Breaking News

Monthly Archives: April 2019

कालिदास कोळंबकर भाजपत दाखल

मुंबई : प्रतिनिधी काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार राहुल शेवाळेंना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईत काँग्रेसला धक्का बसला आहे. कट्टर राणे समर्थक मानले जाणारे कोळंबकर लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक केल्यानं कोळंबकर आणि काँग्रेसमध्ये दुरावा निर्माण झाला होता. त्यानंतर …

Read More »

बारणे यांचा विजय ही आता फक्त औपचारिकता

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा दावा पनवेल  : प्रतिनिधी महायुतीच्या श्रीरंग बारणे यांची निवड ही आता फक्त औपचारिकता असल्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकुर यांनी मंगळवारी (दि.16) तळोजा येथील प्रचार सभेत बोलताना जाहीर केले. पनवेल विधानसभा मतदार संघातील तळोजा येथे महायुतीचे उमेदवार  श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ  रात्री 8 वाजता सभा  आयोजित …

Read More »

दुसर्या टप्प्यासाठी आज मतदान

मुंबई : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीसाठी दुसर्‍या टप्प्यातील निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होत आहे. महाराष्ट्रासह 13 राज्यांतील 97 मतदारसंघात हे मतदान होणार असून त्यात महाराष्ट्रातील 10 मतदारसंघांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर या मतदारसंघात गुरुवारी मतदान होत आहे. या मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षांचे …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या सभेची पेणमध्ये जोरदार तयारी

पेण : प्रतिनिधी 32 रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, आरपीआय, रासप, शिवसंग्राम युतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या निवडणूक प्रचारार्थ गुरुवारी (दि. 18) पेण येथे हॉटेल मार्कविस्ट मंथनशेजारी दुपारी 12 वाजता  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे. या सभेची पेणमध्ये जोरदार तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

देशहिताचा विचार करून मतदान करा

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आवाहन; रावे येथे सभा पेण : प्रतिनिधी नात्यागोत्यापेक्षा देश महत्त्वाचा असल्याने प्रत्येक नागरिकाला देशहितासाठी मोदी सरकार पुन्हा निवडून देणे गरजेचे आहे, यासाठी रायगड जिल्ह्याकरिता आपणा सर्वांनी निष्कलंक असा अनंत गीतेंसारखा खासदार निवडून द्या, असे आवाहन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी (दि. 17) पेण रावे येथे झालेल्या …

Read More »

रायगड जिल्ह्यात भगवान महावीरांचा विविध उपक्रमांनी जयघोष

नेरळला महिलांचा सहभाग कर्जत : बातमीदार भगवान महावीर यांच्या 1826व्या जयंतीनिमित्त नेरळ येथील जैन धर्मियांनी भगवान महावीरांच्या मूर्तीची मिरवणूक काढून आनंद साजरा केला. भगवान महावीर यांची मूर्ती रथावर घेऊन बसण्याचा मान नेरळमधील व्यापारी सोहोनलाल मियाचंद जैन यांना मिळाला होता. त्या कुटुंबातील लिलाबेन सोहोनलाल जैन, शोभा मोहनलाल जैन, रीना संजय जैन …

Read More »

अंबानी रुग्णालयातील एड्स रुग्णांना उपचार बंद; उपलोकायुक्त व आरोग्य विभागाचे सहायुक्तांकडून चौकशी सुरू

कर्जत : बातमीदार मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर धीरूभाई अंबानी रुग्णालय असल्याने तेथे राज्य सरकारने एड्स रुग्णांसाठी उपचार केंद्र सुरू केले होते, मात्र गेल्या दोन वर्षांपासून अंबानी रुग्णालय रुग्णशय्येवर असून तेथे रुग्णांवर उपचार कमी प्रमाणात आणि दिखाऊपणा जास्त अशी स्थिती आहे. अनेकांच्या तक्रारीनंतर राज्याचे उपलोकायुक्त, तसेच एड्स निर्मूलन कार्यक्रमाचे सहआयुक्त यांनी रुग्णालयाला …

Read More »

‘त्या’ मृत प्राण्यांच्या पोटात विष नाही; फॉरेन्सिकचा अहवाल सादर

अलिबाग : प्रतिनिधी रसायनी येथील एचओसी व बीपीसीएल कंपनी परिसरात 31 माकडे व 15 कबुतरे मृत पावल्याची घटना 15 डिसेंबर 2018 रोजी उघडकीस आली होती. त्या मृत माकडे व कबुतरांच्या शरीराचे भाग फॉरेन्सिक लॅबकडे पाठविले होते. फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात माकडे व कबुतरे यांच्या पोटात विष नसल्याचे नमूद करण्यात आले आहे, …

Read More »

महायुतीत प्रवेशाचा धडाका; कुडपण, ओंबळी आणि मोरगिरीतील कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

पोलादपूर : प्रतिनिधी राज्यात 15 वर्षे मंत्री असताना ज्यांना कधी कुडपण दिसले नाही, ते सुनील तटकरे या भागाचा विकास काय करणार, असा सवाल आमदार भरत गोगावले यांनी केला. पोलादपूर तालुक्यातील कुडपण, ओंबळी धनगरवाडी, मोरगिरी  फौजदारवाडी येथील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 17) शिवसेनेमध्ये प्रवेश केला, त्या वेळी …

Read More »

धिरज ओवळेकर यांचा वाढदिवस

पनवेल : वहाळ विभागीय पंचायत समिती युवामोर्चा अध्यक्ष धिरज ओवळेकर यांचा वाढदिवस बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी धिरज ओवळेकर यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरूणशेठ भगत, अ‍ॅड. चेतन केणी, बळीराम ओवळेकर उपस्थित होते.

Read More »