Breaking News

Monthly Archives: April 2019

शरद पवार यांचा यू-टर्न!

मुंबई : प्रतिनिधी माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला असून, राहुल गांधींशिवाय पंतप्रधानपदासाठी अन्य पर्याय कोण असतील या प्रश्नावर उत्तर देताना मी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मु्ख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांचे नाव घेतले, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहे. …

Read More »

मोदी तर जिंकलेत या अफवेवर विश्वास ठेवू नका : पंतप्रधान

रांची : वृत्तसंस्था मोदी तर जिंकणारच आहेत. त्यांना मतदान करण्याची गरज नाही, अशा अफवा विरोधकांकडून पसरविल्या जात आहेत. त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते झारखंडच्या कोडरमा येथील एका प्रचार सभेला संबोधित करीत होते. तीन टप्प्यांतील मतदानानंतर विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. चौथ्या टप्प्यानंतर …

Read More »

कर्जत विधानसभा मतदारसंघात विक्रमी मतदान

कर्जत : बातमीदार : कर्जत विधानसभा मतदारसंघात काल मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडले. काल सायंकाळी पाच वाजेपर्यंत झालेले मतदान लक्षात घेता कर्जत विधानसभा मतदारसंघाची विक्रमी मतदानाकडे वाटचाल झाल्याचे दिसून  आले. साधारण 70 टक्के म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढली असून याचा फायदा खासदार श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार यापैकी …

Read More »

उन्हाचा तडाखा तरीही मतदानाचा धडाका

खोपोली-खालापुरात सरासरी 58 टक्के मतदान खोपोली : प्रतिनिधी : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी खालापूर तालुका व खोपोली नगरपालिका क्षेत्रातील एकूण 192 मतदान केंद्रांवर सोमवारी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी तीन तास सर्वच मतदान केंद्रांवर बर्‍यापैकी गर्दी झाली होती, मात्र 12 वाजल्यानंतर गर्दी कमी झाली. दुपारी तीन वाजेपर्यंत अशीच स्थिती होती. …

Read More »

‘निवडणूक’ ही विचारांची लढाई

जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताकडे पाहिले जाते. भारतीय निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था गेली 70 वर्षे भारतातील सर्व निवडणुका यशस्वीपणे पार पाडत आली आहे. यात केवळ यंत्रणेचा आणि मतदार संख्येचा बदल झाला आहे, मात्र आजही भारतातील प्रत्येक नागरिकाचा भारतीय सेना, न्यायालय आणि भारतीय निवडणुका यांच्यावर ठाम विश्वास आहे. …

Read More »

पवारांची गुगली

राजकीय बेधडक विधाने करून राजकारणात गुगली टाकण्याची कसब ज्येष्ठ नेते शरद पवार यांना चांगलीच अवगत आहे.आता सुद्धा त्यांनी पंतप्रधानपदासाठी कोण उमेदवार अपेक्षित आहे हे जाहीर करून महाआघाडीत नवा चर्चेचा वाद उत्पन्न केलेला आहे. त्यांच्या या विधानाचा काय अन्वयार्थ काढायचा हे प्रत्येकानेच ठरवणे उचित ठरेल. लोकसभेच्या चौथ्या टप्प्याचे मतदान सुरळीत पार …

Read More »

महाडमध्ये जयंती महोत्सव उत्साहात

महाड : प्रतिनिधी : वरंध बौद्धजन सेवा मंडळ आणि माता रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 128 वा जयंती महोत्सव नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिभूमीतला मी एक कार्यकर्ता असून विधानसभेत मी प्रतिनिधित्व करतो, याचा मला अभिमान आहे, असे प्रतिपादन आमदार …

Read More »

डॉ. आंबेडकर जयंती नागोठण्यात उत्साहात

नागोठणे : प्रतिनिधी : बौद्धजन पंचायत समिती नागोठणे विभाग शाखा क्रमांक 3 यांच्या विद्यमाने येथील शिवाजी चौकात शनिवारी (दि. 27) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शनिवारी सकाळी 9 वाजता बौद्धाचार्य किसन शिर्के, हेमंत जाधव, नितीन गायकवाड, मयूर गायकवाड, विलास कांबळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत …

Read More »

महामार्ग वाहनांनी फुलला

नागोठणे : प्रतिनिधी : चौथा शनिवार, तसेच रविवार आणि त्याला लागूनच सोमवारी लोकसभेच्या मतदानानिमित्त जाहीर करण्यात आलेली सुटी, याचा महामार्गावर परिणाम साधला असून मुंबई-गोवा महामार्ग वाहनांनी फुलून गेला आहे. कोकणाच्या बाजूकडे जाणारी बहुतांशी चार चाकी वाहने मुंबई, ठाणे, कल्याण, पालघर, पनवेल, नवी मुंबईचीच असल्याचे या वाहनांच्या क्रमांकांवरून स्पष्ट होत आहे. …

Read More »

अलिबागमध्ये स्वच्छता मोहीम

अलिबाग : रामप्रहर : स्वच्छतेमुळे पर्यावरण रक्षणाबरोबरच आरोग्य सुदृढ बनण्यास मदत मिळते. स्वच्छतेचा मंत्र सर्वांनीच जोपसला पाहिजे, असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या अलिबाग सेवा केंद्राच्या सहाय्यक संचालिका अंजू दिदी यांनी केले. प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय आणि रायगडचा युवक फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग शहरातील स्मशानभूमी समोरील फुल नगर झोपडपट्टी परिसरात स्वच्छता …

Read More »