पोलादपूर : प्रतिनिधी : चित्रकलेतही करिअर शक्य असल्याची जाणीव पालकवर्गात होऊ लागली असल्याने चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळू लागला आहे, असे मत आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार प्रमोद दीक्षित यांनी व्यक्त केले.पोलादपूर शहरातील महिला उत्कर्ष समितीतर्फे येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहामध्ये घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद …
Read More »Monthly Archives: March 2019
ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयाचे नामकरण
नागोठणे : प्रतिनिधी : येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या हॉलला कै. मामा शहासने सभागृह असे नाव देण्यात आले असून आज प्रत्यक्षात हा नामकरण विधी होत आहे. या कार्यपूर्तीने समाधान वाटत असल्याची भावना जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांनी व्यक्त केली. ग्रामपंचायतीकडून नागोठणे ज्येष्ठ नागरिक संघटनेस सभागृह उपलब्ध करण्यात आले. त्याला सुधाकर …
Read More »मोरे महिला महाविद्यालयाचा रोह्यात पदवीदान समारंभ
रोहे ः प्रतिनिधी : आयुष्यात आत्मविश्वास, ध्येय, जिद्द, प्रयत्न, संयम ही पंचसूत्री अंगीकारल्यास आपण विविध स्पर्धा परीक्षांत सहज यश संपादन करू शकतो. महिलांनी स्पर्धा परीक्षेतून करिअर घडवावे, असे आवाहन रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड यांनी येथे केले.एम. बी. मोरे फाऊंडेशनच्या रोहे येथील एम. बी. मोरे कला, वाणिज्य व विज्ञान …
Read More »मच्छीमारांनी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करावा
चंद्रकांत सरपाटील यांचे प्रतिपादन; विशाखापट्टणम येथे कार्यशाळा संपन्न मुरुड : प्रतिनिधी : समुद्रात मासेमारी करताना वेव्ह रायडर (बोया)सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केल्यास कोळी बांधवांना सुरक्षित राहण्याबरोबरच मासेसुद्धा मुबलक प्रमाणात मिळवता येतील. त्यामुळे त्यांना विकास साधणे सहज सोपे जाईल, असा विश्वास मुरुडच्या जय भवानी मच्छीमार सोसायटीचे ज्येष्ठ सदस्य चंद्रकांत सरपाटील यांनी …
Read More »भाजपमध्ये इनकमिंग जोरात
कर्जत तालुक्यातील कार्यकर्ते पक्षात दाखल कर्जत : बातमीदार : कर्जत तालुक्यातील खांडपे ग्रामपंचायतीमधील राष्ट्रीय काँग्रेस आणि चिंचवली ग्रामपंचायतीमधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 6) रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. खांडपेमधील भाजप प्रवेश करणार्या कार्यकर्त्यांत काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षांच्या सुपुत्राचाही समावेश आहे. पेण येथे झालेल्या कार्यक्रमात …
Read More »अँड्रॉईडची द्विस्तरीय सुरक्षा
आपल्या हातातील मोबाईल जितका स्मार्ट बनत चालला आहे, तितके आपण त्यावर अवलंबून राहू लागलो आहोत. आजघडीला कार्यालयीन कामांपासून बँकेच्या व्यवहारांपर्यंतच्या अनेक गोष्टी स्मार्टफोनच्या माध्यमातूनही केल्या जातात. मात्र हे करत असताना स्मार्टफोनला विशेषतः अॅण्ड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित मोबाईल्सना भेडसावणारा गोपनीयता किंवा सुरक्षिततेचा मुद्दा आपण विसरून जातो. अॅण्ड्रॉईडचा मुख्य आधार असलेले गुगल …
Read More »समानता हवीच!
राजेरजवाड्यात कोंडून ठेवलेली ज्ञानगंगा झोपडी-झोपडीतून वाहून शिक्षण देण्याचे कार्य करून ही ज्ञानगंगा उंबरठ्यापर्यंत नेऊन मुलींना शिक्षण देण्याचे पवित्र कार्य करणार्या क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले दाम्पत्याला महिला दिनानिमित्त कोटी कोटी वंदन. स्वराज्य निर्मितीचे स्वप्न उराशी बाळगून आपल्या पुत्राला त्या ध्येयाप्रत पोहोचवण्यासाठी केलेले उच्च कोटीचे संस्काराच्या शिरोमणी राष्ट्रमाता …
Read More »शतकवीर रॉजर फेडरर
दुबईत झालेल्या एटीपी टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावून स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने आपल्या विजेतेपदांची शंभरी गाठली. ग्रीसच्या स्टेफॅनो सित्सिपासला पराभूत करत त्याने ऑस्ट्रेलियन ओपनमधील पराभवाची परतफेड तर केलीच; पण अजूनही आपण अशा कित्येक स्पर्धा खेळण्यास सक्षम आहोत, हे दाखवून दिले. चाळीशीकडे झुकलेला असतानाही तो आघाडीवर राहण्याच्या प्रयत्नात आहे. लवकरच फेडरर अडतिसावा वाढदिवस …
Read More »प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना
केंद्र शासनाने 18 ते 40 वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार व असंघटीत कामगारांसाठी ज्यांचे मासिक उत्पन्न 15 हजार किंवा त्यापेक्षा कमी आहे, त्यांच्यासाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन ही पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत दरमहा वयोगटानुसार 55 रुपये ते 200 रुपये मासिक अंशदान जमा करून वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा किमान तीन …
Read More »असंघटित कामगारांचे हित
देशातील असंघटित क्षेत्रात काम करणार्या कामगारांना आता खर्या अर्थाने अच्छे दिन येणार आहेत. कारण मोदी सरकारने त्यांच्या हिताचा विचार करून प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा लाभ देशातील कोट्यवधी असंघटित कामगारांना होणार आहे. त्यामुळे त्यांचा भविष्यकाळही सुखकर होणार आहे. देशातील असंघटित कामगारांची संख्या लक्षणीय आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper