Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

‘कर्मवीरांचे शैक्षणिक योगदान मोलाचे’ रिटघर विद्यालयात जयंती साजरी; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा काढल्या. त्यामुळे गरिबांची मुले शिकली. शिक्षण क्षेत्रातील कर्मवीरांचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्या शैक्षणिक कार्यामुळेच आज महाराष्ट्रातील अनेक पिढ्या घडल्या आहेत, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केले. शुक्रवारी श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ …

Read More »

महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1ची भाजपची कार्यकारिणी जाहीर

पनवेल ः महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1ची भाजपची कार्यकारिणी जाहीर झाली असून, लोकनेते रामशेठ ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. कार्यकारिणीत अध्यक्ष नंदकुमार म्हात्रे, सरचिटणीस रमेश लडकू, सरचिटणीस भगवान कोपरकर, उपाध्यक्ष कालूराम गोंधळी, उपाध्यक्ष पांडुरंग निघुकर, चिटणीस …

Read More »

अजिवली आरोग्य केंद्रात कॅन्सरविषयक मार्गदर्शन

पनवेल ः रामप्रहर वृत्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंती निमित्त असंसर्गजन्य रोग प्रतिबंध जागरूकता अभियान 2019 अंतर्गत, मुख, स्तन व गर्भपिशवीच्या तोंडाच्या कॅन्सरबद्दल बीके डॉ. शुभदा नील यांचे प्राथमिक आरोग्य केंद्र, अजिवली, पनवेल येथे मार्गदर्शन झाले. सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त असंसर्गजन्य रोग …

Read More »

गुळसुंदे विद्यालयात शैक्षणिक अ‍ॅप; कृणाल पाटील यांचे दातृत्व

पनवेल ः रामप्रहर वृत्त आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञानाचा वापर सर्व ठिकाणी पाहायला मिळत आहे. शिक्षण क्षेत्रात देखील तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शाळांमध्ये अध्यापन-अध्ययन करीत आहेत. विद्यार्थ्याने अभ्यासासाठी तंत्रज्ञानचा वापर करावा, या उद्देशाने तुंगारतन विभाग विद्यामंदिर गुळसुंदे या विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य अनिल पाटील यांनी ब्रिक्सलिएन्ट या संस्थेच्या माध्यमातून शाळेला शैक्षणिक अ‍ॅपची …

Read More »

पनवेलमध्ये घुमतोय भाजपचा नारा!

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयी हॅट्ट्रिकचा कार्यकर्त्यांचा निर्धार पनवेल : रामप्रहर वृत्त चला आणू या आपले सरकार, या शीर्षकाखाली पनवेल विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने बैठकांचा धडाका लावला आहे. यामुळे शहरी पट्टा असो वा ग्रामीण भाग, सिडको वसाहती असो वा वाडी-वस्ती सर्वत्र भाजपचा झंझावात पाहावयास मिळत आहे. सिडको अध्यक्ष तथा …

Read More »

शेकापला आणखी एक दणका

आपटा दाभोलवाडीतील कार्यकर्ते भाजपमध्ये पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातील आपटा दाभोलवाडी येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीने प्रभावित होऊन भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे शेकापला आणखी एक दणका मिळाला आहे. मोहोपाडा येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजप राज्य परिषद सदस्य विनोद …

Read More »

भाजप भ्रष्टाचारविरोधी पक्ष : आ. प्रशांत ठाकूर

राष्ट्रवादीच्या सुभाष पाटील यांचा पक्षप्रवेश पनवेल : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष हा भ्रष्टाचार मोडित काढणारा पक्ष आहे. त्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत, असे प्रतिपादन सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 26) बेलवली येथे केले. ते कार्यकर्ता बैठकीत बोलत होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी नेते …

Read More »

सुकापूरमधून मताधिक्य देणार; बैठकीत उपस्थितांचा निर्धार

पनवेल ः रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीसंदर्भात भाजप पनवेल तालुका मंडलच्या वतीने ठिकठिकाणी बैठका होत असून या बैठकींना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. सुकापूर येथे राजेश पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला प्रतिसाद मिळाला. या वेळी बहुसंख्य कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला. उपस्थितांनी सुकापूरमधून आमदार प्रशांत ठाकूर यांना मताधिक्य देण्याचा निर्धार केला. या बैठकीला …

Read More »

नरेश म्हात्रे उरण तालुका भाजप चिटणीसपदी

उरण ः वार्ताहर येथील शेकाप कार्यकर्ते नरेश म्हात्रे यांनी आपल्या 85 कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. उरण करंजा रोडवरील गणेश नगर नं. 2 येथील लोकांना विश्वासात घेऊन त्यांना भाजप पक्षात प्रवेश देण्यात आला. आता नरेश म्हात्रे यांची उरण तालुका भाजप चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. जेएनपीटी विश्वस्त तथा भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस …

Read More »

पनवेल रेल्वेस्टेशनवरून लवकरच प्री-पेड रिक्षा

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल रेल्वेस्टेशनचे प्रबंधक एस. एम. नायर यांच्या पुढाकाराने पनवेल स्टेशनवर रिक्षावाल्यांसाठी स्वतंत्र मार्गिका सुरू करण्यात आली असून लवकरच तेथून प्री-पेड रिक्षा सुरू होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या रिक्षावाल्यांबाबतच्या तक्रारी कमी होतील आणि त्यांची फसवणूक होणार नाही. याबद्दल प्रवासी संघटनेने त्यांचे आभार मानले. पनवेल रेल्वेस्टेशनवरून  प्रवाशांकडून रिक्षावाले जास्त भाडे …

Read More »