Breaking News

महत्वाच्या बातम्या

राजर्षि शाहू महाराजांना पालीमध्ये अभिवादन

पाली : प्रतिनिधी राजर्षि शाहू महाराज यांच्या 100व्या पुण्यतिथी निमित्त पालीमधील नागरिक, तहसीलदार व पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी (दि. 6) शंभर सेकंद स्तब्ध उभे राहून शाहू महाराजांना अभिवादन केले. या वेळी शाहू महाराजांच्या विचारांचे आणि कार्याचे स्मरण करण्यात आले. सामाजिक समतेचे प्रणेते लोकराजे छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक समतेची बीजे रोवली असल्याचे …

Read More »

मुरूडमधील दत्तवाडी रस्त्यावर गतिरोधक बसवा; नागरिकांची मागणी

मुरूड : प्रतिनिधी शहरातील परेश हॉटेल ते दत्तवाडी या मुख्य रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत. या रस्त्यावर सूचना फलक लावावेत व गतिरोधक उभारावेत, अशी मागणी दत्तवाडी परिसरातील नागरिकांनी मुरूड सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. मुरूड दत्तवाडी परिसरातील नागरिकांनी  सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता गोरे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन लेखी …

Read More »

कर्जतच्या पुनर्वसन केंद्राला आर्थिक, धान्याची मदत

खोपोलीतील केएमसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी   खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित केएमसी महाविद्यालयाचे प्रथम व द्वितीय वर्ष शास्त्र फाउंडेशन कोर्स विषयाच्या विद्यार्थ्यांनी कर्जत येथील श्रद्धा पुनर्वसन केंद्राला स्वेच्छेने आर्थिक तसेच धान्य आणि अन्य आवश्यक वस्तूंची मोठी मदत केली आहे. ही मदत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रताप …

Read More »

समाजाचे अस्तित्व टिकविण्यासाठी तरुणाईने पुढे यावे -सूर्यकांत पाटील  

वडखळ येथे आगरी सामाजिक संस्थेची वार्षिक सभा उत्साहात पेण : प्रतिनिधी आगरी समाजाचे अस्तित्व जपणार्‍या संस्थेची ताकद मजबूत करण्यासाठी आणि ही चळवळ सर्वदूर पोहोचविण्यासाठी तरुणाईने संस्थेच्या कार्यात उतरणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी येथे केले. संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच …

Read More »

कर्जतमधील तबेला जळीत घटनेत एका म्हशीचा मृत्यू; आरोपी मोकाट

कर्जत : बातमीदार तालुक्यातील जिते गावातील म्हशींचा तबेला 20 एप्रिल 2022 रोजी रात्रीच्या अंधारात जाळण्यात आला होता. त्याबद्दल आरोप असलेल्या व्यक्तींना नेरळ पोलिसांनी अद्याप अटक केली नाही. दरम्यान, त्या आगीमध्ये होरपळलेल्या एका म्हशींचा मृत्यू झाला असून शेतकर्‍याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कर्जत तालुक्यातील जिते गावातील शेतकरी धनाजी घरत, त्यांचे …

Read More »

महाडची पूर समस्या, वीर-रानवडी रेल्वे दुपदरीकरणाचा प्रश्न सोडवणार

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना आश्वासन महाड : प्रतिनिधी कोकण रेल्वेमार्गावरील वीर ते रानवडी दरम्यानच्या रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण तसेच दासगाव येथे पूर निवारण यंत्रणा उभारण्यासंदर्भात संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेऊन लवकरात लवकर हे प्रश्न सोडविण्यात येतील, असे आश्वासन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी विधान …

Read More »

भोकरपाडा येथे विकासकामांचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन व उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पनवेल आणि उरण तालुक्यात अनेक विकासाची कामे सुरु आहेत. त्याअनुषंगाने भोकरपाडा गावामध्ये रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. याचे भूमीपूजन आणि बसथांब्याचे लोकार्पण भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 6)झाले. …

Read More »

व्यायाम हा आयुष्यातील महत्त्वाचा घटक

उलवे नोडमध्ये योगा अभ्यास केंद्राचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्त उलवे नोड सेक्टर 17 येथे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा उलवे नोड यांच्या माध्यमातून महिलांसाठी योगा अभ्यास केंद्र बांधण्यात आले आहे. या केंद्राचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन झाले. या वेळी …

Read More »

पनवेलच्या दुर्पता सौद, सिद्धेश पावशे यांनी बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकले

पनवेल : रामप्रहर वृत्त पुणे येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलची बॉक्सर दुर्पता सौद आणि सिद्धेश पावशे यांनी सुवर्णपदक जिंकले. या सब ज्युनियर मुले व मुलींच्या स्पर्धेत रायगडचे दोन सुवर्णपदके पटकावली. पनवेलच्या दुर्पता सौद ऊर्फ छोटीने मुलींच्या 38 किलो वजनी गटात सातारा, जळगाव येथील बॉक्सर्सचा पराभव केला आणि …

Read More »

थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांची शनिवारी पुण्यतिथी

सीकेटी महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त कष्टकर्‍यांचे द्रष्टे नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांची शनिवारी (दि. 7) 34वी पुण्यतिथी आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने सकाळी 11.30 वाजता खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. …

Read More »