Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

ग्रंथालय प्रमाणपत्र प्रशिक्षण

उरण : रामप्रहर वृत्त येथील कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयात ग्रंथालय प्रमाणपत्र प्रशिक्षण देण्यात येत आहे. महाविद्यालयातील महिला विकास कक्ष, व्यवसाय मार्गदर्शन सेल, तसेच रायगड जिल्हा वाचनालय संघ व गोपाळकृष्ण वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने 2 एप्रिल ते 15 जून या कालावधीत शासन मान्यताप्राप्त हे प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्ग विद्यार्थ्यांसाठी …

Read More »

सोसायटीतील रहिवाशांची समस्या झाली दूर , नगरसेवक संजय भोपी यांचे प्रयत्न यशस्वी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्र 15, खांदा कॉलनीतील सेक्टर 7मधील श्रीजी संघ सोसायटीतील नागरिकांना सोसायटीच्या आवारातील ट्रान्सफार्मरमुळे जीव मुठीत घेऊन वास्तव्य करावे लागत होते. गेली 13 वर्षे एमएसईबीकडे सोसायटीतील पदाधिकारी ट्रान्सफार्मर शिप्टींगसाठी पाठपुरावा करत होते, परंतु एमएसईबी प्रशासन प्रतिसाद देत नव्हते, तसेच कामास दिरंगाई करीत होते. …

Read More »

‘त्या’ खुनाचा उलगडा करण्याचे पोलिसांपुढे आव्हान

पनवेेल : वार्ताहर पनवेलजवळील पळस्पे ते जेएनपीटी या एनएच 4 बी महामार्गावर डोंबाळे कॉलेजसमोर असलेल्या पुलाखाली 15 दिवसांपूर्वी एका इसमाचा अज्ञात कारणावरून अज्ञात आरोपींनी खून केला होता. या खुनाचा अद्यापही उलगडा न झाल्याने पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विनोेद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक (गुन्हे) निशिकांत विश्वकार व त्यांचे पथके …

Read More »

महिलांनो, स्वावलंबी बना! उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रेंचे आवाहन

उरण : वार्ताहर आधुनिक युगात समाज परिवर्तन घडत असून, या सामाजिक परिवर्तनाची कास धरून महिलांनी आता अबला न राहता सबला बनून उद्योगधंद्याच्या माध्यमातून स्वावलंबी व्हावे, असे आग्रही प्रतिपादन उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांनी गोवठणे केले. गोवठणे येथे वंदे मातरम सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थेने आयोजित केलेल्या हळदीकुंकू समारंभात त्या बोलत …

Read More »

‘तुझी शक्ती माझ्यात आणि माझी शक्ती तुझ्यात’

पार्थ पवार पुन्हा ट्रोल पुणे : प्रतिनिधी पहिले भाषण, पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख, उलट्या रेल्वेने प्रवास, विनाकारण पळापळ, मुंबई महामार्गावरून जात असल्याने मावळमधून निवडणूक लढवित असल्याचे सांगणे अशा एक ना अनेक गोष्टींवरून मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार अनेकदा ट्रोल झाले आहेत. या वेळी वादग्रस्त फादरची भेट घेतल्याने पार्थ टीकेचे …

Read More »

राष्ट्रवादीचे नेते घोटाळेबाज आणि जुलमी

आमदार प्रशांत ठाकूर यांचा हल्लाबोल पनवेल : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवघ्या पाच वर्षांच्या काळात लोकहिताच्या अनेक योजना आणून त्याची यशस्वी अंमलबजावणी केली. मग 50 वर्षे सत्ता भोगणार्‍या काँग्रेस-राष्ट्रवादीला सर्वसामान्यांसाठी योजना का आणता आली नाही? उलट काँग्रेस आघाडी सरकारमध्ये झालेल्या सिंचन घोटाळ्यामुळे शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा …

Read More »

भ्रष्टाचारी सुनील तटकरेंचे दिवस भरले : ना. अनंत गीते कडाडले

पेण : प्रतिनिधी राज्यातील 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यात ज्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते, मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीने ज्यांना नोटीस बजावलेली आहे, असे भ्रष्टाचारांचे आरोप असलेल्या उमेदवाराला रायगडचा खासदार बनवणार काय? खासदार कसा नसावा यांचे उत्तम उदाहरण मतदारांसमोर सुनील तटकरेच आहे. त्यामुळे मला आव्हानाची भाषा करणार्‍यांचे दिवस संपल्यात जमा आहेत. भ्रष्टाचारी …

Read More »

गेल्या महिनाभरात शरद पवारांची भेट घेतलेली नाही

निराधार वृत्ताचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून खंडन पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी गेल्या आठवड्यात मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली, अशी बातमी काही चॅनेलवर चालवली जात आहे. या वृत्ताचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी खंडन करून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना बहुमताने …

Read More »

राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत करण्याचा प्रश्नच येत नाही : रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त महायुतीचा उमेदवार निवडून आल्यावर आम्ही अभिमानाने विधानसभा निवडणुकीला मते मागू शकतो. लोकसभा ही विधानसभेची सेमीफायनल आहे. त्यामुळे घरचे टाकून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत करण्याचा प्रश्नच येत नाही, अशा स्पष्ट शब्दांत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपली भूमिका मांडली आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

खा. श्रीरंग बारणेंना उत्स्फूर्त प्रतिसाद; अबोली रिक्षा महिला संघटनांनी घेतली भेट

पनवेल ः वार्ताहर  मावळ लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आज पनवेल परिसरातील ग्रामीण भागात प्रचारासाठी आले असताना अबोली रिक्षा महिला संघटनांनी त्यांची भेट घेवून त्यांच्या समोर त्यांच्या समस्या मांडल्या. यावेळी खा.श्रीरंग बारणे यांची अबोली महिला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार संतोष भगत, सचिव विलास मोरे, उपाध्यक्षा शालिनी गुरव, खजिनदार …

Read More »