Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

ब्राह्मण सभेच्या वतीने पूरग्रस्तांना सहाय्य

पनवेल ः नवीन पनवेल येथील ब्राह्मणसभा या संस्थेच्या वतीने सांगली येथील पूरग्रस्तांना रोख व वस्तूरूपाने सहाय्य करण्यात आले. सांगली येथील हरिपूररोड नदीलगतच्या वस्तीमधे पाणी शिरल्याने अतोनात नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना सभेच्या सदस्यांनी सहाय्य केले. ब्राह्मण सभेच्या सदस्यांंनी स्वयंस्फूर्तीने जीवनावश्यक वस्तू व रोख रक्कम जमा करण्यास सुरुवात केली. वितरणाचा कार्यक्रम सांगली येथील …

Read More »

मनोज चव्हाण अचिव्हर्स पुरस्काराने सन्मानित

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगर पलिकतेचे स्वछता निरीक्षक मनोज चव्हाण यांना 2019चा नवी मुंबई अचिव्हर्स पुरस्कार नुकताच मिळाला आहे. नवी मुंबई आवाज या वृत्त वाहिनीच्या वतीने आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात नुकत्याच झालेल्या शानदार कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर, कामगार नेते महेंद्र घरत, महापालिका आयुक्त डॉ. गणेश देशमुख यांच्या …

Read More »

ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात

नवीन पनवेल ः रामप्रहर वृत्त ज्येष्ठ नागरिक संघ, नवीन पनवेल या संस्थेचा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन सोहळा संघाच्या नवीन पनवेल येथील सभागृहात साजरा झाला. या कार्यक्रमाला पुणेे विद्यापीठातून वृद्धकल्याणशास्त्र विषयात डॉक्टरेट प्राप्त केलेल्या डॉ. रोहिणी पटवर्धन या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते संघाच्या स्मरणिकेचे प्रकाशनही झाले.  वृद्धपणातील अखेरच्या टप्प्यातील आजारांवर …

Read More »

नाते तुमचे आमचे

सेलिब्रेटींशी पनवेलकरांनी साधला संवाद पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री रामशेठ ठाकूर समाजिक विकास मंडळ व सकाळ वृत्तपत्र समूह यांच्या माध्यमातून आयोजित सकाळ प्रिमीयर नाते तुमचे आमचे हा कार्यक्रम पनवेल येथील आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रविवारी (दि. 25) झाला. या कार्यक्रमास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती …

Read More »

पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना मागणी

पीओपीपेक्षा निम्म्याहून कमी किमती पनवेल ः बातमीदार गणेशोत्सवाला अवघे पंधरा दिवस उरले असून सध्या बाजारात गणेशमूर्ती घेण्यासाठी भक्तांची लगबग सुरू झाली आहे. पर्यावरणाला अधिक महत्त्व दिले जात असल्याने पर्यावरणपूरक म्हणजेच शाडूच्या मातीच्या मूर्तींना मागणी आहे. आठ इंचांपासून ते चार फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती बाजारात उपलब्ध आहेत. त्यांच्या किमती प्लास्टर ऑफ पॅरिसपेक्षा निम्म्याहून …

Read More »

द्रोणागिरी हायस्कूलची पूरग्रस्तांसाठी मदत फेरी

पनवेल ः रामप्रहर वृत्त द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा हे विद्यालयसुद्धा पुढे आले. या लोकांना मदत करण्यासाठी द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा या विद्यालयातील इयत्ता नववी आणि दहावीच्या वर्गातील स्काऊट आणि गाईड युनिटचे सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापिका प्रभू, शिक्षक डी. सी. पाटील, पी. ए. थळी आदी सर्व शिक्षक या सर्वांनी पुढाकार …

Read More »

पोलीस मित्र समन्वय समितीची कळंबोली पोलीस ठाण्याला भेट

कळंबोली ः रामप्रहर वृत्त महाराष्ट्र पोलीस मित्र समन्वय समिती, महाराष्ट्र राज्याच्या पदाधिकारी यांनी कळंबोली पोलीस स्टेशनचे शैलेश जाधव यांची भेट घेतली. आपल्या समितीचे कार्य याबद्दल चर्चा केली. शैलेश जाधव यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार सर्व सभासदांची माहिती त्यांना देण्यात आली. तसेच मुंब्रा येथे वाहतूक पोलिसांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात आला. कळंबोली …

Read More »

करंजा विद्यालयात दहीहंडी उत्सव

उरण ः द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा विद्यालयात दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवासाठी ज्युनि. आणि सिनी. के.जी. चे विद्यार्थी-विद्यार्थिनी श्रीकृष्ण आणि राधेची वेशभूषा करून आले होते. मुख्याध्यापिका सौ. प्रभू  यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. यामध्ये उत्कृष्ट राधा दिव्यांसी कोळी, उत्कृष्ट कृष्ण रोहित राणे यास तर राधा-कृष्ण …

Read More »

पनवेलच्या रस्त्यांवर लवकरच ट्रॅफिक वार्डन

पनवेल ः वार्ताहर अरुंद रस्त्यांचे शहर असलेल्या पनवेल शहरात वाहतूक सुरळीत राहण्यासाठी ट्रॅफिक वार्डन नेमण्याचा निर्णय पनवेल महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नुकताच घेण्यात आला. त्यामुळे लवकरच पनवेल शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या मदतीला वार्डन रस्त्यावर काम करणार आहेत. वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्तांनी 1 ऑक्टोबर 2018 रोजी वाहतूक कर्मचारी कमी असल्यामुळे महापालिकेने …

Read More »

उत्साह, थरार अन् जल्लोष! गोपाळकाल्याचा सण रायगडात साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त गोपाळकाल्याचा सण शनिवारी (दि. 24) रायगड जिल्ह्यात साजरा करण्यात आला. राज्यातील पूरपरिस्थितीमुळे काही दहीहंड्या रद्द झाल्या असल्या, तरी उर्वरित आयोजकांनी परंपरा जपत उत्सव साजरा केला. या वेळी गोविंदांचा उत्साह कायम असल्याचे दिसून आले. थरांवर थर लावून सलामी देत हंडी फोडल्यानंतर उपस्थित सर्वांनी एकच जल्लोष केला. रायगड …

Read More »