Breaking News

Ramprahar News Team

राज्यात उन्हाच्या तीव्र झळा; तापमानात वाढ

मुंबई : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांत राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला होता. त्यामुळे मार्च महिन्याच्या सुरुवातीला वाढलेले तापमान काही अंशी कमी झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यातला पारा वाढला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चाळीशी पार गेला आहे. उन्हामुळे नागरिकांच्या शरीराची लाहीलाही व्हायला सुरुवात झाली आहे. पारा वर …

Read More »

कोरोनामुळे होळीसह धुळवड बेरंग

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात होळीचा सण पारंपारीक आणि साध्या पदधतीने साजरा करण्यात आला. रविवारी होळीचे दहन केल्यानंतर सोमवारी सर्वत्र धुळवड साजरी करण्यात आली. या दोन्ही उत्सवांवर कोरोनाचे सावट पहायला मिळाले. कोरोनाच्या संकटाने पुन्हा डोके वर काढल्याने होळीबरोबरच धुळवडीच्या रंगाचा बेरंग झाला. रविवारी जिल्ह्यात प्रत्येक गावच्या प्रथेप्रमाणे होळी साजरी करण्यात …

Read More »

पनवेल मनपा हद्दीत होळीनिमित्त गर्दी करणार्‍या सोसायट्यांवर कारवाई

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होळी साजरी करण्यास उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध घालण्यात आले होते. तरीही ज्या गृहनिर्माण सोसायट्यांनी गर्दीबाबतचे नियम पाळले नाहीत त्यांच्यावर महापालिकेने रविवारी कारवाई केली आहे. महापालिका हद्दीत कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे होळी साजरी करण्यास उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध घालण्यात आले होते. रविवारी (दि. 28) खारघरमधील …

Read More »

वारकरी समाजाची मुस्कटदाबी; कीर्तनकार बंडातात्यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल; देहूत आज तुकाराम बीज; वेशीवरील आंदोलन स्थगित

पुणे : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी तुकाराम बीज मंगळवारी  (दि. 30) सोहळ्यासाठी देहू येथील संत तुकाराम महाराज देवस्थानात केवळ 50 लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे, मात्र वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी या निर्णयाविरोधात देहूच्या वेशीवर भजन सत्याग्रह आंदोलन केले. या वेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार …

Read More »

उरण भेंडखळच्या बीपीसीएल; प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला यश

उरण : प्रतिनिधी बीपीसीएल प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांना सोसायटी बनवून प्रकल्पामध्ये समाविष्ट करून घेण्याचे मान्य केले आहे. या बैठकीत परमनंट कामगारांचे काम जे बाहेरचे कान्ट्रॅक्ट लेबर्स करतात ते सर्व काम प्रकल्पग्रस्त सोसायटीच्या माध्यमातून करतील असे बैठकीत ठरविण्यात आले. त्यामुळे आमदार महेश बालदी यांच्या पाठिंब्याने करण्यात आलेल्या उपोषणाला अखेर यश आले आहे. उरण …

Read More »

विद्यार्थिनींकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप

मोहोपाडा : प्रतिनिधी खालापूर तालुक्याच्या खेडेगावातील कॉलेजमध्ये शिकणार्‍या तीन विद्यार्थिनींनी आपल्या दैनंदिन पॉकीट मनीतून बचत केलेल्या पैशातून कर्जत शहरातील कन्या शाळेत वह्या वाटप करून आदर्श घालून दिला आहे. या तीन तरुणींनी केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून या वह्या वाटपातून गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास उत्साह मिळेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त …

Read More »

पुन्हा लॉकडाऊन नको रे बाबा…

पनवेल : प्रतिनिधी आता पुन्हा लॉकडाऊन नको रे बाबा… लॉकडाऊनच्या नुसत्या आठवणीने अंगावर काटा येतो. अलिकडच्या काही दिवसात धार्मिक, कौटुंबिक, सणासुदीच्या कार्यक्रमातही शासनाने वेळोवेळी जाहीर केलेल्या सुचनांचे पालन नागरिक करीत नसल्याने पुन्हा कोरोनाच्या रुग्णांमध्ये होणारी वाढ चिंताजनक आहे. 10 मार्च 2020 रोजी पनवेल महापालिका क्षेत्रात पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला होता. …

Read More »

नवी मुंबईतील खाजगी रुग्णालयात कोरोना लसीकरणास सुरुवात

नवी मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे शहरात मनपाकडून विविध ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र सुरू केले आहेत. त्यानुसार वाशीतील एमजीएम रुग्णालय व इएसआयएस या दोन रुग्णालयात जम्बो लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी भाजपचे अ‍ॅड. निलेश भोजणे व सामाजिक कार्यकर्ते अंशुवर्धन राजेश शेट्टी यांनी मनपा आयुक्त अभिजित …

Read More »

शिवजयंती साध्या पद्धतीने करण्याचे निर्देश

पनवेल : प्रतिनिधी कोविड 19मुळे निर्माण झालेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करून 31 मार्च 2021 रोजी तिथीनुसार होणारी ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ साधेपणाने साजरी करण्याच्या सूचना राज्य शासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. यालाच अनुसरून पनवेल महानगरपालिकेने शहरातील शिवजयंती मंडळांनी यावर्षीचा शिवजयंतीचा उत्सव साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी …

Read More »

पनवेलमध्ये वाढत्या कोरोनामुळे कामगारांना लॉकडाऊनची भीती

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना संसर्गामुळे संपूर्ण देशात झालेल्या टाळेबंदीला एक वर्ष पाच दिवस पूर्ण झाले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात  कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. दररोज 200पेक्षा जास्त  रुग्ण आढळत असल्याने पुन्हा लॉकडाऊन लागेल की काय, असा प्रश्न पनवेलकरांना पडला आहे. मध्यमवर्गीय तसेच कामगार वर्गात  भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, …

Read More »