Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

महाड येथे आरपीआय (डे)ची अभिवादन सभा

पनवेल : वार्ताहर: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटीक रायगड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची जाहीर सभा रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली महाड येथे क्रांतीदिनानिमित्त अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती. प्रथम महाड येथील चवदार तळ्यावरील  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सभेला सुरूवात करण्यात आली. . रायगड जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी यापुढे गट-तट …

Read More »

नानोशी येथे शिवाजी महाराज जन्मोत्सव

पनवेल : बातमीदार : तालुक्यातील नानोशी येथील शिवसंग्राम प्रतिष्ठान यांच्यावतीने शनिवारी (दि. 23) सकाळी 9.30 वाजता तिथीनुसार   छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील नागरिकांसह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  सकाळी साडेनऊ वाजता शिवपूजन व शिवआरती करण्यात आल्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी …

Read More »

नवी मुंबई मेट्रोच्या डब्यांची एप्रिलमध्ये चाचणी

पनवेल : बातमीदार : बेलापूर ते पेंदार या नवी मुंबईतील पहिल्या मेट्रो मार्गासाठी लागणार्‍या दोन मेट्रोच्या सहा डब्यांची जुळवाजुळव करण्याचे काम येत्या काळात पूर्ण होणार असून एप्रिल माध्यापर्यंत  डेपोमध्येच दोन मेट्रोची चाचणी पूर्ण केली जाणार आहे. या मार्गावरील अद्याप स्टेशन बांधली गेलेली नाहीत. ती येत्या सहा महिन्यात बांधली जातील असा …

Read More »

नगरसेविका यास्मिन गॅस यांची मुंबई विद्यापीठ सदस्यपदी निवड

उरण : नगर पालिकेच्या माजी आरोग्य सभापती तथा भाजपाच्या नगरसेविका  यास्मिन मो. फाईक गयास यांची नगरपरिषद कडून मुंबई विद्यापीठाच्या सदस्या पदी निवड झाल्याने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.तसेच  भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटी बंदराचे ट्रस्टी महेश बालदी, नगराध्यक्षा सौ सायली म्हात्रे,थैमान तुंगेकर तसेच मुस्लिम सेवा संघ …

Read More »

वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत; चौघांविरोधात गुन्हा दाखल

पनवेल : बातमीदार : आदई सर्कल, नवीन पनवेल येथे ब्रेथ अनालायझर मशीन मध्ये फुंकर मारण्यास नकार देऊन वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत घालणार्‍या चौघांविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सुनील रामेश्वर सोनी (29, सुकापूर) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आदई सर्कल येथे …

Read More »

भाजपपाठोपाठ शिवसेनेची पहिली यादी जाहीर

मुंबई : प्रतिनिधी मित्रपक्ष भाजपपाठोपाठ शिवसेनेने लोकसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी शुक्रवारी (दि. 22) जाहीर केली. शिवसेनेने आपल्या कोट्यातील 23 पैकी पालघर आणि सातारा वगळता सर्व मतदारसंघांतील उमेदवार घोषित केले आहेत. शिवसेनेने जाहीर केलेल्या 21 लोकसभा उमेदवारांच्या यादीत अपेक्षेप्रमाणे तुरळक अपवाद वगळता सर्वच जागांवर विद्यमान खासदारांना उमेदवारी मिळाली आहे. सातारा …

Read More »

छत्रपतींचा अवमान करणार्यांना जनताच धडा शिकवेल

भाजप नेते महेश बालदी यांचा हल्लाबोल पनवेल : रामप्रहर वृत्त स्वार्थ आणि सत्तेसाठी इतर पक्षांच्या वळचणीला गेलेली शेकापची मंडळी कोणताच मुद्दा शिल्लक नसल्याने आता जातीयवाद करू लागली आहेत, परंतु भाजप, शिवसेनेने अशा गोष्टींना कधीही थारा दिला नाही. शेकाप तिकीट नाकारतो म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या तस्वीरीची शपथ घेऊन भाजपमध्ये आलेले एका …

Read More »

पनवेल मार्केटमध्ये तुकाराम बीज उत्सव

पनवेल : विठ्ठलाच्या जयघोषात आणि तुकोबाच्या सुरेल अभंगात पनवेल मार्केटमध्ये तुकाराम बीजोत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तुकाराम महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांनीही मोठी गर्दी केली होती.

Read More »

गव्हाण कोपर हनुमान मंदिरात तुकाराम बीज उत्सव

गव्हाण : गव्हाण कोपर येथील हनुमान मंदिरात दरवर्षीप्रमाणे तुकाराम बीज उत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. या वेळी पं. स. सदस्य रत्नप्रभा घरत,  सरपंच हेमलता म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य विजय घरत, योगिता भगत, उषा देशमुख, माई भोईर उपस्थित होते.

Read More »

विश्वास काथारा यांची निवड

पनवेल : तालुक्यातील नेवाळी येथील ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती अध्यक्षपदी विश्वास आत्माराम काथारा यांची निवड करण्यात आली.त्याबद्दल पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी त्यांचे अभिनंदन केले. सोबत आदईचे उपसरपंच योगेश पाटील, नगरसेवक अनिल भगत, मयूर ठाकूर, अनंत तुकाराम काथारा हे दिसत आहेत.

Read More »