जेएनपीटी : प्रतिनिधी उरण तालुक्यातील वेश्वी येथे उभारण्यात आलेल्या डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वाराचे लोकार्पण निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. सरपंच विलास पाटील यांनी उरण परिसरात अनेक समाजाभिमुख उपक्रम राबवून आपल्या गावातील ग्रामस्थांना एका छत्राखाली आणण्याचे महान कार्य केले, तसेच त्यांना भेडसावणार्या समस्यांचे निवारण करण्याचे काम …
Read More »सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजानेे भावी वकील भारावले; भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची दिल्लीस शैक्षणिक सहल
गव्हाण : रामप्रहर वृत्त भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयातर्फे प्रथमच विद्यार्थ्यांची दिल्ली, कुलू-मनाली येथे शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली होती. या सहलीअंतर्गत विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संसद भवन येथील लोकसभा सभागृह, राज्यसभा सभागृह, मध्यवर्ती सभागृह पाहिले आणि तेथील विशेष प्रतिनिधीने सदर ठिकाणी विद्यार्थ्यांना इत्थंभूत माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मा. सर्वोच्च न्यायालयास …
Read More »श्रीलंका येथील कराटे स्पर्धेत युगल चौधरीला सुवर्णपदक
पनवेल : बातमीदार श्रीलंकेत झालेल्या कराटे स्पर्धेत खोपोली येथील युगल चौधरी याने सुवर्णपदक पटकावले आहे. त्यामुळे त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. श्रीलंका येथे इंडिया नेपाल श्रीलंका कराटे चाम्पियन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. खोपोली येथील आनंद स्कूल शाळेतून देवन्हावे येथील इयत्ता नववीत शिकणारा युगल जगदीश चौधरी (14) याला या कराटे …
Read More »श्रमयोगी मानधन योजनेमुळे असंघटित कामगारांना आधार
सिडको अध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने सर्व घटकांना दिलासा देण्यासाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केलेल्या आहेत.त्याच धर्तीवर आता देशातील असंघटित कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरू करण्यात आली असून, ती सर्व असंघटित कामगारांना मोठा आधार ठरणार असल्याचे …
Read More »मनपाच्या 92 लाख रुपये शिलकी बजेटला स्थायी समितीची मंजुरी
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेचा 92 लाख रुपये शिलकीच्या अर्थसंकल्पाला मंगळवारी झालेल्या स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता हा अर्थसंकल्प महासभेपुढे ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला असून आचारसंहिता लागण्यापूर्वी त्याला मंजुरी घेण्यासाठी लवकरच महासभा घेण्यात येणार असल्याचे समजते. पनवेल महापालिकेचा सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प शनिवारी (दि. 3) झालेल्या …
Read More »बाळगंगा प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळणार : आ. प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त पेण तालुक्यातील बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसंदर्भात तातडीने बैठकीचे आयोजन करण्याची मागणी सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी जलसंपदा मंत्री गिरिष महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी निवेदनात म्हंटले आहे की, पेण तालुक्यातील बाळगंगा धरण प्रकल्पामुळे तालुक्यातील …
Read More »उरणचे सामाजिक कार्यकर्ते भाजपत
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार्यांचा ओघ सातत्याने कायम आहे. त्याअंतर्गत उरणमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी मंगळवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश सोहळा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला असून, त्यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले. भारतीय जनता पार्टीने केलेली विकासकामे आणि पक्षाच्या …
Read More »प्राचीन केसरी कुस्ती स्पर्धेला प्रतिसाद
पनवेल : पनवेल तालुक्यात महाशिवरात्र विविध कार्यक्रम आयोजित करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त नेरे येथील श्री हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने ‘प्राचीन केसरी महासंग्राम’ या कुस्ती सामन्यांचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. या सामन्यांना सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. या वेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, …
Read More »मोतीलाल कोळी यांची तालुकाध्यक्षपदी निवड
पनवेल : रायगड जिल्हा कामगार आघाडीच्या पनवेल तालुका अध्यक्षपदी मोतीलाल कोळी यांची निवड करण्यात आली. भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते कोळी यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. या वेळी भाजपा कामगार आघाड़ी जिल्हा अध्यक्ष जितेंद्र घरत, भारतीय मजदूर संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेश पाटील, रोहा तालुका कामगार आघाडी अध्यक्ष रवींद्र …
Read More »पनवेल मनपाची विकासकामे जोरात
पनवेल : रामप्रहर वृत्त महापालिकेच्या वतीने महापालिका हद्दीमध्ये विविध विकासकामे सातत्याने करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत पनवेलमधील मच्छी मार्केटचे दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. पनवेल महापालिकेच्या माध्यमातून विविध विकासकामे सातत्याने करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने पनवेल कोळीवाडा येथील मच्छी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper