Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

पनवेलमध्ये शनिवारी भव्य रोजगार मेळावा

पनवेल ः रामप्रहर वृत्त युवकांच्या समस्यांची जाण असलेले कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि. 3) दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्याच्या अनुषंगाने विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध होणार …

Read More »

कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य चित्रकला स्पर्धा

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभेचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त येथील जाणीव एक सामाजिक संस्थेच्या वतीने शनिवारी (दि. 3) दुपारी 3 ते सायंकाळी 7 या वेळेत पनवेल शहरातील आगरी समाज हॉल येथे भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ज्युनिअर केजी ते पहिली, दुसरी ते चौथी, पाचवी ते …

Read More »

पनवेलमध्ये रंगला बाबुजी महोत्सव

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त आर्च इंटरप्रायझेस आयोजित सुधीर फडके अर्थात बाबुजी यांच्या लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेल्या गाण्यांचा स्वरोत्सव बाबुजी महोत्सव शनिवारी (दि. 27) पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. या महोत्सवात सुधीर …

Read More »

यशश्री शिंदेच्या हत्येचा उरणमध्ये तीव्र निषेध

उरण ः बातमीदार, वार्ताहर, प्रतिनिधी यशश्री शिंदे या 22 वर्षीय युवतीच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ रविवारी (दि. 28) उरणमध्ये असंख्य नागरिक एकवटले होते. या वेळी भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आणि आमदार महेश बालदी यांनी आरोपीला पकडून त्याला फाशीची शिक्षा मिळावी, अशी मागणी पोलिसांसमोर केली तसेच सर्वांनी या घटनेचा तीव्र …

Read More »

वंदे मातरम् जनरल कामगार संघटनेंतर्गत पडघे येथील रिक्षा स्टँडचे उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त वंदे मातरम् जनरल कामगार संघटना अंतर्गत पनवेल तालुक्यातील पडघे येथील स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक मालक संघटनेच्या रिक्षा स्टँडचे उद्घाटन शनिवारी (दि. 27) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास भाजप अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, भाजप जिल्हा …

Read More »

पनवेल तालुक्यात भाजपचा गाव कार्यकर्ता भेट दौरा

महिला मोर्चा तालुकाध्यक्षपदी कमला देशेकर यांची नियुक्ती पनवेल ः रामप्रहर वृत्त आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षबांधणीच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 25) पनवेल तालुक्यात गाव कार्यकर्ता भेट दौरा केला. या दौर्‍यादरम्यान त्यांनी महायुतीच्या सरकारने केलेली विकासकामे तसेच सरकारी योजनांची माहिती नागरिकांना देण्यासोबतच मतदार नोंदणी करण्याचे आवाहन केले. या …

Read More »

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाचा आढावा

पनवेल ः रामप्रहर वृत्त मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा आढावा राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी (दि. 24) पनवेलमध्ये घेतला. या बैठकीस आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. या वेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील पॅकेज 1 ते पॅकेज 10च्या कामाची सद्यस्थिती आणि प्रगतीचा तसेच पावसाळ्यात केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. …

Read More »

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांनी केलेल्या मागणीनुसार उरण विधानसभा मतदारसंघातील 13 रस्त्यांच्या विकासकामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 अंतर्गत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे सुमारे 40 कोटी रुपये खर्च करून या रस्त्यांची दर्जोन्नती होणार …

Read More »

खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात 4 ऑगस्टला मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार महाशिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त अखंडपणे समाजोपयोगी उपक्रमे राबविणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल, भारतीय जनता पक्ष, रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन आणि साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 4) विनामूल्य आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांनी ग्रामीण भागात साधला कार्यकर्त्यांशी संवाद

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. 22) पनवेल ग्रामीणमधील भाजप कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत संवाद साधला. या भेटीदरम्यान त्यांनी सरकारने केलेली विकासकामे तसेच सरकारी योजनांची माहिती नागरिकांना देण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. पनवेलच्या धानसर, किरवली, धरणा, धरणा कॅम्प, रोहिंजण, खुटारी, पिसार्वे या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची …

Read More »