Breaking News

Ramprahar Team

पेण शहरात श्री सदस्यांनी गोळा केला 62 टन कचरा

पेण : प्रतिनिधी महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे मंगळवारी पेण शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी तालुक्यातील पेण, दादर वरवणे, सापोली, हनुमानपाडा, वरसई, धावटे, वाशीनाका, रावे, वडखळ, आंबिवली, जिते, शिर्की या 15 बैठकांतील 1034 श्री सदस्यांनी 62 टन सुका व …

Read More »

गुरव समाजातील तरुणांनी उद्योजक बनावे -बंडू खंडागळे

पेण : प्रतिनिधी समाजातील तरुणांनी उद्योजक बनावे, त्यासाठी त्यांना संघटनेच्या वतीने मदत करण्यात येईल, अशी ग्वाही गुरव समाज ठाणे-रायगड-मुंबई या संस्थेचे अध्यक्ष बंडू खंडागळे यांनी पेण येथे दिली. गुरव समाज ठाणे-रायगड-मुंबई या संस्थेची सभा पेण पी. के. रिसॉर्ट येथे झाली. त्यावेळी बंडू खंडागळे बोलत होेते. समाज संघटनेत आता युवा पिढीला …

Read More »

पोलादपुरातील पाणी योजना दुरूस्तीच्या प्रतीक्षेत

अतिवृष्टीमुळे 22 जुलै 2021 रोजी पोलादपूर तालुक्यातील पाच प्रमुख नद्यांसह अनेक उपनद्यांची पात्रं दुथडी भरून वाहू लागल्याने नदीपात्रातील विविध गावांच्या पाणीपुरवठा योजनांच्या जॅकवेल वाहून गेल्या. त्यापैकी पोलादपूर नगरपंचायत हद्दीतील एकमेव जुनी पाणीपुरवठा योजना वेळेवर निधी मिळूनही सुरू झाली नसल्याचे दिसून येत आहे. राजकीय ठेकदारी आणि टक्केवारीच्या व्यवस्थेमुळे पोलादपूर तालुक्यातील नळपाणी …

Read More »

महाशिवरात्रीनिमित्त घुमला हर हर महादेवचा गजर

विविध शिवमंदिरांमध्ये भक्तांची मांदियाळी पनवेल : रामप्रहर वृत्त महाशिवरात्रीचे औचित्य साधून पनवेलमधील विविध शंकर मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली होती. त्याचप्रमाणे शासनाच्या नियमांचे पालन करूनच भाविकांना मंदिरांमध्ये प्रवेश देण्यात आला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता. पनवेलमधील कामोठे, खांदेश्वर येथील शिवमंदिरांमध्ये सकाळपासूनच नागरिकांनी मोठ्या संख्येने …

Read More »

ब्रम्हकुमारीजच्यावतीने ‘ज्योतिर्लिंग दर्शन’ कार्यक्रम

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये महाशिवरात्री मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त नवीन पनवेल येथील नील हॉस्पिटलमध्ये ब्रम्हकुमारीज्च्यावतीने ‘ज्योतिर्लिंग दर्शन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांचे पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते शिवध्वजारोहण करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रभाग समिती सभापती अ‍ॅड. वृषाली वाघमारे, प्रमिला पाटील, …

Read More »

…तर अधिवेशन चालू देणार नाही

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा पत्रकार परिषदेत इशारा पनवेल ः रामप्रहर वृत्त मुंबई बॉम्बस्फोटात शेकडोंचे बळी घेणारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्यासाठी मनी लाँडरिंग केल्याच्या आरोपावरून अटक झालेले मंत्री नवाब मलिक यांना महाविकास आघाडीने पाठिंबा देणे म्हणजे दाऊद इब्राहिमला साथ देणे आहे. देशद्रोही गुन्ह्यात अटक झालेल्या नवाब मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा …

Read More »

पनवेल तालुक्यात आंबा मोहरला

मार्चअखेरीस फळ बाजारात दाखल होण्याची शक्यता पनवेल : वार्ताहर तालुक्यात हळूहळू आंब्याच्या झाडांना मोहर लागल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसू लागले आहे. काही दिवसांपूर्वी पनवेल तालुक्यात पडलेल्या थंडीमुळे याठिकाणच्या हापूस, पायरी आंबा व इतर प्रजातीच्या बागा बर्‍यापैकी मोहरल्या आहेत. बागा मोहरण्याने प्रमाण काही ठिकाणी 60 टक्के तर काही बागांमध्ये 80 ते …

Read More »

पनवेल महापालिका क्षेत्रात 70 टक्के पोलिओ लसीकरण

चार दिवस सुरू राहणार मोहीम पनवेल : प्रतिनिधी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेमध्ये महापालिका हद्दीत रविवारी 0 ते 5 वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ लसीकरण करण्यात आले  आयुक्त  गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाने पोलिओ  लसीकरणाचे सुयोग्य नियोजन केल्याने पल्स पोलिओचे 70 टक्के लसीकरण करण्यात यश आले. राष्ट्रीय पल्स …

Read More »

गव्हाण विद्यालयात ’अंनिस’तर्फे वैज्ञानिक जनजागृती

पनवेल : रामप्रहर वृत्त नोबेल पारितोषिक विजेते प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमण यांच्या जयंतीदिनी रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.पनवेल तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते चंद्रकांत सर्वगोड व अनंत बाविस्कर यांनी …

Read More »

ऑल इंडिया सिफेरर्स अॅण्ड जनरल वर्कर्स युनियनतर्फे शिपिंग क्षेत्रातील फसवणुकीविरोधात आंदोलन

पनवेल : वार्ताहर अनेक वर्षांपासून शिपिंग क्षेत्रातील चालू असलेल्या फसवणुकीला विरोध करण्यासाठी आज ऑल इंडिया सिफेरर्स अ‍ॅण्ड जनरल वर्कर्स युनियनतर्फे नवी मुंबईतील बेलापूर येथे आंदोलन करण्यात आले. वर्षानुवर्ष नवी मुंबई हे शिपिंग क्षेत्रात हे एक अग्रगण्य शहर आहे. येथे शिपिंग क्षेत्रातील प्रशिक्षण देणार्‍या अनेक संस्था असून अनेक शिपिंग कंपन्या आहेत. …

Read More »