Breaking News

Ramprahar Reporters

चिंचवण ब्रिजवर एसटीची खासगी बसला जोरदार धडक; चार जण जखमी

पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील चिंचवण ब्रिजच्या वरती गुरुवारी (दि. 29) सकाळी एसटी बस आणि खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. पनवेल-पेण एसटी बस निसरड्या रस्त्यामुळे डिव्हायर ओलांडून पलिकडे गेली. याचवेळी समोरून येणार्‍या जेएसडब्ल्यू स्टील कंपनीच्या बसला एसटी बस जाऊन आदळली. यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत. पावसाळा नुकताच …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झिराडमध्ये गुणवंतांचा गौरव

विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील झिराड ग्रामपंचायत, साई क्रीडा मंडळ व साई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. 28) झिराड येथे आयोजित कार्यक्रमात भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुणवंतांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटपही केले गेले. रायगड …

Read More »

राज्यात 40 हजार कोटी गुंतवणुकीच्या प्रकल्पांना मान्यता -मुख्यमंत्री

रायगड, नवी मुंबईचा समावेश मुंबई : प्रतिनिधी राज्यात पुणे, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), नंदूरबार, अहमदनगर, रायगड, नवी मुंबई याभागात 40 हजार कोटी रुपये गुंतवणूकीच्या विशाल प्रकल्पांना उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बुधवारी (दि. 28) झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे राज्यात सुमारे एक लाख 20 हजार रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

स्वयंचलित हवामान केंद्र देणार आपत्तीची पूर्वसूचना

रायगड जिल्ह्यात 82 ठिकाणी उभारणी अलिबाग : प्रतिनिधी पावसाळयात उदभवणारया पूर आणि दरड दुर्घटनांपासून नागरिकांचा बचाव व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. पावसाबरोबरच वातावरणातील इतर महत्वाच्या घडामोडींच्या नोंदी ठेवण्यासाठी जिल्हयात स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जात आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 82 ठिकाणी अशी केंद्र …

Read More »

खोपोलीजवळील धाकटी पंढरीत हजारो भाविक दाखल आषाढीनिमित्त संतांचा मेळा अवतरला

खोपोली : प्रतिनिधी खोपोलीजवळील ताकई-साजगांव येथील धाकटी पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात गुरुवारी (दि. 29) साजर्‍या होणार्‍या आषाढी एकादशीनिमित्त हजारो भाविक बुधवारीच दाखल झाले आहेत. वारकरी व सर्वसामान्य भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून धाकटी पंढरी देवस्थान समितीकडून आवश्यक सर्व नियोजन करण्यात आले असल्याचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी …

Read More »

आंबेनळी घाटात दरड कोसळली

तब्बल दहा तासांनंतर वाहतूक सुरळीत  पोलादपूर : प्रतिनिधी आंबेनळी घाटात मंगळवारी (दि. 27) रात्री 11.30 वा. च्या सुमारास दरड कोसळल्याने पोलादपूर-महाबळेश्वर दरम्यान वाहतूक ठप्प झाली होती. बुधवारी (दि. 28) सकाळी दरड हटविण्याचे काम पूर्ण करून या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. महाबळेश्वर आणि पोलादपूर परिसरात सुरु असेलेल्या संततधार पावसामुळे, आंबेनळी …

Read More »

वनडे वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर; 15 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान सामना

मुंबई : प्रतिनिधी यंदा भारताच्या यजमानपदाखाली खेळल्या जाणार्‍या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक मंगळवारी (दि. 27) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) मुंबईत जाहीर करण्यात आले.  या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. यजमान असल्याने भारताला या स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे. अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, बांगलादेश, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण …

Read More »

मुंबई-गोवासह पाच वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

भोपाळ : वृत्तसंस्था देशवासीयांना एकाच दिवशी पाच वंदे भारत ट्रेनची भेट मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 27) मडगाव (गोवा)-मुंबई, भोपाळ-इंदौर, भोपाळ-जबलपूर, रांची-पाटणा आणि धारवाड-बंगळुरू अशा पाच वंदे भारत रेल्वेगाड्यांना भोपाळ येथील राणी कमलापती रेल्वेस्थानकावरून हिरवा झेंडा दाखविला. एकाच दिवसात पाच सेमी हायस्पीड ट्रेन सुरू होण्याची ही पहिलीच …

Read More »

पनवेल महापालिका क्षेत्रातील मुस्लीम, ख्रिश्चन, बोहरी समाजाच्या दफनभूमीचा प्रश्न मार्गी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीला आयुक्तांचा सकारात्मक प्रतिसाद पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील मुस्लीम, ख्रिश्चन आणि बोहरी समाजाच्या दफनभूमीचा अनेक वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने मार्गी लागला आहे. याबाबत तिन्ही समाजांच्या प्रतिनिधींची बैठक सोमवारी (दि. 26) आयुक्त गणेश देशमुख यांच्या दालनात झाली. या वेळी आयुक्तांनी …

Read More »

खोपोली सुभाष नगरातील नागरी समस्या सोडविण्याची भाजपची मागणी

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली प्रभाग नंबर 1 सुभाषनगर येथील विविध नागरी समस्यांबाबत भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाने मुख्याधिकारी अनुप दुरे यांना निवेदन दिले आणि तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. खोपोली सुभाष नगर येथील मस्को स्टील रेल्वेगेट ते सुभाषनगरपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करून या रस्त्याला माजी उपनगराध्यक्ष …

Read More »