तळोजामध्ये सहा महिन्यांपासून पाण्यासाठी वणवण कळंबोली : प्रतिनिधी सिडकोच्या माध्यमातून गृहनिर्माण प्रकल्प उभारले जात असून लॉटरी पद्धतीने विक्रीदेखील केली जात आहे. मात्र सद्य स्थितीत सिडकोच्या तळोजातील गृहप्रकल्पांमध्ये पाणीटंचाईमुळे येथील सदनिकाधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, असा आरोप रहिवाशांनी केला आहे. तळोजातील सेक्टर 21, 22, 37, 27 येथील सिडको सदनिकाधारक गेल्या …
Read More »अधिपरिचारिकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण
अलिबाग : प्रतिनिधी अधिपरिचारीका प्रशिक्षणास 2017 पासून सुरुवात करुन 2019-20 मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व अधिपरिचारिकांना 18 महिन्याचे नियुक्तीपत्र मिळत नसल्याने समाजक्रांती आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. यात प्रशिक्षण पुर्ण करणार्या अधिपरीचारीकांचाही समावेश आहे. अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात ऑगस्ट 2017 पासून जीएनएम प्रशिक्षणास 15 विद्यार्थ्यांनी सुरुवात …
Read More »खालापूरामध्ये अपघातात वाढ; आठ दिवसांत चार ठार तेरा जखमी
खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यात रस्ते अपघातात झालेली वाढ चिंताजनक असून, अवघ्या आठ दिवसात विविध अपघातात चार जणांना जीव गमवावा लागला आहे. तर तेरा जण जखमी झाले आहेत, जखमींपैकी सहा जणांना गंभीर दुखापत झाली आहे. खालापूर तालुक्यात रस्त्याचे जाळे असून, द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, पाच राज्यमार्ग तालुक्यातून जातात. या सर्व …
Read More »चौलमध्ये महिला दिन उत्साहात
रेवदंडा : प्रतिनिधी मॅजिक बस फाउंडेशन आणि जेएसडब्ल्यू कंपनी (साळाव) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच चौल येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शितल गायकर यांनी केले. एन. व्हि. पी. इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राची जोंबराज यांनी महिलांचे शिक्षण व महत्व या विषयावर, शिक्षिका स्वरूपा जाधव यांनी महिला सक्षमीकरण यावर …
Read More »बचत गटाच्या महिलांसाठी व्यवसायाभिमुख प्रशिक्षण
कर्जत : बातमीदार आदित्य दृष्टी सामाजिक विकास प्रतिष्ठान तर्फे कर्जत तालुक्यातील नसरापूर ग्रुपग्रामपंचायत कार्यालयात महिला बचत गटांसाठी मसाले प्रॉडक्ट्स बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अंशु अभिषेक यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नसरापूरच्या सरपंच प्रमिला मोहिते, माजी ग्रामपंचायत सदस्य अॅड. संपत हडप, महिला बचतगट सीआरपी …
Read More »नागेवाडीयेथील दिव्यांगाला मदतीचा हात
कर्जत : बातमीदार तालुक्यातील पाथरज नागेवाडी येथील जना चांगो कांबडी (वय 47) या अदिवासी बांधवांला 2014 साली विजेचा शॉक लागून अपघात झाला होता. त्यात त्यांना कायमचे अपंगत्व आले आहे. कामोठे (पनवेल) येथील एकता सामजिक संस्थेने जना चांगो कांबडी यांना व्हीलचेअर, पलंग तसेच दिव्यांगाला आवश्यक असणारे साहित्य दिल्याने जना कांबडी यांचे …
Read More »रायगड जि.प. वर अखेर प्रशासक
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेचा (राजिप) कारभार सोमवारपासून (दि. 21) प्रशासकाच्या हाती गेला आहे. राजिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील हेच पराशासक आहेत. राजिपवर प्रशासक नेमण्याची ही तिसरी वेळ आहे. जिल्हा परिषद स्थापन होण्यापूर्वी जिल्हा लोकलबोर्ड होते. 1962 साली रायगड जिल्हा परिषद स्थापन झाली. केशवराव (दादासाहेब) लिमये हे …
Read More »अंगार आणि भंगार
एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसमोर दोस्तीचा हात पुढे केला आणि नव्याच वादाला तोंड फुटले. महाविकास आघाडीत सामील होण्याच्या एमआयएमच्या ऑफरमुळे शिवसेनेच्या प्रतिमेला तडा जायचा तो गेलाच. पूर्वीच्या काळी एमआयएमची अशी हिंमत तरी झाली असती का, या एकाच प्रश्नाचे उत्तर शिवसेनेच्या नेत्यांनी स्वत:लाच प्रामाणिकपणे द्यावे. अंगार कोण आणि भंगार …
Read More »रायगड जिल्हा परिषदेवर प्रशासक
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेवर सोमवार (दि. 21)पासून प्रशासकीय राजवट लागू होणार आहे. विद्यमान जिल्हा परिषदेची मुदत रविवारी संपुष्टात आली. विद्यमान जिल्हा परिषदेत शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची सलग पाच वर्षे सत्ता राहिली आहे. पहिल्या अडीच वर्षांसाठी राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्याकडे अध्यक्षपद होते, तर उर्वरित अडीच वर्षांसाठी …
Read More »खोटे सोने तारणातून कामोठ्यात बँकेला 34.56 लाखांचा गंडा
पनवेल : वार्ताहर कामोठे येथील दि सह्याद्री सहकारी बँकेमध्ये पाच ग्राहकांनी एक किलो 199 ग्रॅम वजनाचे बनावट सोने तारण ठेवत बँकेकडून एकूण 34 लाख 56 हजार रुपयांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. सोन्याचे मुल्यांकन करणार्या बँकेच्या अधिकृत सोनारासोबत संगनमत करून या सर्वांनी फसवणूक केली आहे. त्यामुळे कामोठे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper