Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

नाशिकमध्ये नूतन शाळा इमारतीचे रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

सिन्नर : रामप्रहर वृत्त नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील पांगरी येथील श्रीसंत हरिबाबा विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 27) करण्यात आले. ‘रयत’चे व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास उत्तर विभागीय सल्लागार समितीचे अध्यक्ष दादाभाऊ …

Read More »

पनवेलमध्ये पर्यावरणपूरक गणपती कार्यशाळा

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष प्रभाग क्रमांक 19च्या वतीने ‘माय इकोफ्रेंडली बाप्पा’ या शीर्षकाखाली पर्यावरणपूरक गणपती कार्यशाळा 31 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. हल्ली पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे भाविकांचा कल वाढला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील मिडलक्लास हौसिंग सोसायटीतील श्रीगणेश मंदिर सभागृहात ही कार्यशाळा होणार असून, नाव नोंदणीची अंतिम तारीख …

Read More »

पनवेल महानगरपालिकेतील ग्रामपंचायत कर्मचार्यांना दिलासा

उरण : रामप्रहर वृत्त पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे पनवेल महानगरपालिकेमध्ये समावेशन होण्यासाठी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 27) म्युनिसिपल एम्लॉईज युनियनच्या पदाधिकार्‍यांसोबत नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या वेळी म्हैसकर यांनी या विषयावर त्वरित कार्यवाही करून आठवडाभरात निर्णय घेण्याचे मान्य …

Read More »

ग्रामीण मुलींना स्वसंरक्षणाचे धडे; 200 विद्यार्थिनींना प्रशिक्षण

पनवेल ः प्रतिनिधी टाटा स्टील बीएसएलने जिल्ह्यातील खोपोली येथील आपल्या प्रकल्पाच्या आजूबाजूच्या गावांमधील मुलींना जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.  आजच्या काळात मुलींच्या सक्षमतेसाठी अतिशय आवश्यक असा हा समाजोपयोगी उपक्रम जिल्हा पोलीस प्रशासनाच्या सहयोगाने राबविला जाणार आहे. जमशेदपूर येथे आशिया खंडातील पहिल्या स्टील प्रकल्पाच्या उभारणीत ज्यांनी …

Read More »

कापडी मखरांना मागणी; पनवेलमधील बाजारपेठा सजल्या

पनवेल ः रामप्रहर वृत्त गणेशोत्सवासाठी अवघे मोजकेच दिवस उरले असल्याने पनवेलमधील बाजारपेठा मखर, सजावट व पूजेच्या साहित्याने फुलल्या आहेत. थर्माकोल बंदी असल्याने आता कापडी मखरांबरोबर लाकडी मखर मोठ्या प्रमाणात दाखल झाले असून विविध रंगसंगती व नक्षीकामांमुळे ते ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. घरगुती गणपतींसाठी आकर्षक मूर्तीबरोबर सजावट व विद्युत रोषणाईवर गणेशभक्त …

Read More »

गणेशमूर्ती कार्यशाळेला प्रतिसाद; मूर्तिकार पद्मजा कुलकर्णी यांचे आयोजन

पनवेल ः बातमीदार स्वतःच्या हाताने गणेशमूर्ती करण्याचा आनंद मिळावा आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचा प्रसार हे उद्दिष्ट ठेवून खांदा कॉलनीमध्ये गणेशमूर्ती कार्यशाळेचेे आयोजन करण्यात आले. येथील प्रसिद्ध गणेशमूर्तीकार पद्मजा कुलकर्णी यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले. त्यांच्यासह सुमीत वाघुळकर यानी सहभागींना मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांबरोबरच युवक व ज्येष्ठ नागरिकही मोठ्या उत्साहाने या …

Read More »

कामोठे विभागातील खड्डे बुजवा ःअरुणकुमार भगत

पनवेल ः रामप्रहर वृत्त कामोठे विभागातील अंतर्गत रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे, त्यातच पावसाळ्याचे दिवस असल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे, यामुळे अपघतांची शक्यता आहे, हे खड्डे तातडीने भरावेत, अशी मागणी पनवेल महानगर पालिकेचे नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांनी सिडकोच्या कामोठे विभाग कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनातून केली आहे. कामोठे विभागातील रस्त्यांवर …

Read More »

उरण महाविद्यालयामध्ये शेअर बाजारावर कार्यशाळा

उरण ः रामप्रहर वृत्त कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयामध्ये सोमवारी (दि. 26) व्यवसाय मार्गदर्शन केंद्र आणि अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यामाने आणि प्रिटिजन टेक्नॉलॉजीचे अमित आमले आणि श्री. गणेश यांच्या सहकार्याने शेअर बाजारातील व्यवसाय आणि नोकरीची संधी याविषयी कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन अमित आमले यांच्या हस्ते …

Read More »

सरकारी कंपन्या व कामगार वाचवा!; कामगारविरोधी धोरणाबाबत निवेदन

पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय मजदूर पोर्ट अ‍ॅण्ड डॉक मजदूर संघाचे उपाअध्यक्ष व जेएनपीटी जनरल कामगार संघाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्यासह अनेक संघटना तसेच कामगारांच्या वतीने ‘सरकारी कंपन्या व कामगार वाचवा’ व कामगारांच्या प्रश्नासंदर्भात जेएनपीटीत मंगळवारी दि.27) जोरदार निदर्शने केली.  जेएनपीटीचे मुख्य व्यवस्थापक जयवंत ढवळे आणि उपव्यवस्थापक संजीव पगारे यांच्याकडे …

Read More »

खांदा वसाहतीतील ज्येष्ठ नागरिकांकडून पूरग्रस्तांना आधार

पनवेल ः रामप्रहर वृत्त  खांदा वसाहतील आझाद ज्येष्ठ नागरिक संस्था विविध सामाजिक उपक्रम राबवते. यामधील सभासदांनी कोल्हापूर व  सांगली येथील पूरग्रस्तांकरिता एक पाऊल पुढे टाकत आर्थिक मदत जमा केली आणि त्याचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता प्रभाग समिती सभापती संजय भोपी यांच्या माध्यमातून सोमवारी (दि.26) सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे …

Read More »