Breaking News

Ankit Shah

टंचाई कामांचे वस्तुस्थितीदर्शक नियोजन करावे

मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांचे निर्देश; जिल्ह्यात 207 गावे, पाड्यांना टँकर्सद्वारे पाणी पुरवठा अलिबाग : जिमाका, प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी जिल्हा परिषदेने विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली असून कोणत्याही परिस्थितीत गावे आणि वाड्यांना तातडीने टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा झाला पाहिजे तसेच विंधन विहिरींची कामेही त्वरित …

Read More »

स्वराभिषेकाने पनवेलकर मंत्रमुग्ध

शास्त्रीय संगीत संमेलन साजरे पनवेल : रामप्रहर वृत्त  : पनवेल येथील पनवेल कल्चरल असोसिएशनच्या सभागृहामधे एका शास्त्रीय संगीत संमेलनाचे आयेजन करण्यात आले. प्रसिद्ध तबलावादक किशोर पांडे यांच्या संकल्पनेतून आयोजित या संगीत संमेलनामधे ज्येष्ठ आणि युवा कलाकारांच्या शास्त्रीय गायकीचा आनंद पनवेलकरांनी लुटला. आकाशवाणीच्या ज्येष्ठ गायिका अर्चना कुलकर्णी, त्याच्या शिष्या निलांबरी अनगळ, …

Read More »

उरण परिसरातील तापमानात वाढ

उरण : रामप्रहर वृत्त  : उरण आणि जेएनपीटी परिसरात असलेल्या कंटेनर यार्डमध्ये ठेवण्यात येत असलेल्या पत्र्याच्या लाखो कंटेनरच्या डब्यांमुळे तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तापमान नियंत्रणात आणण्यासाठी आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येक कंटेनर यार्डमध्ये जागेच्या 30 टक्वे जागेत झाडे लावण्याची आवश्यकता आहे, मात्र याकडे कंपन्यांच्या विविध विभागाकडून अक्षम्यपणे दुर्लक्ष …

Read More »

वाढत्या उष्म्यामुळे मिनरल वॉटरची मागणी वाढली

रसायनी : प्रतिनिधी  : रणरणत्या उन्हामध्ये अंगाची लाही होत असताना नागरिक स्वतःच्या आरोग्याची खबरदारी घेत आहेत. यामुळे या उन्हाळ्यामध्ये आपली तृष्णा शांत करण्यासाठी मिनरल वॉटर घेण्याकडे आनेकांचा कल आहे. त्यामुळे बाजारात मिनरल वॉटरच्या मागणीत वाढ झाली आहे. पूर्वी प्रत्येक ठिकाणी वाटसरूची तहान भागविण्यासाठी पाणपोया उपलब्ध असायच्या, मात्र आता आरोग्याचा विचार …

Read More »

मच्छीमारांना सतावतेय सागरी प्रदूषणाची भीती!

उरण ः रामप्रहर वृत्त  : रायगड जिल्ह्याचा 240 किमीचा विस्तीर्ण सागरी किनारा मासेमारीसाठी अनुकूल असला, तरी मागील काही वर्षात या किनारपट्टीवर प्रदूषण वाढले आहे. आर्थिक लाभासाठी केल्या जात असलेल्या बेसुमार मासेमारीमुळे किनार्‍याच्या परिसरात आढळणार्‍या माशांच्या विविध जातीही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी पारंपरिक व्यवसाय करणार्‍या मच्छीमार बांधवांना मत्स्यदुष्काळाची चिंता सतावू …

Read More »

पनवेलच्या सुपुत्राने महाराष्ट्राला लावले वेड

‘लिंबू कापला रस गळू लागला’ पनवेल : प्रतिनिधी  : पनवेलच्या सुपुत्र असलेल्या मयूर नाईकने आपल्या आवाजाच्या जादूने कमाल केली असून त्याने गायलेल्या ‘लिंबू कापला रस गळू लागला’ या गाण्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. विशेष म्हणजे या लग्न सिझनमध्ये 72 लाखाहून अधिक रसिकांनी युट्युबवर या गाण्याला दाद देऊन हे गाणे …

Read More »

कोप्रोली यात्रोत्सव उत्साहात साजरा

उरण : बातमीदार  : उरण तालुक्यातील कोप्रोली येथे कोप्रोली यात्रोत्सव 2019 नुकताच मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. सालाबादप्रमाणे या वर्षी श्री बापुजीदेव आणि श्री जोगेश्वरी देवीची यात्रा दि. 4 व 5 मे रोजी कोप्रोली येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दहा गावांची पारंपरिक यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारी अशी …

Read More »

केएलई कॉलेजचे स्नेहसंमेलन साजरे

कळंबोली : रामप्रहर वृत्त  : कळंबोलीमधील केएलई कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन शनिवारी मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. या सोहळ्यामध्ये लॉ  मेहफिल या विषयावर विद्यार्थ्यांनी आपल्या कला सादर केल्या. या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर उपस्थित होते. कळंबोलीमधील केएलई कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. लॉ मेहफिल या …

Read More »

हुतात्मा शिंग्रोबाची पालखी मिरवणूक उत्साहात

रसायनी : प्रतिनिधी  : धनगर समाजाचे आराध्य दैवत आणि बोरघाटाचे  जनक असलेल्या वीर हुतात्मा शिंग्रोबा देवाचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्ताने शिंग्रोबा देवाची पालखी मिरवणूक वाजतगाजत यळकोट यळकोट जय मल्हारच्या गजराने उत्साहात पार पडली. या वेळी आमदार बाला भेगडे आणि माजी आमदार देवेंद्र साटम उपस्थित होते. शिंग्रोबा उत्सव कमिटीच्या …

Read More »

रानसई धरण गाळमुक्त करावे; स्थानिकांची मागणी

उरण : प्रतिनिधी  : राज्यशासन गेली अनेक वर्षे करोडो रुपये खर्च करून गाळमुक्त धरण अभियानांतर्गत गाळ काढण्याचे उद्दिष्ट साध्य करीत आहे. यासाठी शासन व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून विविध प्रकल्पांच्या सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून अशी अभियाने राबवित आहे. राज्यातील धरणे व जलसाठ्याच्या साठवण क्षमतेत वाढ व्हावी म्हणून धरणातील गाळ काढून तो …

Read More »