आणि भिकी पवार यांच्या घरांची अतिवृष्टीमुळे पडझड झाली होती. या प्रकाराने त्यांना घरात राहणेसुध्दा जिकरीचे झाले होते. नागोठणे ग्रामपंचायतीच्या वतीने या दोन कुटुंबांच्या घरांची दुरुस्ती करून ती मंगळवारी सायंकाळी वाघमारे आणि पवार यांच्या ताब्यात दिली. या वेळी सरपंच डॉ. धात्रक, ग्रामविकास …
Read More »महाड पं. स. कार्यालयाचे झाले डबके
महाड : प्रतिनिधी ऐन पावसाळ्यात महाड पंचायत समितीच्या नवीन इमारतीची वाट बिक़ट झाली आहे. पावसाचे पाणी साचून परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरल्याने कर्मचारी व ग्रामस्थांना या कार्यालयात चिखल व गढूळ पाण्यातूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. महाडमध्ये 40 वर्षांपूर्वी बांधलेली पंचायत समिती कार्यालयाची जुनी इमारत धोकादायक झाल्याने तीन वर्षांपूर्वी या ठिकाणी नवीन …
Read More »खालापुरातील अंगणवाड्यांची दुरवस्था
नगरपंचायत-पंचायत समितीमध्ये तू तू मैं मैं; वीज-पाणी नसल्याने पालक संतप्त खोपोली : प्रतिनिधी नगरपंचायत आणिपंचायत समिती यांच्यातील समन्वयाअभावी खालापुरातील अंगणवाड्यांची दुरवस्था झाली असून, गळणार्या अंगणवाड्यांची दुरूस्ती, वीज आणि पाणी सुविधा पुरवा, असे सांगण्याची वेळ येथे येणार्या मुलांच्या पालकांवर आली आहे.खालापूर नगरपंचायत हद्दीत वाल्मिकवाडी, वनवे, खोडावाडी, शिरवलीवाडी, महड, निंबोडे, खालापूर एक …
Read More »शुभ वर्तमान! पनवेलचा पाणीपुरवठा होणार सुरळीत
पनवेल : बातमीदार दमदार पावसामुळे पनवेल महापालिकेच्या देहरंग धरणात सध्या पुरेसा पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे सहा महिन्यांपासून सुरू असलेला दिवसाआड पाणीपुरवठा बंद होऊन नागरिकांना आता दररोज पाणी मिळणार आहे. पाऊस असाच राहिल्यास शहराला नियमित पाणीपुरवठा करण्याचे महापालिकेचे प्रयत्न आहेत. पनवेल शहराला लागणार्या 26 एमएलडी पाण्यापैकी देहरंग धरणातून 12 ते 15 …
Read More »वीजपुरवठा सुरळीत ठेवरा
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे अधिकार्यांना आदेश पेणमधील मूर्तिकारांना दिलासा पेण : प्रतिनिधी गणेशोत्सव दोन महिन्यांवर येऊन ठेपला असून, गणेशमूर्ती घडविणार्या कारखानदारांचे काम जोरात सुरू आहे. ते लक्षात घेऊन पेण शहरासह तालुक्यातील वीजपुरवठा खंडित करू नका, असे आदेश रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत विद्युत पुरवठा अधिकारी पाटील यांना …
Read More »श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे वह्यावाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने बुधवारी (दि. 10) रायगड जिल्हा परिषदेच्या विचुंबे येथील शाळेत विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत गरीब, गरजू …
Read More »डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने दाखल्यांचे वाटप
उरण : वार्ताहर डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृती प्रीत्यर्थ डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सोमवार (दि. 8) उरण तालुक्यात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रतिष्ठानच्या वतीने समाजोपयोगी कार्यक्रम राबविले जातात. त्यापैकीच दाखले वाटप कार्यक्रम झाला. जेएनपीटी टाऊनशीप मल्टीपर्पज हॉल येथे विविध शासकीय दाखले यामध्ये ज्येष्ठ नागरिक व वय, अधिवास …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper