पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड बॉडी बिल्डर्स अॅण्ड फिटनेस असोसिएशनच्या मान्यतेने डॉ. संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने आमचा चषक ‘रायगड श्री 2019’ जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धा कामोठे येथे पोलीस स्टेशनसमोर रविवारी (दि. 10) रोजी सायंकाळी 6.30 वाजता होणार आहे. या स्पर्धेतून रायगड जिल्हा …
Read More »Monthly Archives: March 2019
दीपाच्या जिम्नॅस्टिक्स वर्ल्डकप सहभागाला ‘साई’चा हिरवा कंदील
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) मंगळवारी दीपा कर्माकरच्या आगामी बाकू आणि दोहा येथे होणार्या जिम्नॅस्टिक्स वर्ल्डकपच्या सहभागाला हिरवा कंदील दाखविला आहे, मात्र भारतीय जिम्नॅस्टिक फेडरेशनला पुरुष जिम्नॅस्टसाठी निवड चाचणी घेण्यास सांगितले. याबाबतचे पत्र ‘साई’ने भारतीय जिम्नॅस्टिक फेडरेशनला (जीएफआय) पाठविले आहे. यात ‘साई’ने दीपा आणि तिचे प्रशिक्षक बिश्वेश्वर …
Read More »भिवंडीच्या बॉडीबिल्डरचा हृदयविकाराने मृत्यू
भिवंडी : प्रतिनिधी भिवंडी शहरातील नामांकित शरीरसौष्ठवपटूचा अकस्मात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 35 वर्षीय रवी सावंत यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी परिसरात असंख्य स्पर्धा जिंकून रवी सावंत यांनी नाव कमावलं होतं. नुकतंच उरणमध्ये महाराष्ट्र राज्य हौशी शरीरसौष्ठव संघटनेने आयोजित केलेल्या स्पर्धेत त्यांनी तिसर्या …
Read More »आयसीसीने वर्ल्डकप खुशाल भारताबाहेर न्यावा : बीसीसीआय
मुंबई : प्रतिनिधी भारतात होणार्या 2021ची टी-20 वर्ल्डकप आणि 2023मध्ये होणार्या वनडे वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धांसाठी भारत सरकारने कर सवलत द्यावी, अशी मागणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने केली असताना बीसीसीआयने मात्र कर सवलतीचा निर्णय सरकारचा आहे आणि आम्हाला तो बंधनकारक आहे, असे म्हणत जर आयसीसीला या स्पर्धा भारताबाहेर न्यायच्या असतील, तर ते …
Read More »क्रिकेटच्या मैदानावर पकडापकडी; धोनीने चाहत्याला पळविले
नागपूर : वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची गळाभेट घेण्यासाठी किंवा त्याच्या पाया पडण्यासाठी चाहत्यांनी मैदानावर धावत येण्याची बाब नवी नाही. असाच प्रकार नागपूरच्या व्हीसीए स्टेडियममध्ये घडला, मात्र चाहत्याची फिरकी घेण्यात धोनीही मागे राहिला नाही. त्याचं झालं असं की नागपूर वन डेत जेव्हा भारतीय संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला, …
Read More »श्रीलंका येथील कराटे स्पर्धेत युगल चौधरीला सुवर्णपदक
पनवेल : बातमीदार श्रीलंकेत झालेल्या कराटे स्पर्धेत खोपोली येथील युगल चौधरी याने सुवर्णपदक पटकावले आहे. त्यामुळे त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. श्रीलंका येथे इंडिया नेपाल श्रीलंका कराटे चाम्पियन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. खोपोली येथील आनंद स्कूल शाळेतून देवन्हावे येथील इयत्ता नववीत शिकणारा युगल जगदीश चौधरी (14) याला या कराटे …
Read More »नागपूर वनडेत भारताचा 500वा विजय
नागपूर : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्या वनडेमध्ये भारताचा 8 धावांनी रोमांचक विजय झाला. यामुळे भारतानं 5 वनडे मॅचच्या सीरिजमध्ये 2-0नं आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्या वनडेमधला भारताचा हा 500वा विजय होता. वनडेमध्ये 500 विजय मिळवणारा भारत हा दुसरा देश बनला आहे. वनडेमध्ये सर्वाधिक विजय ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहेत. ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत 924 मॅचमध्ये …
Read More »बीएसएफकडून संशयिताला अटक
कच्छ ः वृत्तसंस्था भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. गुजरात येथील कच्छ सीमेवर बॉर्डर सिक्युरिटी फोर्सने एका 50 वर्षीय संशयित पाकिस्तानी नागरिकाला अटक केली आहे. बीएसएफ आणि सुरक्षा यंत्रणांकडून या संशयित पाकिस्तानी नागरिकाची चौकशी सुरू आहे. सीमेवरून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असताना …
Read More »चोरीच्या कागदपत्रांच्या आधारे बातमी छापणार्यांवर कारवाई ; केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था राफेल प्रकरणात संरक्षण मंत्रालयातून चोरी केलेल्या कागदपत्रांच्या आधारे बातम्या छापण्यात आल्या आहेत. या कागदपत्रांच्या आधारे बातमी छापणार्या दोन इंग्रजी वृत्तपत्रांविरोधात ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट अंतर्गत कारवाई केली जाईल, अशी माहिती केंद्र सरकारच्या वतीने महाधिवक्ता के. के. वेणुगोपाळ यांनी सुप्रीम कोर्टात दिली. फ्रान्सबरोबर 36 राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी …
Read More »पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय भवनाला भीषण आग
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था दिल्लीतील सीजीओ कॉम्प्लेक्समधील पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय भवन इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. काल इमारतीच्या 5 व्या मजल्यावर ही आग लागली आहे. या आगीत एका सीआयएसएफ निरीक्षकाचा मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 24 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper