Breaking News

Ramprahar News Team

वाढत्या प्रदूषणामुळे भाजीपाला, मासेमारी धोक्यात

पनवेल : वार्ताहर तळोजा एमआयडीसी परिसरात होत असलेल्या प्रदूषणामुळे भाजीपाला शेती व मासेमारी व्यवसाय धोक्यात आले आहेत. त्यामुळे स्थानिकांची परवड होत आहे. तळोजा एमआयडीसीतील कारखान्यांचे सांडपाणी रात्रीच्या वेळी कासाडी नदीत सोडण्यात येत असल्यामुळे ही नदी दूषित झाली आहे. त्याचा परिणाम भाजीपाला शेतीवर व मासेमारी व्यवसायावर प्रामुख्याने झालेला आहे. परिणामी भाजीपाला …

Read More »

पळस्पे येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव

पनवेल : प्रतिनिधी अमरदिप बालविकास फाऊंडेशनच्या वतीने रयत शिक्षण संस्थेच्या पळस्पे येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात नुकताच विद्यार्थी आणि शिक्षक गुणगौरव सोहळा झाला. कार्यक्रमास बुद्धिबळ राष्ट्रीय पंच मंगला बिराजदार, सहआयुक्त शंकर बिराजदार, प्रा. फातिमा मुझावर, अमरदीप संस्थेचे अध्यक्ष नासीर खान, मुख्याध्यपिका व्ही. एस. वेटम, ‘कफ’चे सदस्य राजकुमार ताकमोगे, ललिता गोविंद, अस्लम …

Read More »

गाढी नदीच्या कडेला मृतदेह आढळला

पनवेल : वार्ताहर पनवेलजवळील गाढी नदीच्या कडेला टी-पॉईंट ते कळंबोली सर्कल हायवे रोडवर चालू असलेल्या ब्रिजच्या कामाठिकाणी एका इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. पनवेल शहर पोलीस त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. मृत इसमाचे अंदाजे वय 45 ते 50 असून, केस सर्वसाधारण, एक डोळा अर्धवट रानटी जनावराने खाल्लेला आहे. त्याच्या अंगात …

Read More »

पनवेल स्टेशनजवळील इमारतीत संशयास्पद हालचाली

पनवेल : प्रतिनिधी पुलवामातील दहशतवादी हल्ला, आपटा येथे आढळलेला बॉम्ब यांच्या पार्श्वभूमीवर पनवेल रेल्वेस्थानकाजवळील एका इमारतीत इसमाच्या संशयास्पद हालचाली शनिवारी (दि. 23) सकाळी 9.30 वाजता दिसल्या, मात्र पोलिसांनी याकडे कानाडोळा केल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.  पनवेल रेल्वेस्थानकाजवळील पूर्व बाजूकडील (नवीन पनवेल) पदपथ नेहमीप्रमाणे गजबजलेला. प्रत्येक जण लोकल पकडण्याच्या घाईत …

Read More »

नवीन पनवेलमध्ये वॉकेथॉन; 900 विद्यार्थ्यांनी दिला सामाजिक संदेश

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त इन्फिनिटी फाऊंडेशन आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या वतीने वॉकेथॉन 2019चे आयोजन रविवारी (दि. 24) नवीन पनवेलमधील सीकेटी महाविद्यालयात करण्यात आले होते. पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या …

Read More »

खालापुरात कंपनीला आग

खालापूर : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील अलाना या खाद्यतेल कंपनीला रविवारी (दि. 24) दुपारी मोठी आग लागली. या आगीत कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अलाना कंपनी ही अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहीण हसिना पारकर हिची आहे. पेण-खोपोली रस्त्यावर सारसन येथे असलेल्या अलाना कंपनीत रिफायनरी …

Read More »

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रायगडात 85 टक्के मतदान

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात 79 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी (दि. 24) मतदानप्रक्रिया झाली. किरकोळ बाचाबाची वगळता मतदान शांततेत पार पडले. जवळपास 85 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सोमवारी (दि. 25) मतमोजणी आहे. सरपंचपदासाठी 226; तर सदस्यपदासाठी एक हजार 631 असे एकूण एक हजार 857 उमेदवार रिंगणात आहेत. रविवारी सकाळी …

Read More »

घोट संघ आमदार चषकाचा मानकरी

पनवेल : बातमीदार : पनवेल तालुक्यातील विहिघर येथे सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नावाने प्रकाशझोतातील पाचदिवसीय आमदार चषक 2019 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात घोट संघाला प्रथम क्रमांक पटकाविला; नेरेपाडा संघ उपविजेता ठरला. अंतिम सामन्यात घोट संघाने नेरेपाडा संघाला हरवत दीड लाख व भव्य …

Read More »

शहिदांच्या वारसांना सरकारी नोकरी

मुंबई : प्रतिनिधी जम्मू-काश्मीरमधील पुलवामात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या वारसांना सरकारी नोकरी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि. 24) केली. विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या चहापानानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी ते बोलत होते. या अधिवेशनात 11 विधेयके पटलावर असून, 27 फेब्रुवारीला संक्षिप्त अर्थसंकल्प मांडला जाईल, …

Read More »

रविवार ठरला ‘अपघात’वार; राज्यात तीन ठिकाणी नऊ जणांचा मृत्यू, 19 जखमी

नाशिक : प्रतिनिधी मनमाड, बीड, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे अशा तीन वेगवगेळ्या ठिकाणी रविवारी (दि. 24) झालेल्या अपघातांमध्ये नऊ जणांचा मृत्यू; तर 19 जण जखमी झाले आहेत. मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावर पिंपळगाव बसवंतजवळ दुपारी साडेबाराच्या सुमारास दोन आयशर टेम्पोंची समोरासमोर धडक होऊन चार जण जागीच ठार झाले; तर 14 जण जखमी झाले. अपघातात …

Read More »