Breaking News

Ankit Shah

विवाहितेवर सहा वर्षे लैंगिक अत्याचार

पनवेल : बातमीदार  : खारघरमध्ये राहाणार्‍या एका 40 वर्षीय विवाहित महिलेवर तिच्या ओळखीतील 30 वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार करून त्याचे मोबाईलवर चित्रीकरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर या तरुणाने हे चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडित महिलेवर गेल्या सहा वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पीडित महिलेने खारघर पोलिसांकडे केली …

Read More »

रोडपाली येथे कंटेनर पलटी

पनवेल : वार्ताहर  : भरधाव वेगाने चाललेला कंटेनर वाहन चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाल्याची घटना रोडपाली येथे घडली आहे. अशाच प्रकारच्या घटना यापूर्वी सुद्धा घडल्याने गेल्या काही दिवसांपासून या परिसरात अपघातसत्र वाढले आहे. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे एक कंटेनर पलटी झाला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. असे …

Read More »

पाणीटंचाईने महिलांला नाहक त्रास

रसायनी : प्रतिनिधी  : सध्या राज्यात सर्वत्र दुष्काळ जाणवत असून अनेक गावांना टँकरमार्फत पाणीपुरवठा करून देण्याची वेळ आली आहे. पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत असतानाही पडघे गाव दुष्काळग्रस्त जीवन जगत आहेत. पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. पडघे गावात पाणीटंचाईच्या झळा गेल्या कित्येक वर्षात तीव्र प्रमाणात जाणवत आहेत. या गावाला गेल्या तीन …

Read More »

रस्त्यांच्या कामाबद्दल रहिवाशांसह शिवसेनेने आमदार प्रशांत ठाकूर यांचे मानले आभार

खारघर : वार्ताहर : खारघर वसाहतीमधील अंतर्गत रस्ते, तसेच बाहेरील रस्त्यांची कामे करण्यासंदर्भात स्थानिक आमदार व सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर व प्रशासनाकडे स्थानिक रहिवाशांसह शिवसेना मा. उपमहानगरप्रमुख गुरुनाथ पाटील यांनी पाठपुरावा केला होता. सदर पाठपुराव्याला यश येऊन सदर रस्त्याची कामे सुरू करण्यात आल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानण्यात आले …

Read More »

…मग कसे वाढणार एसटीचे उत्पन्न?

पनवेल : प्रतिनिधी : एसटी महामंडळ तोट्यात जात आहे, असे सांगतानाच महामंडळाचे अधिकारी ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे महामंडळाचे ब्रीद विसरून प्रवाशांना बसण्याची आसने कमी करून गाडीत प्रवाशांना त्रास कसा होईल याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यामुळे नाईलाजाने प्रवासी खाजगी गाड्यांचा पर्याय स्वीकारत आहेत. त्यामुळे परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी  याकडे लक्ष  देऊन …

Read More »

पारवाडी-आदिवासीवाडी तहानलेली

पाणी टंचाई नियोजनासाठी आमदार गोगावलेंनी कंबर कसली महाड : प्रतिनिधी : तालुक्यामध्ये पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहेत. तालुक्यातील पारवाडी या आदिवासीवाडीला सध्या पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. कोणतीही पाणीपुरवठा योजना नसलेल्या या वाडीतील पाण्याचे स्त्रोत आटल्याने आदिवासींना नदीमध्ये डबकी खोदून त्यातील पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. आमदार …

Read More »

कर्जत आगारातील आठ कामगारांचे उपोषण स्थगित

कर्जत : बातमीदार : एसटीच्या कर्जत आगारातील आठ कामगारांच्या अन्यत्र बदल्या झाल्या होत्या, मात्र कार्यमुक्त करण्यात येत नसल्याने या आठ कामगारांनी आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र दुसर्‍या दिवशी गुरुवारी (दि. 2) रात्री साडेदहा वाजता हे उपोषण स्थगित करण्यात आले. सोमवारपासून या आठ पैकी दर चार दिवसांनी दोन दोन कामगारांना …

Read More »

टेंबरे ग्रामपंचायतीमध्ये आठ कुपोषित बालके

कर्जत : बातमीदार : कम्युनिटी ऍक्शन फॉर न्यूट्रिशन अंतर्गत कर्जत तालुक्यातील टेंबरे ग्रामपंचायत हद्दीमधील अंगणवाडी बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात तेथील तीन आदिवासी वाड्यात 8 बालके कुपोषित आढळली आहेत. त्यामुळे महिला बालकल्याण विभागाचा कर्जत तालुक्यात कुपोषण नाही, हा दावा फोल ठरला आहे. दिशा केंद्राच्या माध्यमातून कर्जत तालुक्यात राष्ट्रीय आरोग्य …

Read More »

‘कुंडलिका‘ बनत आहे पर्यटकांचे आकर्षण

बच्चे कंपनी घेताहेत पाण्यात डुबण्याचा आनंद रोहे ः प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यात सगळ्यात कमी प्रदुषीत म्हणून कुंडलिका नदीची ओळख आहे. निर्मळ वाहणार्‍या या नदीच्या पात्रात सायंकाळी मोठया प्रमाणात नागरिक व लहान मुले पोहण्याचा मनसोक्त आनंद लुटत आहेत. तर सायंकाळी या परिसरात  फिरण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. रोह्याची जीवन वाहनी …

Read More »

वाढते तापमान पाळीव जनावरांच्या जीवावर

काळजी घेण्याचे पशुवैद्यकीय विभागाचे आवाहन महाड : प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात तापमानाचा पारा कमालीचा वाढला असून, त्याचा फटका मानवी जीवांबरोबर पाळीव जनावरांनादेखील बसू लागला आहे. पाळीव जनावरांना उष्माघात आणि कोल्डस्ट्रोकची बाधा होत आहे. शेतकर्‍यांनी वाढत्या तापमानात जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन महाड पशुवैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे. ग्लोबलवॉर्मिंगची …

Read More »