Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

शांतीवनमध्ये निवासी शिबिरास प्रतिसाद

नेरे : रामप्रहर वृत्त गांधी स्मारक निधी मुंबई पुरस्कृत निवासी शिबिर शांतीवन येथे आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन कुष्ठरोग निवारण समिती शांतीवनचे प्रशासकीय अधिकारी उरणकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शिबिर मार्गदर्शक शुभदा शर्मा,  शांतीवन समन्वयक संजय गुळुंबकर, प्रशिक्षक परमेश्वर नवले, शिवाजी बार्शी आदी  उपस्थित होते. संजय गुळुंबकर …

Read More »

भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात फूड फेस्ट ; शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी शैक्षणिक कार्यक्रमांसोबतच शिक्षणेतर कार्यक्रमसुध्दा आयोजित करण्यात येतात. त्यानुसार महाविद्यालयात प्रथमच फूड फेस्ट-2019चे आयोजन करण्यात आले होते. फूड फेस्टचे उद्घाटन  ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट प्रा. लि.च्या संचालिका शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी …

Read More »

पार्थची उमेदवारी अद्याप निश्चित नाही : अजित पवार

पनवेल : वार्ताहर पार्थ पवार यांची उमेदवारी अद्याप निश्चित नाही. अंतिम यादी जाहीर झाल्यावर नाव जाहीर होईल, असे सूचक वक्तव्य पार्थ यांचे वडील आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. ते बुधवारी (दि. 13) पनवेल दौर्‍यावर आले असताना बोलत होते. अजित पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेलमध्ये हजेरी …

Read More »

शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांची नियुक्ती

पनवेल : महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाच्या सदस्यपदी शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांची नियुक्ती करण्यात आली. त्याबद्दल त्यांचे खासदार श्रीरंग बारणे, संपर्क नेते दत्ता दळवी, आमदार व जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांनी अभिनंदन केले.

Read More »

श्री सद्गुरू वामनबाबा महाराज यांची 61व्या पुण्यतिथी

तळोजा मजकूर (ता. पनवेल) : श्री सद्गुरू वामनबाबा महाराज यांच्या 61व्या पुण्यतिथीनिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दर्शन घेतले.

Read More »

प्रचंड मताधिक्क्याने विजयी होणार

पनवेल : वार्ताहर नगरपालिकेच्या निवडणुकीसह आमदारकी व खासदारकीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने मला पाडण्यासाठी व प्रामुख्याने अजित पवारांनी अटोकाट प्रयत्न केले, परंतु ते एकदाही यशस्वी झाले नाहीत. ही माझी आठवी निवडणूक असून या निवडणुकीतसुद्धा मागील मताधिक्क्यापेक्षा जास्त मते घेऊन मी निवडून येईल, असा ठाम विश्वास खासदार श्रीरंग बारणे यांनी बुधवारी (दि.13) खारघर …

Read More »

अवैध मद्याची वाहतूक करणार्‍या दोघांना पोलिसांकडून अटक

पनवेल : बातमीदार  पनवेल-मुंब्रा रस्त्यावर कळंबोली येथे पांढर्‍या रंगाच्या मारुती इर्टिगा गाडीमध्ये अवैध मद्याची वाहतूक करणार्‍या दोन आरोपींना कळंबोली पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 13 हजारांचे मद्य व वाहन जप्त करण्यात आले आहे. तुषार शालिक कडू (32, खारघर), शक्तीकुमार हरिनाथ मिश्रा (37, रोडपाली) अशी या आरोपींची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस …

Read More »

महिलांनी स्वयंसिद्ध होणे गरजेचे – डॉ. स्वप्ना पाटकर

खारघर ः रामप्रहर वृत्त आजच्या गतिमान जगात वावरायचे असेल तर महिलांनी स्वयंसिद्ध होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन डॉ. स्वप्ना पाटकर यांनी नुकतेच खारघर येथे केले.  जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून टाटा कॅन्सर हॉस्पिटल येथे टाटा हॉस्पिटल वर्कर्स युनियन आणि टाटा हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या वतीने हॉस्पिटलमधील महिला कर्मचारी व रुग्णांचे नातेवाईक यांच्यासाठी डॉ. …

Read More »

घराच्या वादातून चाकूचे वार; तरुण गंभीर जखमी

पनवेल : बातमीदार  विक्रोळी येथील घराच्या वादाच्या भांडणाचा राग मनात धरून 27 वर्षीय तरुणाला शिवीगाळी करून त्याच्या छातीवर तसेच पाठीवर चाकूने वार केल्याची घटना खारघर येथे घडली. खारघर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद अयाझ अब्दुल सैय्यद हे खारघर येथे राहत असून ते ड्रायव्हरचे काम करतात. विक्रोळी ईस्ट मुंबई …

Read More »

मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात ; सहा महिन्यांत वाहतूक सुरू होणार, चिनी बनावटीचे डबे दाखल

खारघर ः रामप्रहर वृत्त  सहा वर्षांपूर्वी बेलापूर ते पेंदार या मेट्रो रेल्वेमार्गाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. सिडकोने दक्षिण नवी मुंबईत पाच मेट्रो मार्गांचा आराखडा तयार केला आहे. यात बेलापूर ते पेंदार या मार्गाचा पहिला प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. 26 किलोमीटर लांबीच्या या मार्गावर 8 हजार 887 कोटी रुपये …

Read More »