Breaking News

Ramprahar News Team

पाथरज ग्रामस्थांना दूषित पाणीपुरवठा

कर्जत : बातमीदार तालुक्यातील पाथरज गावाला पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीच्या वरच्या भागातील तलावात म्हैस मृत झाली आहे. त्या म्हशीच्या शरिराचे अवयव कुजले असल्याने ग्रामस्थांना होणारा पाणीपुरवठा दूषित झाला आहे. कर्जत तालुक्यातील पाथरज गावात 80 ते 85 घरांची लोकवस्ती आहे. गावासाठी आठ वर्षापूर्वी जिल्हा परिषद सेस फंडातून विहीर बांधण्यात आली आहे. या …

Read More »

पेण खारेपाट तहानलेलाच!; अधिकार्‍यांची आश्वासने यंदाही हवेत विरली

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील खारेपाट भागाला 10 मेपासून आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा होणार असल्याने या भागात मोठी पाणीबाणी निर्माण झाली आहे. पेण तालुक्यात हेटवणे, शहापाडा, आंबेगाव अशी तीन तीन धरणे असूनदेखील या तालुक्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. तालुक्याच्या पूर्व भागात दुबार पीक घेतले जाते तर खारेपाट भागात पीक सोडाच …

Read More »

अखेर कर्जत तालुक्यात शासकीय टँकर सुरू; दोन गावे, चार वाड्यांना पाणीपुरवठा

कर्जत : बातमीदार तालुक्यात पाणीटंचाई सुरु झाली असून, सोमवारी (दि. 9) मोगऱज, पिंगळस या दोन गावांना आणि ताडवाडी, मोरेवाडी, जांभूळवाडी, विठ्ठलवाडी या वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. कर्जत तालुक्यातील मोग्रज, पिंगळस, धामणी, खांडस, पेठ, भूतीवली, खानंद, अंभेरपाडा, ओलमण, आंत्रट वरेडी, मोहोपाडा, चेवणे, ढाक, नांदगाव, तुंगी, अंतराट, नीड यांचा …

Read More »

महामार्ग चौपदरीकरणाचे 80 टक्के काम पूर्ण

देशात महामार्गांचे जाळे झपाट्याने विकसित होत आहे. गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 दुसरा टप्पा पुर्णत्वाच्या दिशेने आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक होत आहे. गेली 12 वर्षे पळस्पे ते इंदापूर महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने कोकणवासीयांना खुपच मनस्ताप सहन करावा लागला होता …

Read More »

म्हणे जनतेशी आघाडी!

आगामी निवडणुकीत आम आदमी पार्टी देशातील कोणत्याही पक्षाशी आघाडी करणार नाही असे सांगताना केजरीवाल यांनी आपली आघाडी ही देशातील 130 कोटी जनतेशीच असेल असे फिल्मी उद्गार काढले आहेत. दिल्ली आणि पंजाब वगळता केजरीवाल यांच्या पक्षाला कुठेही लक्षणीय असे यश मिळालेले नाही. बहुतांश निवडणुकींमध्ये ते आपल्या उमेदवारांच्या अनामत रकमा देखील वाचवू …

Read More »

पनवेलमध्ये साकारतेय ऑक्सि पार्क; सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका आणि कोशिश फाऊंडेशनच्या माध्यमातून शहीद भोसले पेट्रोल पंपासमोरील जागेत ऑक्सि पार्क उभारण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन महापालिका सभागृह नेते तथा कोशिश फाऊंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 8) झाले.पनवेल शहरातील शहीद भोसले पेट्रोल पंपासमोरील जागेची दुर्दशा झाली होती. या संदर्भात आमदार …

Read More »

रयत शिक्षण संस्थेची डिजिटल शिक्षणामध्ये सरस कामगिरी; चेअरमन डॉ. अनिल पाटील यांचे प्रतिपादन

सातारा ः हरेश साठे कोरोनाने शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात आव्हाने निर्माण केली. असे असले तरी रयत शिक्षण संस्थेने या आव्हानांना सामोरे जात डिजिटल शिक्षणात सरस कामगिरी केली आहे, असे प्रतिपादन ‘रयत’चे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी येथे केले. रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्या प्रबोधिनीच्या वतीने गुणवंत रयतसेवक आणि प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा …

Read More »

पनवेल देवीचा पाडा येथील शेकापच्या माजी सरपंचासह समर्थक भाजपमध्ये

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती आणि भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. अशाच प्रकारे शेतकरी कामगार पक्षाच्या देवीचा पाडा येथील माजी सरपंच सविता फडके आणि रामदास फडके …

Read More »

घोणसे घाटात बस कोसळली

तिघांचा जागीच मृत्यू, 35 जण जखमी, रुग्णालयात दाखल म्हसळा ः प्रतिनिधी म्हसळा तालुक्यातील घोणसे घाटात एका खासगी बसला रविवारी (दि. 8) सकाळी भीषण अपघात होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर 35 जण जखमी झाले आहेत. जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त प्रवासी मूळचे श्रीवर्धन तालुक्यातील आहेत. ठाण्यातील विरार-नालासोपारा …

Read More »

झटक्यावर झटके

भाजपचे नेते वा समर्थक यांना न्यायालयात दिलासा मिळतो, पण महाविकास आघाडीच्या नेत्यांवरील आरोप सिद्ध होतात. हे कसे, असा सवाल शिवसेनेचे प्रवक्ता संजय राऊत यांनी शुक्रवारी उघडपणे विचारला. परंतु या प्रश्नाचे उत्तर खुद्द राऊत यांनाही ठाऊक असेल. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्याचे पुरावे देखील तपास यंत्रणांच्या हाती लागले. …

Read More »