Breaking News

Ramprahar News Team

विधान परिषद निवडणुकीत महायुतीने मारली बाजी; शेकापचे जयंत पाटील पराभूत

मुंबई ः प्रतिनिधी विधान परिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली असून 12पैकी नऊ उमेदवार विजयी झाले आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीला दोन जागांवर समाधान मानावे लागले असून शेकापचे जयंत पाटील पराभूत झाले आहेत. महायुतीच्या विजयी उमेदवारांमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे (26 मते), परिणय फुके (26 मते), योगेश टिळेकर (26 मते), अमित गोरखे (26 …

Read More »

किमान गावठाणापासून 500 मीटरची घरे सरसकट नियमित करा

आमदार महेश बालदी यांची विधिमंडळात मागणी पनवेल ः प्रतिनिधी सिडकोचे योग्य नियोजन नसल्याने भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांच्या नैसर्गिक गरजेपोटी बांधलेल्या घरांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे किमान गावठाणापासून 500 मीटरची घरे सरसकट नियमित करावीत, अशी मागणी आमदार महेश बालदी यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाकडे केली. सभागृहात मुद्दा उपस्थित करताना आमदार …

Read More »

राज्यात क्षयरोग निर्मूलनासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात -आमदार प्रशांत ठाकूर

मुंबई, पनवेल ः रामप्रहर वृत्त राज्यात जवळपास अडीच लाख क्षयरोग रुग्ण आहेत. त्यांच्या उपचारासाठी लागणार्‍या औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याचे निदर्शनास आले असून राज्यात क्षयरोग निर्मूलनाकरिता शासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून केली. सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याणमंत्री तानाजी सावंत …

Read More »

गरजेपोटी बांधलेल्या घरांवर कारवाई करू नका -रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांचे सिडकोला आदेश

आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने बैठक  पनवेल ः प्रतिनिधी पनवेल व उरण मतदारसंघातील विविध समस्यांबाबत आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यासमवेत मंगळवारी (दि.9) मंत्रालयात बैठक घेत चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने गरजेपोटी बांधण्यात आलेल्या घरांवर कारवाई न करण्याची मागणी दोन्ही आमदारांनी …

Read More »

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण करून त्याचे भांडवल केले. त्यांना विकास नको. नकारात्मक गोष्टी हव्या होत्या. समाजात विष पेरण्याचे काम त्यांनी केले, पण आम्ही कामातून, कर्तृत्वाने मोठे झालो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले एनडीए आघाडीचे हे सरकार पाच …

Read More »

रायगड क्रिकेट असोसिएशनला सर्वतोपरी मदत करणार -आशिष शेलार

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन (आरडीसीए)ला सर्वतोपरी मदत करणार, असे आश्वासन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) खजिनदार आशिष शेलार यांनी आरडीसीएच्या प्रतिनिधी मंडळाला दिले. बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार शनिवारी (दि. 29) अलिबाग चोंढी येथील हॉटेल साई इन येथे भाजपच्या बैठकीसाठी आले होते. या वेळी आरडीसीएचे नवनिर्वाचित अध्यक्ष तथा …

Read More »

स्वप्नपूर्ती!

भारताने ट्वेंटी-20 विश्वचषक जिंकून आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या स्पर्धांमधील विजेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय मिळवत या झटपट प्रकारातील चषकावर दुसर्‍यांदा आपले नाव कोरले. चातक पक्षी जसा पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो, तसा प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमी आपला संघ जगज्जेता होण्याची …

Read More »

‘रयत’चा रायगड विभाग अव्वल राहिला पाहिजे -लोकनेते रामशेठ ठाकूर

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचा रायगड विभाग अव्वल राहिला पाहिजे, असे प्रतिपादन संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वाशी येथे बोलताना व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागातील मुख्याध्यापकांची सहविचार सभा नवी मुंबईतील वाशी येथील मॉर्डन स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आली …

Read More »

‘दिबां’च्या स्मृतिदिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिर

रिक्षा, टॅक्सी चालक मालक आणि परिवाराने घेतला लाभ पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष पनवेल शहर व तालुका आणि वंदे मातरम जनरल कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त रिक्षा व टॅक्सी चालक मालक आणि त्यांच्या परिवारासाठी मोफत आरोग्य शिबिर रविवारी (दि. 23) आयोजित करण्यात …

Read More »

उरण मोठी जुई येथील शेकाप, ठाकरे गट, काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपमध्ये

उरण ः वार्ताहर उरण तालुक्यातील मोठी जुई येथील शेतकरी कामगार पक्ष, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर आकर्षित होऊन रविवारी (दि. 23) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी स्वागत केले. मोठी जुई येथे झालेल्या या …

Read More »