बांधकाम रखडल्याने रसिकांची निराशा माणगाव : सलीम शेख शासनांनी माणगावात नाट्यगृह मंजूर केले असून त्याचे काम सुरु झाले आहे. मात्र शासनाकडून पुरेसा निधी मिळत नसल्याने हे काम जमीन सपाटीपर्यंत आले आहे. त्यामुळे रसिकांची निराशा होत आहे. नगरपंचायत निवडणुकीत सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी नाट्यगृह उभारणीचा मुद्दा प्रचारात वापरला होता मात्र हे काम …
Read More »सीएमपी वेतनप्रणाली लागू करण्याची मागणी
शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट अलिबाग : प्रतिनिधी जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षकांचे वेतन वेळेत मिळण्यासाठी सीएमपी वेतन प्रणाली लागू करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या शिष्टमंडळाने राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. संघटनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी पुणे येथे आयुक्तांची भेट घेऊन शिक्षकांच्या प्रलंबित …
Read More »पारदर्शक कारभारासाठी पनवेल मनपाचे पाऊल
सर्व पावत्या मिळणार पॉस मशीनच्या माध्यमातून पनवेल ः प्रतिनिधी महापालिकेतील विविध विभागांतील दंड, कराच्या पावत्या आता 100 टक्के पॉस मशीनच्या माध्यमातून घेतले जात आहेत. छापील पावती पुस्तके पूर्णत: बंद करण्यात आली असून, पारदर्शक कारभाराच्या दिशेने महापालिकेने महत्वाचे पाऊल टाकले असल्याची माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली. विभाग प्रमुखांच्या मंगळवारी (दि. …
Read More »पाण्यासाठी वैशालीनगर तळाघर ग्रामस्थांचा रोहा तहसील कार्यालयावर मोर्चा
पालकमंत्र्यांच्याविरोधात घोषणाबाजी रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील वैशाली नगर (बौद्धवाडी) तळाघर गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, गावाला कायमस्वरूपी पाणीपुरवठा सुरू करावा या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी (दि. 26) रोहा तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. रोहा तालुक्यातील 26 गाव पाणीपुरवठा योजनेचे तीनतेरा वाजल्यानंतर त्या गावांना आता टँकरने पाणीपुरवठा होत आहे. ही …
Read More »महिला बचत गटांसाठी उमेद सखी मंचची साथ
आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रदर्शनाला भेट कर्जत : बातमीदार तालुक्यातील महिला बचत गट आणि महिला स्वयंसहाय्यता गट यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी, यासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेद सखी मंचच्या माध्यमातून महिला उद्योजकांच्या उत्पादनांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या मेळाव्याला अनेकांनी भेटी देऊन प्रोत्साहन देण्याचे काम केले. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत …
Read More »पोलादपूर तालुक्याला अवकाळीचा तडाखा
लोहारे, तुर्भे, सप्तक्रोशी भागात वादळी वार्यासह पावसाची हजेरी पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील महाडलगतच्या ग्रामीण भागात सोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी वार्याने अनेक गावांना जोरदार तडाखा दिला. लोहारे, तुर्भे तसेच सवाद धारवली सप्तक्रोशी भागातील वावे याठिकाणी इमारतींचे नुकसान झाल्याचे पोलादपूर तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले. सुदैवाने कोठेही मनुष्यजीवित हानी झाली नाही. पोलादपूर तालुक्यात …
Read More »अखेर सुमितला मिळाला मदतीचा हात एक किलो वजनाची गाठ काढली
पनवेल ः वार्ताहर नागोठणे येथील सुमित राय या सात वर्षीय मुलाच्या डाव्या हाताच्या खाली असणारी गाठ काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. स्थानिक प्रशासन व एमजीएम रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे सुमितीच्या शस्त्रक्रियेसाठी मदत मिळाली. लहानपणापासून सुमित रायच्या डाव्या हाताच्या खाली गाठ होती. वयानुरूप ती गाठ वाढत गेली आणि त्यामुळे त्याचा त्रासही वाढत …
Read More »मुलांमधील असाधारण क्षमतेचा शोध घ्या -भाग्यश्री पटेल
पनवेल ः प्रतिनिधी प्रत्येक मूल जन्मत:च हुशार असते आणि प्रत्येक मुलामधील असाधारण क्षमतेचा शोध घेणे ही पालक व शिक्षकांची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन अभिनेत्री भाग्यश्री पटेल यांनी खारघर येथील विश्वज्योत हायस्कूलमध्ये आयोजित केलेल्या अद्वितीय टॅलेन्ट मॅनिया कार्यक्रमामध्ये केले. त्या म्हणाल्या, अध्ययन म्हणजे वर्गामध्ये शिकवल्या जाणार्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यासोबत प्रश्नांची उत्तरे …
Read More »नवी मुंबईतील 1,418 कंत्राटी आरोग्यसेवक कार्यमुक्त
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोना काळात आरोग्यसेवा पुरवण्यासाठी महापालिकेने एक हजार 911 जणांची तात्पुरती भरती केली होती, परंतु आता यातील आतापर्यंत 1,418 जणांना कार्यमुक्त करून केवळ 493 जणांना पुढील तीन महिन्यांसाठी मुदतवाढ दिल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. नवी मुंबई शहरात दोन वर्षांपूर्वी मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सुरुवातीला पालिकेच्या …
Read More »पेणजवळ मांडूळ तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
पेण : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील जिते गावच्या हद्दीत मांडूळ सापाच्या तस्करीप्रकरणी दादर सागरी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून त्यांच्याकडून मांडूळ साप व गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत माहिती अशी की, आरोपी उत्तम केरू रणशूर (वय 49, रा. मळेगाव, ता. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper