पनवेल : रामप्रहर वृत्त महाआवास अभियानांतर्गत पनवेल पंचायत समितीमध्ये डेमो हाऊस बांधण्यात येणार आहे. या डेमो हाऊसच्या कामाच्या भुमीपूजन सोहळ्याचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार पनवेल पंचायत समितीच्या सभापती देवकीबाई कातकरी यांच्या हस्ते या डेमो हाऊसच्या कामाचे भुमीपूजन करण्यात आले. महाआवास अभियान हे 11 नोव्हेंबर 2020 ते 31 मार्च …
Read More »महिला सक्षमीकरणासंदर्भात मार्गदर्शन; पं. स. सदस्या रत्नप्रभा घरत यांची प्रमुख उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समितीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाकरीता अनेक उपक्रम राबवून त्यांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देण्याचे काम करण्यात येत आहे. त्याअंतर्गत महिला सक्षमीकरणासंदर्भात मार्गदर्शन करण्याकरीता शिवाजीनगर येथे पनवेल पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पंचायत समितीचे अधिकारी किशोर …
Read More »पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीकडून लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभिनंदन
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला ब्रिटीश कौन्सिलचा अत्यंत प्रतिष्ठेचा इंटरनॅशनल डायमेन्शन पुरस्कार मिळाल्याबद्दल पनवेल तालुका संघर्ष समितीने संस्थेचे चेअरमन लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे अभिनंदन केले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सांस्कृतिक देवाण-घेवाण वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने ब्रिटिश कौन्सिल अनेक निकषांवर पुरस्कार …
Read More »थोडे तरी स्वकर्तृत्व दाखवा!; चंद्रकांत पाटील यांचा ठाकरे सरकारला टोला
मुंबई : प्रतिनिधी राज्यात वाझे आणि परमबीर सिंह यांच्या पत्रावरून राजकीय गदारोळ सुरू आहे. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील एका ज्वलंत अशा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे. अंतिम सुनावणीनंतर निर्णय होणार असून, या प्रश्नावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुनावणीतील युक्तीवादाचा हवाला देत …
Read More »घरगुती मसाल्यासाठी गृहिणींची लगबग
उरण : वार्ताहर, मोहोपाडा : प्रतिनिधी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मिरचीची खरेदी सुरू झाली आहे. पावसाळ्यापूर्वी लाल तिखट मसाला घरी करून ठेवण्याची परंपरा असल्याने गृहिणींनी बाजारात गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे. या मसाल्यासाठी लागणारी सामुग्री खरेदी करण्यासाठी महिलांची लगबग सुरू झाली आहे. दिवसेंदिवस लाल मिरची व गरम मसाल्याच्या वस्तूंचे भाव वाढत …
Read More »सराईत गुन्हेगार चौकडी अटकेत; साडेसात लाखांचा ऐवज हस्तगत
पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडीसह इतर गुन्हे करणार्या सराईत चौकडीला पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तळोजा परिसरातून ताब्यात घेतले. या आरोपींकडून आतापर्यंत सात लाख 41 हजार 500 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून महागड्या लोखंडी प्लेट्स …
Read More »उरणच्या कळंबुसरेजवळ रस्ता खचला; अपघाताची शक्यता; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
उरण : प्रतिनिधी चिरनेर-कोप्रोली-आवरे रस्त्यावरील कळंबुसरे स्मशानभूमीजवळील मोरीवर रस्ता खचला आहे. या खचलेल्या रस्त्याला मोठे भगदाड पडले असूनही सार्वजनिक बांधकाम खाते याकडे दुर्लक्ष करीत आहे. परिणामी रस्त्यावर मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जेएनपीटी बंदराच्या अनुषंगाने उरणच्या पूर्व भागात अनेक सीएफएस एमटी यार्ड गोडाऊन वसले आहे. त्यामुळे या चिरनेर-कोप्रोली …
Read More »कॅटरिंग व्यवसायही तोट्यात
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोना महामारीच्या संकटाचा सामना सर्वच क्षेत्रांतील व्यावसायिकांना करावा लागत आहे. यामध्ये लग्न सोहळे, वाढदिवस, व अन्य समारंभामध्ये असणारा कॅटरिंग व्यवसाय डबघाईला आला आहे. कोरोनामुळे विवाह व अन्य समारंभांवर आलेल्या मर्यादांमुळे कमी लोकांच्या उपस्थितीत होणार्या कार्यक्रमांतील जेवणाचे मेन्युच गायब झाले आहेत. परिणामी कॅटरिंग व्यवसायिकांना तोटा सहन …
Read More »ट्रेनिंग कॅम्पआधी केकेआरचे खेळाडू क्वारंटाइन
कोलकाता ः वृत्तसंस्था कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) संघाने आयपीएलच्या 14व्या हंगामाच्या तयारीला सुरुवात केली आहे. त्यांनी ट्रेनिंग कॅम्पची तयारी पूर्ण केली आहे. खेळाडू आणि स्टाफ सात दिवसांसाठी क्वारंटाइन झाले आहेत. दोन वेळचा विजेता कोलकाता संघाने क्वारंटाइन कालावधी सुरू होण्याआधी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक, सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर, वेगवान गोलंदाज कमलेश …
Read More »भारतीय युवा नेमबाजांचा विश्वचषक स्पर्धेत दबदबा
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताच्या युवा ब्रिगेडने येथील डॉ. कर्णीसिंग शुटिंग रेंजमध्ये सुरू असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषकात शानदार कामगिरीच्या बळावर 10 मीटर एअर पिस्तूल व 10 मीटर एअर रायफल मिश्र प्रकारात सुवर्णपदके जिंकली. सौरभ चौधरी-मनू भाकर यांनी एअर पिस्तूलचे आणि इलावेनिल वलारिवान-दिव्यांश पनवर यांनी एअर रायफलचे सुवर्ण जिंकले. भारत पाच …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper