Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

गव्हाण विद्यालयात पारितोषिक वितरण समारंभ

पनवेल ः रामप्रहर वृत्त गव्हाण येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छात्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये बुधवारी (दि. 25) सकाळी 10.30 वा. संस्थेचे संस्थापक थोर शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 132 वा जयंती सोहळा व ज. आ. भागत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी …

Read More »

भाजप उरण तालुका उपाध्यक्षपदी पंडित घरत

उरण ः वार्ताहर येथील पंडित तथा पंढरीनाथ नामदेव घरत यांची भाजप उरण तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीचे पत्र जेएनपीटी विश्वस्त तथा भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी पंडित घरत यांना देऊन अभिनंदन केले. या वेळी भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, उरण नगराध्यक्ष सायली सविन म्हात्रे, उपनगराध्यक्ष …

Read More »

जेएनपीटीमध्ये स्वच्छता पंधरवडा

उरण ः प्रतिनिधी जेएनपीटीमध्ये 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2019 दरम्यान ‘स्वच्छता ही सेवा पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे. जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी जेएनपीटीचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांना स्वच्छतेची शपथ दिली. ‘स्वच्छता पंधरवडा’ दरम्यान रोज स्वच्छतेशी संबंधित एक उपक्रम राबविण्यात आला. ‘पंधरवडा’विषयी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे तयार करून जेएनपीटीच्या …

Read More »

निर्धार एक लाख मताधिक्याचा

भाजपच्या बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल ः रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीसंदर्भात भाजप पनवेल तालुका मंडलच्या वतीने ठिकठिकाणी बैठका होत असून या बैठकींना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघात चिंध्रण, नेरे, आदई, सुकापूर, विचुंबे, खारघर, पडघे, तळोजे मजकूर, बेलवली आदी ठिकाणी बैठका झाल्या. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार …

Read More »

चिरनेरमध्ये हुतात्म्यांना अभिवादन

जंगल सत्याग्रहाचा स्मृतिदिन साधेपणात साजरा उरण : प्रतिनिधी, वार्ताहर ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रहाचा 89वा स्मृतिदिन बुधवारी (दि. 25) शासकीय इतमामात साजरा झाला. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा कार्यक्रम यंदा साधेपणात झाला. ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध उरण तालुक्यातील चिरनेर येथे 25 सप्टेंबर 1930 रोजी जंगल सत्याग्रह करण्यात आला होता. या सत्याग्रहात धाकू गवत्या फोफेरकर, …

Read More »

उरण विधानसभा मतदार संघातील निवडणूक तयारीचा आढावा

उरण : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघ येथील रा.जि.प. मराठी शाळा जासई येथे आचार संहिता पथक, खर्च नियंत्रण समिती व इतर समित्यांचे नोडल अधिकारी यांच्याकडून निवडणूक विषयक तयारी व कामकाजाचा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मंगळवारी (दि. 24) आढावा घेतला. या वेळी डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, …

Read More »

पोलीस ठाण्याच्या वतीने नवरात्रोत्सव मंडळांना सूचना

पनवेल : बातमीदार या वर्षीचा नवरात्रोत्सव हा आचारसंहिता असल्यामुळे पुरता अडचणीत सापडला आहे. यासाठीच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे नव्याने पदभार स्वीकारलेले वपोनि अजयकुमार लांडगे यांनी पनवेल शहरातील नवरात्रोत्सव मंडळांची बैठक बोलावून त्यांना आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची खबरदारी घेण्याबाबत त्यांनी यावेळी सूचना केल्या. ही बैठक सोमवारी (दि. 23) पनवेल …

Read More »

एएससी कॉलेजमध्ये कर्मवीर जयंती साजरी

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 132 जयंती रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाळांमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. त्याअंतर्गत रयतच्या महात्मा फुले महाविद्यालयात जयंती कार्यक्रमाचे आणि विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे बुधवारी (दि. 25) आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा रयत शिक्षण संस्थेचे …

Read More »

लोणीवली येथे शेकापला धक्का ; अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याअंतर्गत पनवेल तालुक्यातील लोणीवली येथील शेकापच्या अनेक कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. 24) भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. हा सोहळा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. विचुंबे येथे झालेल्या या पक्षप्रवेशात …

Read More »

लक्ष्मी आय समूहामध्ये चिमुरडीवर यशस्वी शस्त्रक्रिया

पनवेल : रामप्रहर वृत्त लक्ष्मी आय समूहामध्ये असलेल्या आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे एका चिमुरडीच्या डोळ्यांवरील शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली असून, या मुलीची 80 टक्के दृष्टी परत आली आहे. इंदापूर, पुणे येथे राहणार्‍या निकिता सकपाळ (वय 5 वर्षे) हिच्या उजव्या डोळ्याला दुखापत झाली होती व त्यामुळे या डोळ्याची तिची फक्त एक टक्के …

Read More »