पाली : प्रतिनिधी राजर्षि शाहू महाराज यांच्या 100व्या पुण्यतिथी निमित्त पालीमधील नागरिक, तहसीलदार व पदाधिकार्यांनी शुक्रवारी (दि. 6) शंभर सेकंद स्तब्ध उभे राहून शाहू महाराजांना अभिवादन केले. या वेळी शाहू महाराजांच्या विचारांचे आणि कार्याचे स्मरण करण्यात आले. सामाजिक समतेचे प्रणेते लोकराजे छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक समतेची बीजे रोवली असल्याचे …
Read More »मुरूडमधील दत्तवाडी रस्त्यावर गतिरोधक बसवा; नागरिकांची मागणी
मुरूड : प्रतिनिधी शहरातील परेश हॉटेल ते दत्तवाडी या मुख्य रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत. या रस्त्यावर सूचना फलक लावावेत व गतिरोधक उभारावेत, अशी मागणी दत्तवाडी परिसरातील नागरिकांनी मुरूड सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. मुरूड दत्तवाडी परिसरातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता गोरे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन लेखी …
Read More »कर्जतच्या पुनर्वसन केंद्राला आर्थिक, धान्याची मदत
खोपोलीतील केएमसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित केएमसी महाविद्यालयाचे प्रथम व द्वितीय वर्ष शास्त्र फाउंडेशन कोर्स विषयाच्या विद्यार्थ्यांनी कर्जत येथील श्रद्धा पुनर्वसन केंद्राला स्वेच्छेने आर्थिक तसेच धान्य आणि अन्य आवश्यक वस्तूंची मोठी मदत केली आहे. ही मदत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रताप …
Read More »समाजाचे अस्तित्व टिकविण्यासाठी तरुणाईने पुढे यावे -सूर्यकांत पाटील
वडखळ येथे आगरी सामाजिक संस्थेची वार्षिक सभा उत्साहात पेण : प्रतिनिधी आगरी समाजाचे अस्तित्व जपणार्या संस्थेची ताकद मजबूत करण्यासाठी आणि ही चळवळ सर्वदूर पोहोचविण्यासाठी तरुणाईने संस्थेच्या कार्यात उतरणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी येथे केले. संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच …
Read More »कर्जतमधील तबेला जळीत घटनेत एका म्हशीचा मृत्यू; आरोपी मोकाट
कर्जत : बातमीदार तालुक्यातील जिते गावातील म्हशींचा तबेला 20 एप्रिल 2022 रोजी रात्रीच्या अंधारात जाळण्यात आला होता. त्याबद्दल आरोप असलेल्या व्यक्तींना नेरळ पोलिसांनी अद्याप अटक केली नाही. दरम्यान, त्या आगीमध्ये होरपळलेल्या एका म्हशींचा मृत्यू झाला असून शेतकर्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कर्जत तालुक्यातील जिते गावातील शेतकरी धनाजी घरत, त्यांचे …
Read More »महाडची पूर समस्या, वीर-रानवडी रेल्वे दुपदरीकरणाचा प्रश्न सोडवणार
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना आश्वासन महाड : प्रतिनिधी कोकण रेल्वेमार्गावरील वीर ते रानवडी दरम्यानच्या रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण तसेच दासगाव येथे पूर निवारण यंत्रणा उभारण्यासंदर्भात संबंधित अधिकार्यांची बैठक घेऊन लवकरात लवकर हे प्रश्न सोडविण्यात येतील, असे आश्वासन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी विधान …
Read More »उरण येथे बाल संस्कार, शिशु संस्कार वर्ग
उरण : वार्ताहर उरण शहरातील आनंद नगर येथे श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बाल संस्कार समाज मंदिर दिंडोरी यांच्या वतीने दर शनिवारी सायंकाळी सहा ते सात या वेळेत मोफत बाल संस्कार व शिशु संस्कार वर्ग घेतले जात आहेत. गेले सहा वर्षापासून हे कार्य सुरु आहे. उरण शहरातील 15 वर्षा पर्यंतच्या …
Read More »उरणमध्ये ई-श्रम कार्डवाटप, वृक्षारोपण कार्यक्रम
उरण : वार्ताहर, बातमीदार वाढदिवस काहीतरी समाजहितासाठी साजरा व्हावा या उद्देशाने उरणमधील श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहाय्यता संस्थेच्या अध्यक्षा रायगड भूषण संगीता ढेरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (दि.3) उरण शहरात ई-श्रम कार्डवाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम घेतला. कोटगाव काळाधोंडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील मोकळ्या जागेत व व्यायाम शाळेच्या आजुबाजुला शोभेची …
Read More »विंधणे आदिवासीवाडीत विविध दाखले वाटप
उरण : प्रतिनिधी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून कातकरी उत्थान अभियान अंतर्गत उरण तालुक्यातील विंधणे आदिवासी वाडीवर तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. 5) विविध प्रकारच्या दाखले वाटपाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमात तहसिलदार अंधारे आदिवासींना मार्गदर्शन करताना म्हणाले की, तालुक्यात एकही आदिवासी बांधव कोणत्याही दाखल्यासाठी वंचित राहणार नाहीत …
Read More »जेएनपीएकडून भूखंडाची प्रतीक्षा कायम
उरण : रामप्रहर वृत्त जेएनपीए प्रकल्पग्रस्तांनाही साडेबारा टक्केचे विकसित भूखंड मिळावे यासाठी लोकनेते दि.बा.पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढा झाल्याने 2011 ला जेएनपीएने साडेबारा टक्के देण्याचे मान्य केले होते. मात्र मागील 11 वर्षांपासून जेएनपीएकडून प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के भूखंडाची प्रतीक्षाच आहे. 16 मार्च 2022 ला या कामाची निविदा कंत्राटदारांना दिली असली तरी आतापर्यंत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper