नागोठणे : प्रतिनिधी जागा आपली असल्याचा दावा करीत येथील वनविभागाकडून गुरुवारी नारायण सॉ मिल रस्त्यालगत चाललेले वाढीव बांधकाम उद्ध्वस्त केले. याबाबत घरमालक हवाबी हसनमिया गोलंदाज या महिलेने जागा आमचीच असल्याने बांधकाम केले असल्याचा दावा केला असून, वनखात्याने बांधकाम तोडून माझ्यावर अन्यायच केला आहे व त्यांच्या विरोधात कुटुंबासह लवकरच उपोषण करणार …
Read More »शिवराज्याभिषेक दिनाच्या तयारीची शासकीय बैठक ; 6 जून रोजी किल्ले रायगडावर सोहळा
महाड : प्रतिनिधी 6 जून रोजी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा आखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने साजरा करण्यात येतो. या वर्षी देखील या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, याकरिता शिवप्रेमी आणि पर्यटकांची गैरसोय होऊ नये याकरिता केल्या जाणार्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महाड प्रांत कार्यालयात बैठकीचे आयोजन …
Read More »श्रीवर्धन उपविभागीय अधिकार्यांकडून मान्सूनपूर्व तयारीचा आढावा
श्रीवर्धन : प्रतिनिधी उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली सन 2019 मान्सून पूर्वतयारी आढावा बैटक 16 मे 2019 रोजी सकाळी 11.30 वाजता मध्यवतीय प्रशासकीय भवन श्रीवर्धन येथे घेण्यात आली. या सभेला श्रीवर्धन तालुक्यातील उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन, गटविकास अधिकारी प. स. अधिकारी, श्रीवर्धन पोलीस निरीक्षक, तालुका कृषी अधिकारी, उपअभिंयता, महाराष्ट्र विद्युत वितरण …
Read More »ब्लॅकमेलिंग करणार्या पाच पोलिसांचे निलंबन
नवी मुंबई ः प्रतिनिधी मध्यरात्री कामावरून घरी चाललेल्या महिला-पुरुषाला खोट्या गुन्ह्यात अडवण्याची भीती दाखवून पैशांची मागणी करणार्या पाच पोलिसांचे निलंबन करण्यात आले. ते रबाळे पोलीस ठाण्यातील कर्मचारी असून पीडितांनी केलेल्या तक्रारीवरून चौकशीअंती त्या पोलिसांवर कारवाई करण्यात आली. सागर ठाकूर, स्वप्नील काशिद, श्रीकांत गोकनुर, नितीन बराडे व वैभव कुर्हाडे अशी त्यांची …
Read More »विचित्र अपघातात कारचालकाचा जागीच मृत्यू
पनवेल ः प्रतिनिधी पनवेलजवळील मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा अभयारण्याकडे जाणार्या भरधाव टँकरने अल्टो गाडीला पाठीमागून धडक दिल्याने तसेच त्यानंतर दुसर्या इनोव्हा कारलाही धडक दिल्याने झालेल्या तिहेरी अपघातात एक ठार, तर गाडीतील दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पनवेल पोलिसांनी टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर टँकर कर्नाळा अभयारण्याकडे जात …
Read More »जेएनपीटी बंदरात ट्रेलरसह चालकाचा समुद्रात बुडून मृत्यू
उरण ः प्रतिनिधी जेएनपीटी बंदरात गेल्या 30 वर्षांत बंदराबरोबर सलग्न असणार्या अन्य चार बंदरांतून लहान-मोठे अनेक अपघात झाले, मात्र काल मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास झालेला अपघात हा जेएनपीटी बंदर जेट्टीवरील सर्वात विचित्र अपघात आहे. या अपघातात ट्रेलरसह चालकाचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. या विचित्र अपघातात चालकाला जलसमाधी मिळाल्यामुळे …
Read More »रायगड जिल्ह्यात विंधन विहिरींच्या कामांना वेग
अलिबाग ः प्रतिनिधी सध्या रायगड जिल्ह्यात 60 गावे आणि 203 पाडे अशा 263 ठिकाणी पाणीटंचाई भासत आहे. त्यावर मात करण्यासाठी विंधन विहिरी खोदण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत 107 विंधन विहिरी पूर्ण झाल्या आहेत. जिथे पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे, त्या ठिकाणी विनाविलंब टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा झाला पाहिजे, तसेच रायगड जिल्हा …
Read More »‘राष्ट्रगीत, वंदे मातरम् म्हणणारे ममतादीदींच्या दृष्टीने घुसखोर’
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोदरम्यान झालेल्या राड्यानंतर पश्चिम बंगाल हे देशाच्या राजकारणाचे केंद्रबिंदू बनले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. बाहेरील देशातून येणारे घुसखोर टीएमसीवाल्यांना दिसत नाहीत, मात्र देशातील राष्ट्रगीताचा सन्मान करणारे त्यांना घुसखोर वाटतात, असा टोला …
Read More »पुलवामा चकमकीत चार दहशतवादी ठार; एक जवान शहीद
नवी दिल्ली ः पुलवामा येथील दलीपोरात सुरू असलेल्या सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले. दरम्यान, या चकमकीदरम्यान सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला असून दोन जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, पुलवामात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुलवामातील दलीपोरा भागात काही दहशतवादी …
Read More »खो-खो स्पर्धेत विहंग, शिवभक्त, पश्चिम रेल्वेची बाजी
नवी मुंबई : प्रतिनिधी गोरेगाव प्रबोधन क्रीडा भवन येथे पुरुष, महिला व व्यावसायिक निमंत्रित गटाची स्पर्धा पार पडली. पुरुषांच्यात नवी मुंबईच्या विहंग क्रीडा मंडळ, महिलांमध्ये बदलापूरच्या शिवभक्त विद्या मंदिर या संघाने बाजी मारली, तर व्यवसायिक गटात पश्चिम रेल्वेने बाजी मारली. फन लिडर्स व प्रबोधन गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने व महराष्ट्र …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper