पनवेल : वार्ताहर बनावट नोटा शोधून देण्याच्या बहाण्याने दोघा भामट्यांनी एका महिलेजवळची एक लाख रुपयांची रोख रक्कम आपल्याकडे घेऊन त्यातील 38 हजार रुपयांच्या नोटा हातचलाखी करून चोरून पलायन केल्याची घटना कळंबोली सेक्टर-11मधील स्टेट बँकेत घडली. कळंबोली पोलिसांनी या भामट्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणात …
Read More »वाचनालयाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील दगडी शाळेजवळ नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या नगरसेवक निधीतून वृत्तपत्र वाचनालय व ज्येष्ठ नागरिक कट्टा उभारण्यात आला असून, त्याचे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते …
Read More »शिवमंदिरात भक्तांची मांदियाळी
पनवेल : लक्ष्मण ठाकूर हर हर महादेव, जय भोलेनाथ… अशा जयघोषाने पनवेल शहर आणि परिसरातील शिवमंदिरे सोमवारी (दि. 4) दणाणून गेली होती. निमित्त होते महाशिवरात्री सोहळ्याचे. दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही महाशिवरात्रीचा सोहळा सर्वत्र उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. सर्वच शिव मंदिरांत शंभू महादेवाच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती.त्यामुळे सारे …
Read More »श्रीलंका सहलीच्या निमित्ताने पनवेलकरांची फसवणूक
पनवेल : सहलीनिमित्त पनवेलवरून श्रीलंकेसाठी रवाना झालेल्या शेकडो पर्यटकांची एका ट्रॅव्हल्स एजन्सीने फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पनवेल तालुक्यातील 350 पर्यटक पनवेलवरून चेन्नई या ठिकाणी पोहचल्यानंतर त्यांची पुढील प्रवासाची श्रीलंकेची तिकिटे रद्द झाल्याचे कळल्याने हा प्रकार उघडकीस आला. यामुळे शेकडो पर्यटकांना विमानतळावर 24 तास ताटकळत थांबावे लागले.भारतयात्रा ट्रॅव्हल्स कंपनीमार्फत …
Read More »अलिबागचा सफेद कांदा उरण बाजारात
उरण :अलिबाग तालुक्यातील गुणकारी सफेद कांदा उरण शहरात दाखल झाला असून कांद्याला मागणी वाढली आहे. उरणवासीय कांदा खरेदी करताना दिसत आहेत.भातशेतीची कापणी झाल्यानंतर काहीच दिवसांनी सफेद कांद्याची लागवड केली जाते. डिसेंबर महिन्यात कांद्याचे पीक येते. डिसेंबर महिन्याच्या शेवटी अलिबाग, पेण, वडखळ नाका आदी ठिकाणी सफेद कांद्याच्या माळा विकावयास आलेल्या दिसतात. …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन
खारघर : खारघर येथील रामशेठ ठाकूर महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मॉडल मेकिंग स्पर्धा, वैज्ञानिक रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या गेल्या. विज्ञान विभागातर्फे विज्ञानावर आधारित मासिकाचे प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील, प्राचार्य डॉ. एस.टी. गडदे तसेच विभागप्रमुख …
Read More »सोनारीचे जागृत फदलेश्वर शंकर मंदिर
उरण : महाशिवरात्री सोमवारी (दि. 4)असल्याने उरण तालुक्यातील सोनारी गावाजवळील स्पीडी सीएफएससमोर उंचावर सुंदर फदलेश्वर शंकर मंदिर असून सोनारी गावचे कृष्णा हरी तांडेल, महादेव हरी तांडेल व शंकरशेठ हरी तांडेल यांनी ते बांधले आहे. गेली 25 वर्षांपासून दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त सात दिवस अगोदर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सदर मंदिर हे …
Read More »आज घुमणार ‘हर हर महादेव’चा जयघोष
उरणच्या शिवमंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन जेएनपीटी : उरण तालुक्यातील चिरनेर, जासई, कळंबुसरे, पिरकोण, आवरे, खोपटा, शेवा, देऊळवाडी (उरण शहर), केगाव, कोटगाव (रेल्वे स्टेशन), घारापुरी, करळ या गावांतील बारा शिवमंदिरे सध्या भाविकांची श्रध्दास्थान बनली आहेत. यावर्षी महाशिवरात्र उत्सव हा सोमवारी (दि. 4) येत असल्याने तालुक्यातील ही शिवमंदिरे महाशिवरात्र …
Read More »पनवेलमध्ये भाजपची विजयी संकल्प बाईक रॅली; आमदार प्रशांत ठाकूर यांचे नेतृत्व; युवाशक्तीचा एल्गार
पनवेल : प्रतिनिधी भारतमाता की जय, वंदे मातरम, जय भवानी जय शिवाजी, शिवाजी महाराज की जय, अब की बार फिर मोदी सरकार… अशा घोषणांनी रविवारी (दि.3) सकाळी पनवेल शहर आणि तालुक्याचा परिसर दणाणून गेला. निमित्त होते पनवेल शहर आणि तालुका भाजपतर्फे काढण्यात आलेल्या भाजप विजयी संकल्प बाईक रॅलीचे. जिल्हाध्यक्ष आमदार …
Read More »द जेनेक्स जिमचे उद्घाटन
पनवेल : तालुक्यातील करंजाडे येथे ‘द जेनेक्स जिम’ नव्याने सुरु झाली आहे. या जिमचे उद्घाटन सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. या वेळी युवा नेते अजय साबळे, सागर आंग्रे, अनिल गायकवाड, करण तांडेल, अमोल जाधव, जनार्दन फडके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper