पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल परिसरामध्ये सायबर गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पनवेल परिसरातील पोलीस ठाण्यात अनेक सायबर गुन्ह्यांची नोंद झाली असून या गुन्ह्यांची उकल करणे पोलिसांना आव्हान आहे. शहर आणि ग्रामीण भागातली इंटरनेट, ईमेल, विविध अॅप वापरकर्त्यांमधील दरी कमी होत आहे. वाढत्या वापराबरोबरच सायबर गुन्हेगारीही वाढल्याचे …
Read More »विवेक पाटलांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला
पनवेल ः प्रतिनिधी कोट्यवधी रुपयांच्या कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी बँकेचे चेअरमन आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळला आहे. त्यामुळे पाटील यांचा तळोजा जेलमधील मुक्काम 21 ऑक्टोबरपर्यंत वाढला आहे. विवेक पाटलांच्या जामीन अर्जावर गुरुवारी (दि. 14) सुनावणी होणार होती, पण सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) अॅड. …
Read More »मोदी सरकारकडून प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचे काम -आमदार प्रशांत ठाकूर; असंघटित कामगारांसाठी ई-श्रम कार्ड मोफत नोंदणी केंद्राचे पनवेलमध्ये उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत महत्त्वाकांशी योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास या धोरणांतर्गत अनेक योजनांची यशस्वी अंमलबजावणी करीत तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचे काम मोदी सरकारमुळे होत आहे, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »न्हावेे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपचे हरिश्चंद्र म्हात्रे विराजमान
उरण : प्रतिनिधी न्हावे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भारतीय जनता पक्षाचे हरिश्चंद्र म्हात्रे यांची बिनविरोध निवड झाली आहे. याबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित सरपंच म्हात्रे यांचे अभिनंदन केले. न्हावे ग्रामपंचायतीमध्ये भाजप, शेकाप, काँग्रेस …
Read More »ग्रामीण भागात विकासपर्व
पनवेलमधील वांगणी तर्फे वाजेत विविध कामांचे भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा नियोजन निधीतून वांगणी तर्फे वाजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजन बुधवारी (दि. 13) झाले. भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. या …
Read More »स्वस्तिका घोषची ‘सुवर्ण’ कामगिरी; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून कौतुक
पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी असलेली टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोषने भारताकडून खेळताना ट्युनिशिया ओपनचे विजेतेपद पटकाविले आहे. स्वस्तिकाने 19 वर्षाखालील मुलींच्या एकेरी गटात ही ‘सुवर्ण’ कामगिरी साकारली. याबद्दल संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वस्तिकाचे अभिनंदन व कौतुक …
Read More »भटके विमुक्त महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी विद्या तामखडे
पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजप भटके विमुक्त महिला आघाडीच्या उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षपदी कामोठे येथील विद्या तामखडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 13) तामखडे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, …
Read More »कर्जतमधील शिवसेना, शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश; आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत
पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेकडे आकर्षित होऊन कर्जत तालुक्यामधील पाषाणे ग्रामपंचायत हद्दीतील शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. 12) भाजपचा झेंडा हाती घेतला. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. खांदा कॉलनीत झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश …
Read More »सुकापूरमध्ये कोरोना लसीकरण शिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना प्रादूर्भाव तसेच त्यामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी प्रतिबंधक लस घेणे गरजेचे आहे. त्या पार्श्वभूमीवर सुकापुर येथील अन्नपुर्णामंदिर औम शिवा सोसायटीमध्ये कोविड लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी जि. प. सदस्य अमित जाधव, पालीदेवद ग्रामपंचायतीच्या सरपंच योगिता राजेश पाटील, माजी …
Read More »उरणमधील अपघात रोखण्यासाठी भाजपचा पुढाकार
विविध उपाययोजनांसंदर्भात चर्चा आणि पत्रव्यवहार उरण : प्रतिनिधी, वार्ताहर उरणमधील सातत्याने होणार्या अपघातांवर आळा घालण्यासाठी अथवा रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी भारतीय जनता पक्ष पूर्व विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात पदाधिकार्यांनी आमदार महेश बालदी, तहसिलदार भाऊसाहेब अंधारे, ग्रामपंचायत खोपटे-बांधपाडा आदी ठिकाणी पत्रव्यवहार करून निवेदन देण्यात आले आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper