Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

बेकायदा नदीपात्रात कचरा टाकल्याप्रकरणी कारवाईची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त ग्रुपग्रामपंचात चावणे गावातील व परिसरातील कंपन्यांमधून जमा होणारा कचरा बेकायदा नदीपात्रात टाकत आहेत. याबाबत संदीप लहू पाटील यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कारवाईची मागणी करणारे निवेदन दिले आहे. ग्रामपंचायत परिसरातून घंटागाडीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कचरा जमा केला जातो, पण त्याची विल्हेवाट लावण्यासाठी चावणे …

Read More »

कोपर येथे पाण्याच्या पंपाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त गेल्या काही काळापासून कोपर गाव येथे पाण्याचा तुटवडा येथील नागरिकांना भासत होता. या समस्येची दखल घेत गव्हाण ग्रामपंचायतीच्या शेषफंडातून पाण्याचा पंप, तसेच पाईप लाईन बसविण्यात आली आहे. या पंपाचे लोकार्पण पनवेल पंचायत समिती सदस्या तथा भाजप महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. …

Read More »

फडके विद्यालयात व्यक्तिमत्त्व विकास व करिअर मार्गदर्शन कार्यशाळा

पनवेल : रामप्रहर वृत्त गेल्या अनेक दशकांपासून मुलांवर चांगले संस्कार व शिक्षण क्षेत्रात रायगड जिल्ह्यात अग्रेसर असलेले आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके विद्यालय, नवीन पनवेल येथे नुकतेच व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर कार्यशाळा मोठ्या उत्साहात झाली. व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेचे मार्गदर्शक बँक ऑफ महाराष्ट्र, नवीन पनवेल शाखेचे विशेष सहाय्यक अरविंद मोरे उपस्थित …

Read More »

उरणमध्ये कोचिंग क्लासमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष

उरण ः रामप्रहर वृत्त सूरत येथे कोचिंग क्लासला आग लागल्याची दुर्दैवी घटना घडून त्यात 22 मुलांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कोचिंग क्लासेसच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अशाप्रकारचे उरणमध्ये अनेक कोचिंग क्लासेस आहेत. त्यांचे फायर ऑडिट होत नाही. आग लागली तर बाहेर पडायला जागा नाही. पालकांकडून भरमसाठ फी आकारूनसुद्धा उरणमध्ये …

Read More »

पनवेल-उरणमधील तिघांना पुरस्कार

उरण : प्रतिनिधी हिंदवी स्वराज्य संघटनेच्या अकराव्या वर्धापन दिनानिमिताने मुंबई येथे नुकतेच विविध क्षेत्रांत उलेखनीय कामगिरी केलेल्या युवा व युवतींना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रातून 200 जणांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी गोपाळ दिनकर म्हात्रे (सारडे, ता. उरण) यांना क्रीडा व समाजसेवेतील प्रबोधनकार ठाकरे समाजसुधारक पुरस्कार 2019 …

Read More »

वनवासी आश्रमशाळेत दहीहंडी उत्सव

खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त संस्कार भारतीच्या पनवेल व नवीन पनवेल  शाखेच्या संयुक्त विद्यमाने श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहीहंडीचा कार्यक्रम नुकताच पनवेलजवळील चिंचवली येथील वनवासी कल्याण आश्रमशाळेच्या मुलांसोबत साजरा करण्यात आला. या वेळी आश्रमशाळेतील मुलांनी दहीहंडी फोडली, तसेच वैयक्तिक व सामूहिक गाणी म्हणून उपस्थितांचे मनोरंजन केले. कार्यकर्त्यांनीही विविध खेळ व गाणी …

Read More »

गणेशोत्सव कायदा व सुव्यवस्थेचे भान ठेवून साजरा करा -तानवडे

मोहोपाडा : वार्ताहर गणेशोत्सव आनंदात साजरा करताना कायदा व सुव्यवस्थेवे भान ठेवा, असे आवाहन रसायनी पोलीस ठाण्याच्या सभागृहात खालापूर तालुक्याचे डीवायएसपी डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी केले. या वेळी गणेश मंडळाचे पदाधिकारी, शांतता कमिटी सदस्य व डीजे चालकांसह इतर नागरिक मोठ्या …

Read More »

पनवेल महापालिका खरेदी करणार 20 मोबाइल टॉयलेट

स्थायी समितीच्या सभेत मंजुरी पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा मंगळवारी (दि. 27) सभापती प्रवीण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मनपा सभागृहात झाली. या वेळी विविध विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली. स्वच्छ भारत अंतर्गत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. यांच्या …

Read More »

नाशिकमध्ये नूतन शाळा इमारतीचे रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

सिन्नर : रामप्रहर वृत्त नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील पांगरी येथील श्रीसंत हरिबाबा विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 27) करण्यात आले. ‘रयत’चे व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास उत्तर विभागीय सल्लागार समितीचे अध्यक्ष दादाभाऊ …

Read More »

पनवेलमध्ये पर्यावरणपूरक गणपती कार्यशाळा

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष प्रभाग क्रमांक 19च्या वतीने ‘माय इकोफ्रेंडली बाप्पा’ या शीर्षकाखाली पर्यावरणपूरक गणपती कार्यशाळा 31 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. हल्ली पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे भाविकांचा कल वाढला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील मिडलक्लास हौसिंग सोसायटीतील श्रीगणेश मंदिर सभागृहात ही कार्यशाळा होणार असून, नाव नोंदणीची अंतिम तारीख …

Read More »