Breaking News

महत्वाच्या बातम्या

कर्जतमध्ये माकडांचा धुमाकूळ

लहान मुलगा व ज्येष्ठ नागरिकाला घेतला चावा कर्जत : प्रतिनिधी कर्जत शहरात माकडांनी आबालवृद्धांना लक्ष्य केले असून ही माकडे माणसांच्या अंगावर धावून चावा घेत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. वन खात्याने व नगर परिषद प्रशासनाने या माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत. सुरुवातीला एक माकड कर्जत शहरात आले. …

Read More »

‘रोटरी’च्या वैद्यकीय सेवांचा पनवेलमध्ये शुभारंभ

गरजूंना वैद्यकीय उपचारासाठी मदतीच्या हातांची गरज- आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्त आर्थिक परिस्थितीमुळे ज्यांना उपचार घेणे शक्य होत नाही अशा गरजूंच्या वैद्यकीय उपचारासाठी मदतीचे हात पुढे आले पाहिजेत, असे आवाहन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ते रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेल डायग्नोपेनच्या वतीने खांदा कॉलनी …

Read More »

कळंबोलीत होणार निवासी प्रशिक्षण संशोधन संस्था

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली माहिती नवी मुंबई : बातमीदार राज्य शासनातर्फे युवकांना कुशलता पूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी शासन विविध शैक्षणिक योजना राबवत असते. तरुणांना अधिक लाभ व्हावा यासाठी नवी मुंबईत निवासी प्रशिक्षण संशोधन संस्था उभारण्यात येणार आहे. नवी मुंबई हे सर्वाधिक उद्योग व्यवसाय व …

Read More »

संघर्ष करणार्‍या महिलांचा पत्रकारांकडून सन्मान

पनवेल : रामप्रहर वृत्त सेवाभावी कार्यक्रम आणि अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी सुप्रसिद्ध असलेली पनवेल तालुका पत्रकार विकास मंच ही संस्था प्रामाणिक आणि सजग कार्यक्रम राबविण्याकरता ओळखली जाते. शनिवार दिनांक 11 मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या औचित्याने पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाने श्रमधरेची कास धरत संघर्षमय परिस्थितीत आपल्या संसारासाठी नेटाने व्यवसाय …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते जलतरणपटू प्रभात कोळीचा सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा जलतरणपटू प्रभात कोळी याने खडतर सात समुद्रांच्या आव्हानांपैकी सातवे आव्हान न्यूझीलंड येथील कूक स्ट्राईट खाडी नुकतीच पोहून पार केली. याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 10) प्रभातचा सत्कार केला. या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. …

Read More »

उरणकरांची प्रतीक्षा संपली; खारकोपर-उरण मार्गावरून लोकल धावली!

उरण : प्रतिनिधी उरणकरांना ज्याची प्रतीक्षा ती लोकल अखेर शुक्रवारी (दि. 10) धावली. त्यामुळे खारकोपर ते उरण मार्गावर येत्या काही दिवसांत ही सेवा सुरू होण्याची चिन्हे आहेत. उरणच्या लोकलची घटिका समीप आल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. मागील 27 वर्षांपासून उरणकरांना लोकल ट्रेनची प्रतीक्षा आहे. मुंबई आणि नवी मुंबईपासून हाकेच्या …

Read More »

पालकमंत्री उदय सामंत आणि सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पेणमध्ये शनिवारी विविध विकासकामांचे भूमिपूजन

पेण : प्रतिनिधी पेण नगर परिषदेच्या वतीने करण्यात येणार्‍या विविध विकासकामांचे भूमिपूजन शनिवारी (दि. 11) राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सायंकाळी 4 वाजता होणार आहे. या कार्यक्रमास भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, स्थानिक आमदार रविशेठ पाटील, खासदार सुनील तटकरे व …

Read More »

सीकेटी स्वायत्त महाविद्यालयाचा रौप्य महोत्सव समारंभ

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची लाभणार शनिवारी प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त दर्जेदार शिक्षणासोबत कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक आदी क्षेत्रांत अग्रेसर असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयाला 25 वर्षे झाली आहेत. त्या अनुषंगाने या महाविद्यालयाचा दोनदिवसीय रौप्य वर्ष महोत्सव …

Read More »

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पनवेल महापालिकेस सिडकोकडील विविध सेवांचे हस्तांतरण

पनवेल : वार्ताहर पनवेल महापालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या आणि सिडकोने विकसित केलेल्या नोड्समधील विविध सेवांचे हस्तांतरण शुक्रवारी (दि. 10) पनवेल महापालिकेकडे करण्यात आले. याबाबतचा हस्तांतरण करार विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत झाला. या करारावर …

Read More »

‘उमेद’ आयोजित स्पर्धांचे महालक्ष्मी सरस प्रदर्शनात बक्षीस वितरण

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त महिला उद्द्योजिकांच्या यशोगाथा, माहितीपट व लघुपट निर्मिती स्पर्धेत सिंधुदूर्ग कणकवलीतील न्यू खुशबू स्वयंसहाय्यता समूहाने प्रथम पारितोषिक पटकावले या समुहाला राज्याचे ग्राम विकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक तीन लाख रुपयांचा धनादेश, सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण …

Read More »