Breaking News

Ramprahar News Team

सीवूड आश्रमशाळेवर पालिका, सिडकोची धडक कारवाई

नवी मुंबई ः प्रतिनिधी सिवूडस येथील बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्टच्या आश्रमशाळेवर नवी मुंबई महापालिका आणि सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 2) धडक कारवाई करण्यात आली. या वेळी आश्रमातील काही जणांचे विस्थापन होणे बाकी होते, मात्र पोलिसांनी त्यांना बुधवारी हलवल्यानंतर ही निष्कर्षणाची कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबई भाजप महिला …

Read More »

कर्णकर्कश आवाजापासून होणार मुक्तता

47 सायलेन्सरवर वाहतूक शाखेने फिरवला रोडरोलर पनवेल ः वार्ताहर कर्णकर्कश आवाज करणार्‍या 47 सायलेन्सरवर रोडरोलर फिरवून नष्ट करण्याची कारवाई पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शुक्रवारी (दि. 2) वाहतूक शाखेने केली आहे. सध्याच्या तरुणाईमध्ये कर्णकर्कश्य आवाज करणारे सायलेन्सर दुचाकींना लावून वेगाशी स्पर्धा करण्याचे वेड वाढले आहे. यामुळे मात्र परिसरातील …

Read More »

पोलादपुरमध्ये श्रीसदस्यांनी राबविले स्वच्छता अभियान

पोलादपूर : प्रतिनिधी  महाराष्ट्रभूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने पोलादपूर येथील श्री सदस्यांनी  प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी स्वच्छता अभियान राबविण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार रविवारी (दि. 27) सकाळी पोलादपुरातील श्री समर्थ बैठक हॉल परिसर ते रिक्षा स्थानक या दोन किमी रस्त्याची दुतर्फा स्वच्छता मोहीम राबविली. डॉ. श्री. नानासाहेब …

Read More »

भाजपच्या रतिकांत पाटील यांचा सरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल

अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील नारंगी ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदासाठी भारतीय जनता पक्षाचे रतिकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी अनिता संदेश म्हात्रे, रूपाली पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपचे अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, सतिश लेले, संतोष पाटील, जान्हवी पारेख, निखिल चव्हाण, अशोक नानची, शैलेश …

Read More »

खोपोलीत लैंगिक शिक्षण मार्गदर्शन

खोपोली : प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या मनातील लैंगिक प्रश्नांना व शंकांना व्यक्त होण्यासाठी व माहिती जाणून घेण्यासाठी सहज सेवा फाउंडेशनच्या वतीने बुधवारी (दि. 30) खोपोली हिंदी विद्यालय आणि वासरंग येथील लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालयात विशेष उपक्रम राबविला. त्यात खोपोलीतील प्रख्यात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुभाष कटकदौंड यांनी विद्यार्थ्यांना आणि पुणे येथील डॉ. विशाखा …

Read More »

पोलादपुरातील तुर्भे विभागात विविध विकासकामांचे भूमिपूजन

पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील तुर्भे भागातील तीन कोटी 50 लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन सोमवारी (दि. 28)  बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले. स्थानिक जनतेने जे सांगितले ते देण्याचा प्रयत्न आम्ही केला. आम्ही दिलेला शब्द पाळला, असा दावा आमदार गोगावले यांनी या वेळी केला. पोलादपूर तालुक्यातील तुर्भे …

Read More »

रामधरणेश्वर डोंगरावर वणवा

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात पावसाळा संपल्यानंतर पुन्हा एकदा वणवे लागायला सुरुवात झाली आहे. सोमवारी (दि. 28) दुपारच्या सुमारास अलिबाग तालुक्यातील रामधरणेश्वर डोंगरावर लागलेल्या आगीत वनसंपदेची मोठी हानी झाली. स्थानिक ग्रामस्थ आणि वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी आग आटोक्यात आणली. रामधरणेश्वर डोंगरावर आग लागल्याची माहिती मापगांवचे माजी उपसरपंच चंद्रकांत खोत यांनी मुनवली …

Read More »

‘नवीन शिक्षण पद्धतीतील बदल शिक्षकांनी आत्मसात करावेत’

अलिबाग : प्रतिनिधी केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे. शिक्षण आणि कौशल्य विकास यावर आधारित हे धोरण आहे. देशात कुशल मनुष्यबळ तयार करणे, हा त्या मागचा हेतू आहे. त्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असेल.  त्यामुळे शिक्षकांनी नविन शैक्षणिक धोरण समजून घेऊन नवीन बदल आत्मसात केले पाहिजेत, असे मत कौशल्य …

Read More »

महाराष्ट्रातही ’समान’तेची चाहूल

महाराष्ट्रातही आता समान नागरी कायद्याचे वारे वाहू लागले आहेत.राज्यातील प्रमुख भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात राज्यात सर्वांना विशिष्ट पातळीवर समान अधिकार प्राप्त होण्याची चिन्हे आहेत. आपल्या देशात फौजदारी कायदा सर्वांसाठी समान आहे, पण नागरी कायद्यांमध्ये तफावत दिसून येते. वास्तविक संविधानाने समान नागरी …

Read More »

कोकण विभागीय वक्तृत्व स्पर्धेत ‘सीकेटी’चा श्रवण कदम तिसरा

पनवेल : रामप्रहर वृत्त शिक्षण महर्षी कै.दादासाहेब लिमये यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (दि. 28) झालेल्या कोकण विभागीय कनिष्ठ महाविद्यालयन वक्तृत्व स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता बारावी कला शाखेतील ध्वनी सावंत व श्रवण कदम या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या …

Read More »