Breaking News

Ramprahar Reporters

भाजप उत्तर रायगड जिल्हा अंतर्गत पदाधिकार्‍यांची नियुक्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मान्यतेने उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी जिल्हास्तरीय पदाधिकार्‍यांची घोषणा केली आहे. यामध्ये जिल्हा सरचिटणीस, उपाध्यक्ष, चिटणीस, कोषाध्यक्ष, विविध मोर्चांचे जिल्हाध्यक्ष, आघाड्यांचे जिल्हा संयोजक तसेच नऊ मंडलांचे अध्यक्ष यांचा समावेश आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकार्‍यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, …

Read More »

पनवेल महापालिकेच्या शाळा झाल्या डिजिटल!

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते क्लासरूमचे उद्घाटन पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या वतीने सर्व शाळा डिजिटल करण्यात आल्या आहेत. लोकनेते दि.बा.पाटील शाळेमध्ये डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 6) करण्यात आले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिकेच्या शाळा डिजिटल झाल्याने येणार्‍या काळात महापालिकेचे विद्यार्थीही …

Read More »

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून वैद्यकीय शिक्षणासाठी डॉ. भावेश जोशींना दोन लाख रुपयांची मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी नवीन पनवेल येथील डॉ. भावेश कृष्णा जोशी यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून दोन लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे …

Read More »

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते नावड्यात पाण्याच्या टाकीचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त नावडे गावात असलेल्या स्मशानभूमीत पाण्याची टाकी बांधण्यात आली असून या टाकीचे लोकार्पण पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 5) झाले. या वेळी त्यांनी या स्मशानभूमीतील इतरही कामे मार्गी लावणार असल्याची ग्वाही दिली. नावडे येथे मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढत असून तेथील स्मशानभूमीत …

Read More »

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे जलतरण स्पर्धेत सुयश; पदकविजेत्या खेळाडूंचे अभिनंदन

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमधील तीन विद्यार्थ्यांनी रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत सुयश प्राप्त केले आहे. संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यालयातील श्लोक कोकणे या विद्यार्थ्याने …

Read More »

नवीन पनवेलच्या पाणीप्रश्नी नागरिकांची बैठक

सिडकोकडे पाठपुरावा करणार -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्त सिडकोच्या चालढकल कारभारामुळे नवीन पनवेल वसाहतीमधील रहिवाशांचे पाण्यावाचून हाल सुरू असून नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या पाणीप्रश्नासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची बैठक रविवारी (दि. 3) खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात झाली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागरिकांच्या समस्या …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते चिंचवणमध्ये रस्ता, बसथांब्याचे उद्घाटन

महिला बचत गटांना साहित्यवाटप पनवेल : रामप्रहर वृत्त कार्यतत्पर आमदार महेश बालदी यांच्या निधीतून पनवेल तालुक्यातील आणि उरण विधानसभा मतदारसंघातील चिंचवण येथे रस्ता आणि बसथांबा निवारा शेडचे उद्घाटन तसेच वनविभागाच्या वतीने महिला बचत गटांना साहित्याचे वाटप शनिवारी (दि. 2) करण्यात आले. आमदार महेश बालदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. या …

Read More »

ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्याची भूमिका तसेच राज्यात होत असलेल्या सर्वांगीण विकासावर प्रभावित होऊन अनेक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होत आले. अशाच प्रकारे रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख येथील ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. …

Read More »

शरीरसौष्ठवपटू ऋषिकेश पेंडकरला परेश ठाकूर यांच्याकडून एक लाखांची मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त पंजाब येथे झालेल्या मिस्टर इंडिया शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेल्या पनवेलमधील ऋषिकेश पेंडकर याला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी नेपाळ येथे होणार्‍या मिस्टर एशिया स्पर्धेसाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. शरीरसौष्ठवपटू ऋषिकेश पेंडकर पनवेल प्रभाग क्रमांक 19मधील रहिवासी असून त्याने नुकताच पंजाब …

Read More »

पुष्पक नोड नवीन वरचे ओवळे परिसराला डोंगरापासून संरक्षणासाठी तारेची संरक्षण भिंत

20 कोटींचा निधी मंजूर; आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई आतरराष्ट्रीय विमानतळाच्या अनुषंगाने पुनर्वसन झालेल्या पुष्पक नोड सेक्टर 1 नवीन वरचे ओवळे परिसराला डोंगरापासून संरक्षण होण्याकरिता तारेची संरक्षण भिंत उभारण्यात येणार असून याकामी आमदार महेश बालदी यांनी केलेल्या पाठपुराव्यातून सिडकोमार्फत 20 कोटी रुपयांचा निधी …

Read More »