Breaking News

महत्वाच्या बातम्या

मारहाणप्रकरणी आमदार महेंद्र दळवी यांना दोन वर्षांची शिक्षा

अलिबाग ः प्रतिनिधी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांना एका जबरी मारहाणीच्या प्रकरणात अलिबाग जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि दंडही ठोठावला आहे. सन 2014मध्ये अलिबाग पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी आणि मारहाण केल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात दळवी यांच्यासह नऊ आरोपी होते. या प्रकरणाची सुनावणी अलिबाग येथील …

Read More »

भाजपकडून नागरिकांना विविध सोयीसुविधा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उलवे नोडमध्ये उद्घाटन   पनवेल ः रामप्रहर वृत्त नागरिकांचे जीवन सुकर व्हावे यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विविध कामे, उपक्रम नेहमीच राबविण्यात येत असतात. जनसेवेचा हा वसा अविरत ठेवत उलवे नोडमध्ये 50% सवलतीच्या दरात फिल्टर आणि पिठाची गिरणी उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सेक्टर 17 …

Read More »

‘आरटीआयएससी’चा बॅडमिंटनपटू प्रशांत मुखर्जीची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

पनवेल ः रामप्रहर वृत्त उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा बॅडमिंटनपटू प्रशांत मुखर्जी याने लातूर येथे झालेल्या स्पर्धेत चकमदार कामगिरी केली. यामुळे त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. बॅडमिंटनपटू प्रशांत मुखर्जीने 50+ गटातील दुहेरीत विजेतेपद, मिश्र दुहेरीत उपविजेतेपद पटकावले, तर एकेरीत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. याबद्दल …

Read More »

पनवेल परिसरातून तीन दुचाकींची चोरी

पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरातून वेगवेगळ्या ठिकाणावरून तीन मोटरसायकल चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे वाहन मालकांमध्ये भितीयुक्त वातावरण आहे. भगवान भगत यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्पेन्डर कंपनीची काळ्या रंगाची मोटरसायकल (एमएच 06 क्यू 1494) ही गार्डन हॉटेलसमोर उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने सदर गाडी …

Read More »

मुंबई-गोवा महामार्गावर धावत्या एसटी बसला आग प्रवासी सुखरूप

पनवेल, पेण ः वार्ताहर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एका एसटी बसला मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा अभयारण्य येथे शुक्रवारी (दि. 13) सकाळी अचानक आग लागली. या आगीत बस जळून खाक झाली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मुंबई सेंट्रल येथून महाडमधील फौजी आंबवडे येथे जाणारी एसटी बस (एमएच 14-बीटी 2056) सकाळी 9.15च्या सुमारास कर्नाळा …

Read More »

चिरनेर गावापर्यंत एनएमएमटी सेवा सुरू करण्याची मागणी

उरण : बातमीदार नवी मुंबई, मुंबईला जाण्यासाठी उरणमधील प्रवाशी नवी मुंबई परिवहन सेवा (एनएमएमटी)च्या बसेसने खूप मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. मुंबई, नवी मुंबईमधून अनेक प्रवाशी एनएमएमटीच्या बसने उरणमध्ये येतात. जुईनगर येथून असलेल्या बसेस कोप्रोलीपर्यंत येत असतात, मात्र कोप्रोली गावाच्या पुढे असलेल्या गावांना एनएमएमटीच्या बससेवेचा फायदा मिळत नाही.त्या अनुषंगाने जुईनगर ते …

Read More »

दक्षिण आशियाई फेडरेशन गेम्स टेबल टेनिस आणि राष्ट्रीय स्पर्धेत स्वस्तिका घोषची सुवर्ण कामगिरी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले अभिनंदन पनवेल : प्रतिनिधी मानाच्या दक्षिण आशियाई फेडरेशन गेम्स टेबल टेनिस स्पर्धेत सीकेटी महाविद्यालयाची विद्यार्थिनी व टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष हिने सांघिक सुर्वण पदक तर राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत रजत पदक पटकावित पुन्हा एकदा दैदिप्यमान कामगिरी केली असून त्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते …

Read More »

अपघात झाल्यास सिडको जबाबदार

खारघर भाजपने अधिकार्‍यांना सुनावले; खोदलेले रस्ते पूर्ववत करण्याची मागणी खारघर : रामप्रहर वृत्त खारघर हे सिडकोने वसविलेले शहर आहे. त्यामुळे येथील नागरी सोयी सुविधांची जबाबदारी ही सिडको प्रशासनाची आहे. खारघर शहरात सिडकोने मोठ्या प्रमाणात रस्ते खोदून ठेवलेले आहेत. यंदा मान्सून लवकर असताना रस्ते दुरुस्तीबद्दल काहीच हालचाल होताना दिसत नाही. त्यामुळे …

Read More »

पनवेल महापालिका उभारणार इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन

खारघर : प्रतिनिधी राज्य शासनाच्या धोरणानुसार इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्यास शासनाने मान्यता दिली असुन या धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने पनवेल महापालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार पालिका क्षेत्रात रेव्हून्यू शेअरिंग बेसीसवर ठेकेदाराची नियुक्ती करून पाच चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. महापौर डॉ. कविता चौतमोल व आयुक्त गणेश देशमुख यांनी याबाबत सकारात्मक भूमिका …

Read More »

पळस्पे येथे ‘हर घर नल, हर घर जल’; आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत योजनेचे भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल हर, घर जल या योजनेंतर्गत तालुक्यातील पळस्पे येथे नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन गुरुवारी (दि. 12) उरणचे आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या वेळी आमदार महेश बालदी यांनी, मी पाठपुरावा केलेल्या विकासकामांचे श्रेय घेण्याचे …

Read More »