Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

सीकेटी महाविद्यालयात रक्तदान शिबिर

महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केला रक्तदात्यांचा सन्मान पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर महाविद्यालयात श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि डॉ. डी. वाय. पाटील रक्तपेढीच्या सहकार्याने शुक्रवारी (दि. 4) रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले …

Read More »

पनवेल महापालिका होणार हायटेक!

आरोग्य, साफसफाईसह विविध विषयांना महासभेची मंजुरी पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या शुक्रवारी (दि. 4) झालेल्या महासभेत नागरिकांच्या आरोग्यासंबंधी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सिडकोच्या दुर्लक्षामुळे करण्यात आलेल्या बेकायदेशीर भरावामुळे पनवेलमध्ये पूरनियंत्रण रेषा बदलून पाणी शहरात येते. तसे होऊ नये यासाठी गाढी नदीचे पूररेषा सर्वेक्षण करण्याला मंजुरी देण्यात आली आहे. याचबरोबर मलनि:स्सारण …

Read More »

”तळोजा एमआयडीसीतील कंपन्यांमुळे वायू प्रदूषण”

आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्ष मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमुळे वायू प्रदूषण होत असल्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी तारांकित प्रश्नाद्वारे शासनाचे लक्ष वेधले असून तळोजा परिसरातील दुर्गंधीच्या तक्रारीच्या अनुषंगाने एकूण 13 उद्योगांवर कारवाई करण्यात आलेली आहे, …

Read More »

पिरकोन हायस्कूलमध्ये विविध कार्यक्रम; आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती

उरण : बातमीदार मार्च 2021-2022, इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेसाठी प्रविष्ठ होणार्‍या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन व निरोप समारंभ आणि प्राचार्य व्ही. एस. व्हेटम यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिरकोन येथे मोठ्या उत्साहात झाला. या वेळी रयत टीकरिंग लॅबचे आमदार महेश बालदी यांनी उद्घाटन झाले. …

Read More »

उरण शहरात पोस्ट कार्यालयाचे उद्घाटन

उरण ः वार्ताहर उरण शहरात पोस्ट कार्यालयाचे उद्घाटन गुरुवारी (दि. 3) शरण्या यु-डायरेक्टर पोस्टल सर्व्हिस नवी मुंबई विभाग यांच्या हस्ते झाले. शहरातील कोटनाका येथील पोस्ट कार्यालय जीर्ण व मोडकळीस आल्याने हे पोस्ट कार्यालय काही महिन्यांपासून जेएनपीटी टाऊनशिप येथे स्थलांतरीत झाले होते. त्यामुळे उरण शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होत …

Read More »

चिंध्रण गावात साकारतोय सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प

सरपंच कमला देशेकर यांचे प्रयत्न कळंबोली : वार्ताहर सरपंच कमला एकनाथ देशेकर यांच्या दूरदृष्टीतून चिंध्रण गावातील संडपाण्याची विल्हेवाट लावणारा प्रकल्प लवकरच कार्यरत होत आहे. त्यामुळे गावातील साथीच्या रोगांना आळा बसणार आहे. यामुळे गावातील महिलावर्गात उत्साहाचे वातावरण असून त्यांनी सरपंच कमला देशेकर यांचे अभिनंदन केले आहे. सांडपाण्यामुळे सर्वत्र पाणीच पसरत असून …

Read More »

कर्नाळा परिसरात वेगाला बसणार ‘ब्रेक’

आरटीओच्या सेफ्टी व्हेईकलची नजर; विशेष उपाययोजना सुरू पनवेल ः वार्ताहर मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेलनजिक असलेल्या कर्नाळा अभयारण्य परिसरातून भरधाव वेगात जाणार्‍या वाहनांना आता ब्रेक लागणार आहे. कारण या वाहनांचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी आरटीओची नजर असणार आहे. वार्‍याच्या वेगाने धावणार्‍या वाहनांवर आता रोड सेफ्टी व्हेईकलच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. यासाठी आरटीओने …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते खारघर कार्निवलचे उद्घाटन

20 मार्चपर्यंत विविध कार्यक्रमांची मेजवानी खारघर : रामप्रहर वृत्त खारघर येथे भारतीय जनता पक्षातर्फे खारघर कार्निवल 2022चे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 2) झाले. या कार्निवलमध्ये नागरिकांना विविध प्रकारच्या खाद्यसंस्कृतीसह सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद, तर लहान मुलांना विविध …

Read More »

वीर वाजेकर महाविद्यालय वन्यप्राणी दिन उत्साहात

उरण ः वार्ताहर रयत शिक्षण संस्थेच्या उरण येथील वीर वाजेकर महाविद्यालय, महालण विभाग फुंडे प्राणिशास्त्र विभागाच्या विद्यमाने जागतिक वन्यप्राणी दिन कार्यक्रम उत्साहात पार पडला. त्या अनुषंगाने  वन्यप्राणी व पक्ष्यांचे पोस्टर प्रदर्शन, फुंडे-पाणजे पाणथळ येथील पक्ष्यांचे डॉ. राहुल पाटील यांचे व्हिडिओचे नियोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य पी. जी. पवार …

Read More »

खांदा कॉलनीत भाजप अभेद्य!

‘महिला मोर्चाच्या कुणीही शिवसेनेत प्रवेश केलेला नाही’ पनवेल ः रामप्रहर वृत्त दोन दिवसांपूर्वी एका वृत्तपत्राने खांदा कॉलनीमध्ये भारतीय जनता पार्टीला खिंडार; शिवसेनेत जाहीर प्रवेश अशा आशयाची बातमी प्रसिद्ध झाली आहे. सोशल मीडियावरही ती व्हायरल केली जात आहे, मात्र यात कोणतेही तथ्य नाही. खांदा कॉलनीत भाजप अभेद्य असून महिला मोर्चाच्या कुणीही …

Read More »