Breaking News

महत्वाच्या बातम्या

पनवेल ते मानखुर्द रस्त्यालगत 11 हजार वृक्षांचे रोपण

पनवेल : प्रतिनिधी गुरू नानक देव यांच्या 550 व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शीख असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते कळंबोली केएलई कॉलेज समोर एक्स्प्रेस महामार्गालगत वृक्षारोपण करण्यात आले. यंदा गुरुनानक देव यांचे 550वे जयंती वर्ष आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्र शीख असोसिएशनच्या वतीने पनवेल ते …

Read More »

स्वच्छता अभियानात सक्रियतेने सहभागी व्हा : आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : प्रतिनिधी  आपल्या पुढाकाराने पनवेल महापालिका हद्दीतील परिसर स्वच्छ होणार आहे. त्यामुळे आपला परिसर स्वच्छ राखण्यासाठी नागरिक व कार्यकर्त्यांनी स्वच्छता महाभियानात सक्रियतेने सहभागी व्हावे, असे आवाहन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.   माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त 1 ते 10 जूनपर्यंत पनवेल महापालिका हद्दीत …

Read More »

रायगडावर आज शिवराज्याभिषेक दिन सोहळा

महाड ः अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड संस्थेतर्फे गुरुवारी (दि. 6) तारखेनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याला देशभरातून हजारो शिवभक्त उपस्थित राहणार असल्याची माहिती समितीच्या वतीने महाड येथील पत्रकार परिषदेत देण्यात आली. तारखेप्रमाणे 6 जून रोजी येणारा शिवराज्याभिषेक दिन लोकोत्सव व्हावा यासाठी समितीच्या माध्यमातून शिवभक्तांनी …

Read More »

अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन

पनवेल: प्रतिनिधी जिल्ह्यात काही ठिकाणी शासनाच्या परवानगीशिवाय अनधिकृत शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. या संबंधित शाळाचालकांनी  सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात शासनाची परवानगी प्राप्त झाल्याशिवाय शाळा सुरु करु नये, तसेच पालकांनी अनधिकृत शाळांमध्ये आपल्या पाल्यांचा प्रवेश घेऊ नये असे आवाहन जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांनी केले आहे. अनधिकृत शाळेत …

Read More »

निसर्ग रक्षणासाठी सहभागी व्हा!

आमदार प्रशांत ठाकूर यांचे आवाहन पनवेल : प्रतिनिधी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निसर्ग मित्र, पनवेल संस्थतर्फे बुधवारी दि. 5 जून रोजी  चिपळे पूल येथे आयोजित करण्यात आलेल्या गाढी नदीच्या साफसफाई मोहिमेत सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सहभाग घेत सर्वांनी निसर्गाचे रक्षण करण्याच्या या प्रयत्नात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. निसर्ग …

Read More »

पनवेल-माथेरान रोडवर गतिरोधक बसवा -अ‍ॅड. चेतन केणी

पनवेल : वार्ताहर पनवेल सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकताच पनवेल-माथेरान रस्ता हॉटेल मरीआई ते मालेवाडी स्टॉपपर्यंत तयार केलेला आहे. सदर रस्त्यावर सेंट मेरी स्कूल, न्यू इंग्लिश स्कूल व सेंट अँड्र्यूज स्कूल या शाळा असल्याने या रस्त्यावर मुलांसह त्यांच्या पालकांची आणि नागरिकांची दिवसभर रहदारी चालू असते. सदर रस्ता नवीन, तसेच रुंद झाल्याने …

Read More »

उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या देखरेखीखाली रस्त्याचे डांबरीकरण वेगात सुरू

पनवेल : वार्ताहर पनवेल शहराचा चोहोबाजूने विकास होत असताना अनेक ठिकाणच्या रस्त्याची, गटारांची व नाल्यांची कामे वेगाने सुरू आहेत. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण होण्याच्या दृष्टीने पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील प्रयत्नशील असून यासाठी ते स्वतः जातीने उभे राहून रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम करून घेत आहेत. प्रभागातील परदेशी आळी-महाराणा प्रताप रस्त्याच्या …

Read More »

जिल्ह्यात सात गोवर्धन गोंवश केंद्र मंजूर ; इच्छुक संस्थांकडून प्रस्ताव मागविले

पनवेल : प्रतिनिधी केंद्र शासनाने रायगड जिल्ह्यामध्ये सात गोवर्धन गोवंश सेवा केंद्र मंजूर झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील सात उपविभागांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे हे केंद्र मंजूर असून हे केंद्र चालवून गोसंवर्धनाचे काम करू इच्छिणार्‍या संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. या संदर्भात जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे की, सन …

Read More »

उरणमध्ये कांदळवनांची खुलेआम कत्तल ; भूमाफियांच्या कृत्यानंतरही शासकीय अधिकारी निष्क्रिय

उरण : बातमीदार तालुक्यात औद्योगिकीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात कांदळवनांची कत्तल खुलेआम सुरू आहे, मात्र स्थानिक प्रशासन याबाबत अनभिज्ञ आहेत. भूखंड हडप करण्यासाठी ही कांदळवनाची कत्तल केली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कांदळवनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. खारफुटी जमिनीची धूप रोखतात. सागरी जीवांचे रक्षण करणारे, तसेच …

Read More »

जेएनपीटीमध्ये वायू गुणवत्ता नियंत्रण केंद्राची स्थापना

मुंबई : रामप्रहर वृत्त भारताचे नंबर एकचे पोर्ट असलेल्या जेएनपीटीमध्ये पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी बंदराचे सर्व कर्मचारी, तसेच पोर्ट युजर्स यांना पर्यावरणाविषयी शपथ देऊन नंतर प्रशासकीय इमारतीजवळ वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जेएनपीटी आवारात शाश्वत विकास आणि पर्यावरणाच्या सवांदाचा भाग म्हणून वायू गुणवत्ता नियंत्रण केंद्राची …

Read More »