पनवेल : खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात रविवारी (दि. 16) सायंकाळी 5.30 वाजता यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग, रेल्वे आदी स्पर्धा परीक्षांचे मोफत सेमिनार आयोजित करण्यात आले आहेत. यावेळी प्रा. संजय हिरेमठ व इतर तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे. या सेमिनारचा लाभ बारावी ते पदवीधर विद्यार्थी घेऊ शकणार असून जास्तीत जास्त …
Read More »श्री समर्थ सद्गुरू दादामहाराज पुण्यतिथी सप्ताह
पनवेल : रामप्रहर वृत्त देवसागर साधक समाज (इंचगिरी संप्रदाय)तर्फे श्री समर्थ सद्गुरू दादामहाराज पुण्यतिथी सप्ताह सोहळा जय हनुमान मंदिर, न्हावा खाडी, उत्तरपाडा, ता. पनवेल येथे श्री. स.स. बाळासाहेब महाराज (नंदेश्वर) यांच्या उपस्थितीत होणार आहे. गुरुवारी (दि. 20) सकाळी 10 वाजता सोहळ्याला सुरुवात होऊन शनिवारी (दि. 22) दुपारी 12 वाजता माऊलींवर …
Read More »कराडे खुर्द ग्रा.पं. निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचे पारडे जड
रसायनी : प्रतिनिधी कराडे खुर्द ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत सरपंचपदाच्या उमेदवारीत तिरंगी लढत असून सरपंचपद हे अनुसूचित जाती महिला आरक्षित आहे. या निवडणुकीत भाजपच्या सरपंचपदाच्या उमेदवार भारती हेमंत चितळे व इतर प्रभागाचे उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील, असा विश्वास कार्यकर्त्यांना वाटत आहे. आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली, विभागीय अध्यक्ष …
Read More »प्रकल्पग्रस्तांच्या न्यायिक हक्कासाठी स्व. दि. बां.ची चळवळ सक्रिय करू या!
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे बैठकीत आवाहन पनवेल : प्रतिनिधी प्रकल्पग्रस्तांच्या न्यायिक हक्कासाठी दि. बा. पाटील साहेबांच्या आशीर्वादाने चळवळ सक्रिय करू या, असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पनवेल येथे आयोजित केलेल्या बैठकीत केले. जेएनपीटी व सिडको प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती च्यावतीने गुरुवारी (दि. 13) पनवेल येथील आगरी समाज हॉलमध्ये …
Read More »खासदार झालो तरी पाय जमिनीवरच ः श्रीरंग बारणे
खोपोली ः प्रतिनिधी पंचवीस वर्षे सामाजिक काम करीत असताना नगरसेवक ते खासदार झालो, मात्र या कालावधीत माझ्यात कुठलाही बदल झाला नाही, मी काल होतो आजही तसाच असणार आहे आणि आता पुन्हा खासदार झाल्याने माझ्यावरची जबाबदारी खूपच वाढली आहे. मावळ मतदार संघातील प्रश्नांची मला जाण आहे. मग ते पेण अर्बन बँकेचे …
Read More »नैनाच्या पहिल्या टप्यातील कामाचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ
पनवेल ः रामप्रहर वृत्त सिडकोच्या महत्वकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या नैना प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यातील रस्त्यांच्या कामांचे काल शुक्रवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते आणि सिडको अध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमीपूजन करण्यात आले. नैना प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील 23 गावांच्या पायलट प्रोजेक्टवर नैना प्राधिकरणने काम सुरू केले आहे. यातील …
Read More »जिल्हा नियोजन भवनाचे आज उद्घाटन
मुख्यमंंत्र्यांचा ई-डिजिटल पध्दतीने सहभाग अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात नव्याने बांधण्यात आलेल्या जिल्हा नियोजन भवनाचे उद्घाटन शनिवारी (दि .15 ) दुपारी 3 वाजता होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ई-डिजिटल पध्दतीने सहभाग असणार आहे. या सोहळ्यासाठी राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, रायगड जिल्हा …
Read More »कामोठे : भाजपचे कामोठे शहर युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, पनवेल महापालिकेचे नगरसेवक विजय चिपळेकर, युवा नेते हॅप्पी सिंग, भाजप तालुका उपाध्यक्ष सुशील शर्मा, कामोठे शहर उपाध्यक्ष अमोल सैद, …
Read More »पनवेल : पाले बुद्रुक येथील आई पालेश्वरी मंदिराचा दहावा वर्धापन दिन शुक्रवारी साजरा झाला. त्यानिमित्त सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट देत सत्यनारायणाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी योगेश तांडेल यांच्यासह ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते.
Read More »एमजीएमच्या विद्यार्थ्यांकडून वाहनचालकांमध्ये जनजागृती
पनवेल : वार्ताहर सध्या कारखान्याबरोबरच स्वयंचलित वाहनांमधूनही मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषण होत आहे. त्याचा परिणाम पर्यावरणावर होत असून हे प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कामोठे एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गुरुवारी खारघर टोलनाक्यावर वाहनचालकांमध्ये जनजागृती केली. तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट व रामके …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper