Breaking News

Monthly Archives: April 2019

सुधागडात दारूच्या नशेत एकाची हत्या, आरोपी अटकेत

पाली : दारूच्या नशेत झालेल्या बाचाबाचीतून एकाची हत्या झाल्याची घटना शनिवारी (दि. 27) रात्री सुधागड तालुक्यातील कोशिंबळे येथे घडली. याबाबत पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली आहे. राजेश शंकर राजिवडे (वय 42, रा. कोशिंबळे, ता. सुधागड) शनिवारी (दि. 27) रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास …

Read More »

रोहा बीडीओंकडून मढाली, वांदोली गावांची पाहणी

रोहे ः प्रतिनिधी : पाणीटंचाईचे सावट असलेल्या मढाली, वांदोली व वांदोली आदिवासी वाडी (ता. रोहा) या गावांची गटविकास अधिकारी पंडित राठोड व विस्तार अधिकारी सुनील गायकवाड यांनी पाहणी केली. या गावात पिण्यासाठी पाणी उपलब्ध आहे, मात्र ते लांबून आणावे लागते. टंचाई भासली, तर या गावाला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येईल, …

Read More »

श्रीवर्धन तालुक्यात पाणीटंचाई

आठ गावांमधील महिलांची पायपीट सुरू, टँकरची मागणी करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष श्रीवर्धन : प्रतिनिधी : तालुक्यातील आठ गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे, मात्र त्याकडे श्रीवर्धन पंचायत समिती दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप टंचाईग्र्रस्त ग्रामस्थांकडून केला जात आहे. श्रीवर्धन तालुक्यामधील साक्षीभैरी, कोढे पंचायतन, …

Read More »

सचिनने केले हार्दिकचे कौतुक; पण अन्य खेळाडूंवर नाराज

कोलकाता : वृत्तसंस्था कोलकाता नाइट रायडर्सच्या 232 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचे तगडे फलंदाज फक्त कागदावरील वाघ ठरले. हार्दिक पांड्या वगळता मुंबईचे अन्य फलंदाज तगड्या आव्हानाच्या दडपणाखाली विकेट देऊन माघारी परतले.  हार्दिकने 34 चेंडूंत 6 चौकार व 9 षटकार खेचून 91 धावांची वादळी खेळी केली, पण त्याची ही फटकेबाजी मुंबईला …

Read More »

रोहित, हे वागणं बरं नव्हं!

कोलकाता : वृत्तसंस्था आंद्रे रसेल आणि हार्दिक पांड्या यांच्या तुफान आतषबाजीनं कोलकातातील इडन गार्डन दणाणून सोडलं. कोलकाता नाइट रायडर्सच्या 232 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सकडून झुंज पाहायला मिळाली. मुंबईने लक्ष्याचा पाठलाग करताना 7 बाद 198 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात साजेशी झाली नाही. क्विंटन डी कॉक आणि रोहित …

Read More »

शमीच्या पत्नीचा घरात घुसून गोंधळ; पोलिसांनी घेतले ताब्यात

लखनौ : वृत्तसंस्था भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्यांची पत्नी हसीन जहा यांच्यातील वाद शमण्याचे नाव घेत नाही. एकीकडे आयपीएलमध्ये शमीकडून चांगली कामगिरी होत असताना दुसरीकडे त्याची पत्नी हसीन जहाला पोलिसांनी अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील अमरोहामध्ये हसीन जहाला पोलिसांनी शांतता भंग केल्याच्या आरोपावरून ताब्यात घेतले आहे. हसीनने …

Read More »

पांड्याने मोडला पंतचा विक्रम

मुंबई : प्रतिनिधी मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या मुकाबल्यात जोरदार फटकेबाजी पाहावयास मिळाली. या सामन्यात कोलकाताच्या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या हार्दिक पांड्याने जोरदार फटकेबाजी केली. झुंजार खेळी करून तो माघारी परतला, पण यात त्याने एक विक्रम केला. कोलकात्याने 2 बाद 232 धावांचा डोंगर उभा केला आणि मुंबईला …

Read More »

दिल्लीची प्रतीक्षा सात वर्षांनी फळाला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आयपीएलच्या बाराव्या हंगामात बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सवर मात करून दिल्लीने प्ले-ऑफ (बाद फेरी)मध्ये दाखल होण्याचा बहुमान मिळवला आहे. घरच्या मैदानावर दिल्लीने बंगळुरूवर मात केली. या विजयासह दिल्लीची तब्बल सात वर्षांची प्रतीक्षा फळाला आली आहे. 2012 साली दिल्लीचा संघ शेवटचा प्ले-ऑफसाठी पात्र ठरला होता. गेल्या काही हंगामांमध्ये दिल्लीच्या …

Read More »

कोलकाताची मुंबईवर सरशी

हार्दिक पांड्याची एकाकी झुंज अपयशी कोलकाता : वृत्तसंस्था आयपीएलमध्ये रविवारी (दि. 28) मुंबई इंडियन्सला कोलकाता नाईट रायडर्सकडून 34 धावांनी हार पत्करावी लागली. रसेलच्या (नाबाद 80) फटकेबाजीच्या जोरावर कोलकाताने मुंबईपुढे 233 धावांचे महाकाय लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हार्दिक पांड्याने प्रयत्नांची शर्थ करीत 91 धावांची खेळी केली, पण त्याची …

Read More »

कोकणही तापले! पोलादपुरातील लोहारमाळमध्ये 44 अंश तापमान

पोलादपूर : प्रतिनिधी राज्यात तापमानाचा पारा सातत्याने वर चढत असताना कोकणातही उष्मा वाढत असून, पोलादपूर तालुक्यातील लोहारमाळ येथे रविवारी (दि. 28) 44 अंश एवढ्या तापमानाची नोंद मोबाईलमध्ये दिसून आली. सर्वसाधारणपणे राज्यात विदर्भात उष्णतेचा भडका उडालेला पाहावयास मिळतो, पण रखरखीत उन्हाच्या झळा आता कोकणातही जाणवू लागल्या आहेत. रविवारी दुपारी दोन ते …

Read More »