उरण ः वार्ताहर उरण नगर परिषद यांच्या वतीने कृष्ण जन्माष्टमी शनिवारी (दि. 24) सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत महाराष्ट्र भूषण डॉ. नारायण विष्णू धर्माधिकारी उरण नगर परिषद मराठी शाळा क्र. 1 व 2, पेन्शनर पार्क, उरण येथे साजरी होणार आहे. उरण तालुक्यातील गोविंदा पथकांना आर्थिक मदत म्हणून सलामी देणार्या …
Read More »गुळसुंदे येथे उद्या मराठा समाजाचा सत्कार सोहळा
पनवेल ः रामप्रहर वृत्त रसायनी पातळगंगा विभाग श्री नाईक मराठा समाज व सकल मराठा यांच्या वतीने मराठा आरक्षण लढ्यातील लढवय्ये शिलेदारांचा जाहीर सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व जात प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम रविवारी (दि. 25) शंकर मंदिर गुळसुंदे येथे होणार आहे, अशी माहिती अध्यक्ष महादेव कचरे, सेक्रेटरी राजेंद्र दसवंते यांनी दिली. …
Read More »खांदा कॉलनीत रंगली अभंगवाणी ; लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती
पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री रामशेठ ठाकूर विकास मंडळ व सकाळ वृत्तपत्र समूह यांच्या माध्यमातून आयाजित ‘सकाळ प्रिमीयर नाते तुमचे आमचे’ हा कार्यक्रम खांदा कॉलनी येथील श्रीकृपा हॉलमध्ये गुरुवारी (दि. 22) झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या कार्यक्रमात अभंग वाणी, महिलांसाठी खेळ पैठणीचा …
Read More »रोडपाली स्मशानभूमीत स्वच्छता मोहीम; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनंतर त्वरित कार्यवाही
पनवेल ः रामप्रहर वृत्त रोडपाली येथील स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढल्याने जंगलाचे स्वरूप प्राप्त झाले होते. शुक्रवारी (दि. 23) सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या ठिकाणी पाहणी केली. त्या अनुषंगाने महापालिकेचे आरोग्य निरीक्षक दौलत शिंदे यांना हा परिसर स्वच्छ करण्याचे सूचित केले. त्यानंतर काही तासातच महापालिकेने स्वच्छता मोहीम राबवून …
Read More »मोरू नारायण म्हात्रे विद्यालयात फुटली ‘चॉकलेट’हंडी
उलवे नोड ः रामप्रहर वृत्त मोरू नारायण म्हात्रे विद्यालय, उलवे नोड, पूर्व प्राथमिक शाखेत कृष्ण जन्माष्टमीनिमित्त चॉकलेट हंडी फोडण्यात आली. चिमुरड्या राधा-कृष्णने नृत्य सादर केले ’कृष्णा’ अॅनिमेटेड चित्रपटातील दहीहंडी दृश्य पाहताना विद्यार्थ्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. या प्रसंगी विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर, मुख्याध्यापिका नम्रता न्यूटन, सेकंडरी पर्यवेक्षक भरत जितेकर यांची …
Read More »प्रा. डॉ. संदीप घोडके यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
पनवेल ः रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील रहिवासी व रयत शिक्षण संस्थेत कार्यरत असलेले प्रा. डॉ. संदीप विलासराव घोडके यांना भारत सरकारच्या यूजीसी व नॅक यांच्याद्वारे मान्यता प्राप्त असा डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नावाने जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार बेंगलोरस्थित आयआयएसईआरमार्फत भव्य अशा कार्यक्रमात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. डॉ. संदीप विलासराव …
Read More »किसान मानधन योजनेचा लाभ घ्या ; तहसीलदार अमित सानप यांचे शेतकर्यांना आवाहन
पनवेल ः बातमीदार प्रधानमंत्री किसान मानधन योजना (पीएम-केएमडीवाय) संपूर्ण देशात सुरु करण्यात आली असून 18 ते 40 वयोगटातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी पात्र आहेत. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकर्यांनी लाभ घेण्याचे आवाहन पनवेलचे तहसीलदार अमित सानप यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक …
Read More »पनवेल मनपा देणार गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार
समन्वय समितीच्या बैठकीत महापौरांची घोषणा पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेने गुरुवारी (दि. 22) सकाळी 10 वाजता आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात गणेशोत्सव 2019 समन्वय समितीची बैठक बोलावली होती. या बैठकीत महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी यंदापासून महानगरपालिका क्षेत्रातील उत्तम देखावे सादर करणार्या गणेशोत्सव मंडळांना यावर्षीपासून पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल, …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांची ‘रोज बाजार’ला भेट
पनवेल : प्रतिनिधी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गुरुवारी पनवेलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील रोज बाजाराला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. त्या ठिकाणी असलेले खड्डे भरून घेण्यास आणि किरकोळ दुरुस्त्या तातडीने करून घेण्यास महापालिका अधिकार्यांना सांगितले. पनवेल महापालिका हद्दीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील रोज बाजाराला गुरुवार 22 ऑगस्ट रोजी …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते दगड खाण व क्रशर मालक-चालक संघटनेच्या कार्यालयाचे भूमिपूजन
पनवेल ः रामप्रहर वृत्त जेएनपीटी महामार्गलगत कुंडेवहाळ येथे उभारण्यात येणार्या पनवेल तालुका दगड खाण व क्रशर मालक-चालक संघटनेच्या कार्यालयाचे भूमिपूजन गुरुवारी (दि. 22) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रायगड जिल्हा दगड खाण व क्रशर मालक-चालक संघटनेचे अध्यक्ष जे. एम. म्हात्रे, तालुका अध्यक्ष सुनील भोईर, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper