Breaking News

महत्वाच्या बातम्या

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांनी कमावलं ते उद्धव ठाकरेंनी गमावले

नारायण राणेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका मुंबई : प्रतिनिधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. उद्धव ठाकरेंचं कर्तृत्व काय आहे? ते पवारांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झाले, उद्धव ठाकरे म्हणजे कर्तृत्वशून्य माणूस… आयत्या बिळावरचा नागोबा, अशा शब्दात नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यावर टीकास्त्र सोडलं. मुख्यमंत्री …

Read More »

चौलच्या ताडगोळ्यांना पर्यटकांची पसंती

रसरशीत, आरोग्यदायी फळविक्रीतून स्थानिकांना रोजगार उपलब्ध रेवदंडा : प्रतिनिधी चौलमधील ताडगोळे पर्यटकांची खास पसंती असून याची मोठी मागणी ऐन उन्हाळ्यात असते. चौल परिसरात ताडगोळ्यांची असंख्य झाडे असून ताडगोळे विक्रीतून मोठे उत्पन्न स्थानिक साधतात. ऐन उन्हाळ्याच्या दिवसात ताडगोळे यांना थंडावा म्हणून पसंती असते.त्यामुळेच मुंबई, पुणे, ठाणे आदी शहरातून तसेच परिसरातून आलेले …

Read More »

कविवर्य नारायण सुर्वेंच्या नावाने दिलेला पुरस्कार माझ्यासाठी खूप महत्त्वाचा

अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांचे उद्गार कर्जत : बातमीदार समाजातील सर्वांच्या काळजाला भिडणार्‍या कविता देणारे कविवर्य नारायण सुर्वे यांच्या नावाने दिला गेलेला पुरस्कार हा अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाएवढेच आपल्यासाठी महत्त्वाच्या दर्जाचे असल्याचे उदगीर येथील 95व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.भारत सासणे यांनी सांगितले. पद्मश्री नारायण सुर्वे …

Read More »

उरणमध्ये नगर परिषद कर्मचार्यांचे कामबंद

नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांचा जाहीर पाठिंबा उरण ः बातमीदार महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी /संवर्ग कर्मचारी संघटनेच्या अनेक मागण्या शासन दरबारी मान्य होत नसल्याने संघटनेच्या पदाधिकारी सदस्यांनी अर्थातच शासकीय कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. 1 मे रोजी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या कामबंद आंदोलनाला भाजपच्या …

Read More »

मोरू नारायण म्हात्रे विद्यालय व तुकाराम नारायण घरत महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त 1 मे रोजी महाराष्ट्र दिन संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. ज. भ. शि. प्र. संस्थेच्या मोरू नारायण म्हात्रे विद्यालय व तुकाराम नारायण घरत कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाला मेंबर बोर्ड …

Read More »

भाषण कौशल्यासाठी विषयाचा अभ्यास असणे आवश्यक

भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांचे मार्गदर्शन पनवेल ः रामप्रहर वृत्त जर आपल्याला चांगले भाषण करायचे असेल तर त्या विषयाचा सखोल अभ्यास असणे आवश्यक असल्याचे भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी सांगितले. उत्तर रायगड भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेलच्यावतीने आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्या माध्यमातून वक्तृत्व कला आणि संवाद कौशल्ये …

Read More »

नेरूळमध्ये टॅग केलेला पक्षी रशियात

पाणथळ जागेचे संवर्धन करण्याची गरज; निसर्गप्रेमींचे आवाहन नवी मुंबई : बातमीदार 139 वर्षे जुनी संशोधन संस्था असलेल्या बीएनएचएस म्हणजेच बॉम्बे नॅच्युरल हिस्ट्री सोसायटीने टॅग केलेला पक्षी रशियामध्ये सापडला आहे. बीएनएचएसने नेरूळ येथे ही कल्पना राबवत कॉमन रेड शांक या पक्ष्याला काही महिन्यांपूर्वी टेग केले होते.  या पक्ष्याचे निरीक्षण केले जात …

Read More »

महाराष्ट्र दिनानिमित्त नवी मुंबई मनपा मुख्यालयात ध्वजारोहण

कामगार दिनाचे औचित्य साधून कामगारांचा सन्मान नवी मुंबई ः बातमीदार महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व संजय काकडे तसेच विभागप्रमुख, अधिकारी -कर्मचारीवृंद, अग्निशमन दलाचे जवान, अतिक्रमण विभागाचे पोलीस अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. …

Read More »

सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले सपोनि. सुभाष पुजारी यांचे अभिनंदन

पनवेल ः वार्ताहर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आल्याने 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी पत्रकार संजय कदम उपस्थित होते. पोलीस खात्यामध्ये विविध विभागात कर्तव्य बजावित असताना …

Read More »

खारघर, तळोजात पाणी तक्रारींसाठी सिडको सरसावली

तक्रारींसाठी व टँकरच्या मागणीसाठी कॉल, एसएमएसची सुविधा नवी मुंबई ः बातमीदार खारघर आणि तळोजा नोडमध्ये पाणी पुरवठ्यासंबंधी तक्रारी नोंदविण्यासाठी आणि टँकरची मागणी करण्यासाठी नागरिकांनी 9324950948 या क्रमांकावर कॉल करून किंवा व्हॉटसअप संदेशद्वारे किंवा एसएमएसद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन सिडकोकडून करण्यात आले आहे. दक्षिण नवी मुंबईमध्ये सिडकोतर्फे साकारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ, …

Read More »