Breaking News

Ramprahar News Team

वर्ल्ड कपबाबत गंभीरला चिंता ; पांड्या, विजय शंकर ती उणीव भरून काढतील का?

मुंबई : प्रतिनिधी इंग्लंड आणि वेल्स येथे होणार्‍या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज आहे. वर्ल्ड कप जेतेपदाच्या दावेदारांमध्ये भारतीय संघ आघाडीवर आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सर्वोत्तम 15 खेळाडूंची निवड केली आहे, पण निवड समितीच्या या संघावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. भारतीय संघाचा माजी खेळाडू …

Read More »

विद्युत रोषणाईचा झाडांना फटका

पनवेल : बातमीदार पनवेल तसेच आजूबाजूच्या परिसरात हॉटेल, ढाबे यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. त्यामुळे आपला ढाबा, हॉटेल रात्रीच्या वेळी दिमाखदार दिसावे व लांबूनच गिर्‍हाईकाना ते दिसावे यासाठी झाडांना वेगवेगळ्या रंगाची विद्युत रोषणाई करत आहेत, मात्र ही विद्युत रोषणाई झाडांसाठी बाधक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निसर्गाच्या सान्निध्यात …

Read More »

पाणीटंचाई आणि उकाड्यातही लग्नाचा धूमधडाका सुरूच!

पनवेल ः प्रतिनिधी कडाक्याचे तापमान, असह्य उकाडा, तीव्र पाणीटंचाईने सर्वत्र हाहाकार माजवला असतानाही तालुक्यात सर्वत्र लगीनसराईचा धूमधडाका सुरूच आहे. यामुळे पाणीटंचाई आणि उकाड्यातही वधूवर पित्यांना आपल्या मुलामुलींचे विवाह पार पाडण्यासाठी मेहनत घ्यावी लागत आहे. यंदा पाणीटंचाई व तापमानाने सर्व उच्चांक मोडले आहेत. पनवेलमधील तापमान जवळपास 40 अंशांपर्यंत पोहचले आहे. त्यामुळे …

Read More »

आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा

खारघर : प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाच्या निमित्ताने सामाजिक दृष्टिकोनातून खारघर सेक्टर 4 मधील निरामय हॉस्पिटल व सेक्टर 12 मधील संजीवनी हॉस्पिटल येथे परिचरिकांचा मिठाई व गुलाबपुष्प देऊन कौतुक व सत्कार करण्यात आला. या वेळी पनवेल महानगरपालिकेचे नवनिर्वाचित प्रभाग समिती (अ) सभापती शत्रुघ्न काकडे, नगरसेवक रामजी गेला बेरा, खारघर सरचिटणीस दीपक …

Read More »

लॅबचालकासह बोगस एमडी पॅथॉलॉजिस्टला अटक

पनवेल : वार्ताहर एमडी पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर नसलेल्या व्यक्तीच्या नावाने रुग्णांच्या रक्त व इतर तपासण्या करून त्याबाबतचे रिपोर्ट देणार्‍या नवीन पनवेलमधील सिद्धकला कॉम्प्युटराईज्ड पॅथॉलॉजी लॅबवर खांदेश्वर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात लॅबचालक आणि बोगस एमडी पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर या दोघांना अटक केली. गत मार्च महिन्यामध्ये पोलिसांनी सदर लॅबवर कारवाई केली होती. …

Read More »

शिवाजी चौैकातील तुंबलेल्या नाल्याची तत्काळ दुरुस्ती ; नगरसेवक राजू सोनी यांचे प्रयत्न

पनवेल : वार्ताहर शहरातील शिवाजी चौक ते आदर्श नाका परिसरात कोपर्‍यावर असलेला छोटा नाला तुंबला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून घाणीचे पाणी रस्त्यावर वाहत होते. ही बाब पनवेलमधील नगरसेवक राजू सोनी यांना समजताच त्यांनी तातडीने खाजगी कामगार लावून ही समस्या निकाली काढली आहे. गेल्या काही दिवसांपासून …

Read More »

सभापती संजय भोपी यांनी पदभार स्वीकारला ; महापौरांसह नगरसेवकांची उपस्थिती

कळंबोली : प्रतिनिधी संजय भोपी यांनी पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती(ब)च्या सभापतिपदाचा पदभार सोमवारी स्वीकारला. कळंबोली येथील प्रभाग समितीच्या कार्यालयात महापौर डॉ. कविता चौतमाल यांच्या प्रमुख उपस्थितीत मावळते सभापती एकनाथ गायकवाड यांच्या हस्ते भोपी यांनी पदग्रहण केले. या वेळी ज्येष्ठ नगरसेविका सीताताई सदानंद पाटील, विद्याताई गायकवाड, राजेश्री  वावेकर, नगरसेवक समीर ठाकूर, …

Read More »

तृतीयपंथीयांचा आत्मसन्मान आणि रोजगारासाठी सरसावले पुणे पोलीस

पुणे ः प्रतिनिधी तृतीयपंथीयांशी संवाद साधण्यासही आपल्याकडे कोणी धजावत नाही़. ते रस्त्यावरून जाऊ लागले तर बाजूला होऊन त्यांच्यापासून दूर जाणेच सर्व जण हिताचे समजतात़. अशा वेळी त्यांना नोकरीवर ठेवणे हे अवघडच. त्यामुळे त्यांना आत्मसन्मानाने जगता यावे, एखादा व्यवसाय करता यावा यासाठी पुणे पोलिसांनी मदतीचा हात पुढे केला असून शहरातील तृतीयपंथीयांना …

Read More »

मशिदीवरील हल्ल्यानंतर श्रीलंकन सरकारची सोशल मीडियावर बंदी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था श्रीलंकेत झालेल्या मशिदीवरील हल्ल्यानंतर श्रीलंकन सरकारने व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक,  यू ट्यूबसारख्या सोशल मीडियावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.  हल्ल्यानंतर सरकारने रविवारी चिलाऊसह अन्य ठिकाणी कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला होता. फेसबुकवर एका व्यक्तीने आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर चिलाऊ भागातील मुस्लिम- ख्रिस्ती समाजात दंगे उसळले होते. संबंधित व्यक्तीने टाकलेली पोस्ट धमकीची …

Read More »

‘दंतेश्वरी लडाके’ करणार नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगड ः वृत्तसंस्था ’दंतेश्वरी लडाके’ नामक पहिले नक्षलविरोधी महिला कमांडो पथक नक्षलग्रस्त भागात तैनात करण्यात आले आहे. ‘काट्याने काटा काढणे’ या म्हणीप्रमाणे आता नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी शरण आलेल्या नक्षलवाद्यांचाच वापर केला जाणार आहे. त्यासाठी छत्तीसगड सरकारने ‘दंतेश्वरी लडाके’ नावाचे पहिले नक्षलविरोधी महिला कमांडो पथक तयार केले आहे. येथील नक्षलग्रस्त बस्तर …

Read More »