Breaking News

महत्वाच्या बातम्या

सिडकोची पात्र व अपात्र अर्जदारांची यादी संकेतस्थळावर जाहीर

पनवेल : रामप्रहर वृत्त सिडको महागृहनिर्माण योजना 2018-2019 च्या पात्र व अपात्र अर्जदारांची यादी सिडकोच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अर्जदारांना स्वत:च्या लॉगीनमध्ये जाऊन माय अप्लिकेशनवर क्लिक करून पात्र अथवा अपात्र असल्याचे पाहता येणार आहे. अपात्र अर्जदारांना सिडकोतर्फे अपिल करण्यासाठी 15 दिवसांची शेवटची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. …

Read More »

आजिवलीत माती उत्खनन सुरूच

खालापूर ः खालापुरात खोपोली-पेण मार्गावरील आजिवली गावाजवळ नव्याने निर्माण होणार्‍या इंडोस्पेस कंपनीच्या भरावासाठी मोठ्या प्रमाणात माती उत्खननचे काम सुरू असताना डम्परच्या वाहतुकीने हवेत धुरळा उडत आहे. महिनाभर हे काम सुरू असताना हवेत धुरळा होत असल्याने परिसरातील नागरिकांना दम्यासारखा श्वसनाचा त्रास जाणवू लागला आहे, तर हिवतापसारखा आजार वाढू लागल्याने माती भरावाचे …

Read More »

एसटी चालकाला मारहाण

नागोठणे : प्रतिनिधी स्थानकाचे आवारात शिरत असताना समोरून आलेल्या मोटरसायकलच्या चालकाला गाडी बाजूला घेण्यात सांगितल्याने राग अनावर होऊन मोटरसायकलस्वारासह इतर दोघांनी एसटी बसचालकाला मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी नागोठणे एसटी बसस्थानकात घडली होती. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. बसचालक दीपक उमाजी खंडागळे (51) रा. चिंचपाडा, पेण) यांनी नागोठणे …

Read More »

खोपोलीत टोईंग गाडी बंद

खोपोली : प्रतिनिधी  शहरातील वाहतूककोंडीवर व रस्त्यालगत बेशिस्त वाहने उभे करणार्‍यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन व नगरपालिका यांच्या संवादातून बाजारपेठेत नो पार्किंग झोन निर्माण करून समविषम पार्किंग अंमलात आली. याकरिता टोईंग गाडीच्या माध्यमातून वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी मदत झाली परंतु टोईंग गाडी महिन्यापासून बंद असल्याने मुख्य बाजारपेठेत वाहतूककोंडीचा प्रश्न जटिल होत …

Read More »

जांभूळवाडीसाठी नळयोजना राबवणार

वारे सरपंच योगेश राणे यांचे प्रयत्न; महिला हालातून मुक्त होणार कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायतमधील जांभूळवाडीमधील महिलांना साधारण 800 मीटर अंतर डोंगर उतरून पाणी नेण्यासाठी यावे लागत होते. मात्र आता डोंगराच्या खाली असलेल्या विहिरीमध्ये वीज पंप लावून ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच योगेश राणे यांनी दिली. …

Read More »

नागरी असुविधांबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांना दिले निवेदन

पनवेल : वार्ताहर नवीन पनवेल परिसरातील सिग्नल यंत्रणा, तसेच शेअर रिक्षा व इतर नागरी असुविधांबाबत आज नवीन पनवेल शिवसेना महिला शहर संघटक अपूर्वा प्रभू यांनी आ. प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन या नागरी प्रश्नांबाबत त्यांना निवेदन सादर केले. या वेळी पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यासुद्धा उपस्थित होत्या. या …

Read More »

आदई सर्कल ते चिपळे मार्गावर गतिरोधक बसवा

पनवेल : रामप्रहर वृत्त आदई ते चिपळे या रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी रायगड जि. प. सदस्य अमित जाधव व पनवेल पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. आदई ते चिपळे हा रस्ता नव्याने बांधण्यात आला आहे. सदर रस्ता रहदारीचा असल्याने तेथे सतत वाहनांची ये-जा सुरू असते. वाहनचालक …

Read More »

नवी मुंबईत 764 पोलिसांच्या बदल्या

पनवेल : वार्ताहर पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील साडेसातशेपेक्षा जास्त पोलीस कर्मचार्र्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पोलीस शिपायांची संख्या सर्वाधिक आहे. बहुतांशी कर्मचार्‍यांना सोयीनुसार पोलीस ठाणे त्याचबरोबर शाखा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बदली झालेल्यांमध्ये बर्‍याच अंशी समाधानाचे वातावरण आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात नवी मुंबई …

Read More »

एसटीत पोलीस हवालदाराला मारहाण

पनवेल : बातमीदार एसटीमधून प्रवास करताना दारू पिणार्‍या तरुणाला हटकणार्‍या पोलीस हवालदार अरविंद पाटील यांना या तरुणाने व त्याच्या साथीदाराने बेदम मारहाण करून पलायन केल्याची घटना रविवारी रात्री पनवेल येथे घडली. या मारहाणीत पाटील हे जबर जखमी झाले असून त्यांना पनवेलमधील लाइफ लाइन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. पनवेल शहर …

Read More »

पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी

उरण : प्रतिनिधी नवीन शेवा गावाजवळ सिडकोच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे पावसाळ्याच्या आधी उद्घाटन करावे अन्यथा तो खुला करण्यात येईल, असा इशारा आई फाऊंडेशनने दिला आहे. उरण परिसरात वाढत्या औद्योगिकीकरणामुळे उड्डाणपुलांचे जाळे निर्माण होत आहे. त्यातील काही पुलांचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, तर काही पूर्ण होऊनही सिडको उद्घाटन करण्याच्या …

Read More »