Breaking News

Ramprahar News Team

अमेठीकरांसाठी उगवली नवी पहाट -स्मृती इराणी

अमेठी ः वृत्तसंस्था अमेठी हा लोकसभा निवडणूक 2019मध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदारसंघ आहे. येथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि भाजप नेत्या, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यात टक्कर होती. राहुल यांचा अमेठीत पराभव झाल्यानंतर अमेठीतील राजकीय चित्र पालटले आहे. अशा प्रकारे संजय गांधी यांच्यानंतर राहुल असे ’गांधी’ आहेत, ज्यांना अमेठीच्या जनतेने …

Read More »

रॅगिंगला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या

मुंबई ः प्रतिनिधी वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या तीन वरिष्ठ विद्यार्थिनींकडून होणार्‍या रॅगिंगला कंटाळून जळगावच्या पायल तडवी या दुसर्‍या वर्षात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनीने मुंबईच्या नायर रुग्णालयातील कॉलेज हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. काल सकाळी पायलचा मृतदेह जळगावमध्ये आणण्यात आला. या वेळी संतप्त नातेवाइकांनी तिचा मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात नेला. दोषींना तत्काळ अटक …

Read More »

पश्चिम बंगालमध्ये शाह‘निती’ यशस्वी ; 18 जागांवर भाजपचा विजय

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पश्चिम बंगालमध्ये भाजपला पहिल्यांदाच मोठा विजय मिळाला आहे. गेल्या निवडणुकीत दोन जागा जिंकणार्‍या भाजपने तब्बल 18 जागांवर विजय मिळवत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. दरम्यान, सर्व जागांवर विजय मिळवण्याची अपेक्षा करणार्‍या तृणमूल काँग्रेसला केवळ 23 जागांवर समाधान मानावे लागले आहे, तर …

Read More »

‘लोकांच्या मनात मोदींची हवा नाही, तर तुफान होते’

मुंबई ः प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर 2014ची निवडणूक जिंकली, मात्र आता मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकारच्या कामावर 2019ची निवडणूक आम्ही जिंकली आहे. नरेंद्र मोदींची हवा नाही, असे म्हणणार्‍या गांधी परिवाराचा करिष्मा देशातून संपला असून, जनतेच्या मनात मोदींची केवळ हवा नव्हती, तर तुफान होते हे या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने स्पष्ट …

Read More »

‘लाव रे फटाक्यांची माळ’ उध्दव ठाकरेंचा टोला

मुंबई ः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. या वेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या प्रचाराची खिल्ली उडवली. ‘लाव रे व्हिडीओ’ला ‘लाव रे फटाक्यांची माळ’ने उत्तर मिळाले, असे उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले. …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून भूषण गवई आज घेणार शपथ

नागपूर ः प्रतिनिधी मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली आहे. ते शुक्रवारी (दि. 24) शपथग्रहण करणार असून त्यांच्या रूपाने सर्वोच्च न्यायालयातील मराठी न्यायमूर्तींच्या यादीत आणखी एका मराठी न्यायमूर्तीचा समावेश होणार आहे. गवई यांच्यासह हिमाचलचे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत, झारखंडचे मुख्य न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि …

Read More »

पनवेलमध्ये राजे प्रतिष्ठानच्या कार्यालयाचे उद्घाटन

पनवेल : वार्ताहर संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची देवाण घेवाण करीत महाराजांचे आचार विचार लहानांपासून थोरांपर्यंत पोहोचविण्यासाठी उभी राहिलेली चळवळ म्हणजे खासदार उदयनराजे भोसले यांनी सुरू केलेली राजे प्रतिष्ठान संस्था. या संस्थेच्या पनवेल येथील कार्यालयाचा उद्घाटन सोहळा येत्या 2 जून रोजी मोठ्या उत्साहात होणार आहे. या …

Read More »

शिवाजीनगर : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मातोश्री स्वानंद सुखनिवासी श्रीमती भागूबाई चांगू ठाकूर यांच्या सहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शिवाजीनगर येथे दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Read More »

जेएनपीटी कामगारांचा नियोजित संप स्थगित

उरण : बातमीदार जेएनपीटी व्यवस्थापनाविरोधात जेएनपीटी कामगार संघटनांनी पुकारलेला संप स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कामगार संघटनानी दिलेल्या संपाच्या नोटिशीची दखल घेऊन आज जेएनपीटी व्यवस्थापन व पाचही कामगार संघटनांची बैठक बोलविण्यात आली होती. त्या वेळी सध्याच्या परिस्थितीतीमध्ये कोणताही बदल न करता कामगार संघटनांशी चर्चा करून नोटिसीमधील मागण्यांवर तडजोड घडवून …

Read More »

तळवलीत शेतकर्‍यांसाठी कृषी खात्यामार्फत शेती कार्यशाळेचे आयोजन

रसायनी : प्रतिनिधी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील तळवली येथील शेतकर्‍यांना शेतीविषयक मार्गदर्शन करण्यासाठी कृषी खात्याकडून शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पावसाळा सुरू होण्यासाठी काही दिवसांचा अवधी असल्यामुळे शेतकरी वर्गासाठी कृषी खात्याच्या माध्यमातून गावांमध्ये शेतकर्‍यांसाठी क्रॉपसॅप योजनेंतर्गत शेतीविषयक माहिती पुरविण्याचे काम कृषी अधिकारी करीत आहेत. खरीप हंगाम सुरू होत असताना शेतकरी …

Read More »