चेन्नई : वृत्तसंस्था सांघिक खेळाचे शानदार प्रदर्शन केलेल्या बंगाल वॉरियर्सने पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या पटणा पायरेट्सचा 35-26 असा पराभव करून प्रो कबड्डी लीगमध्ये विजयी आगेकूच केली. या दमदार विजयासह बंगालने गुणतालिकेत 33 गुणांसह दुसर्या स्थानी झेप घेतली असून, पटणा संघ 17 गुणांसह तळाला आहे. पटणाने नऊ सामन्यांतून सहा पराभव पत्करले आहेत. …
Read More »Monthly Archives: August 2019
आगरदांडा, खोरा बंदरामुळे पर्यटनाला गती
भारतीय जनता पार्टीचे सरकार महाराष्ट्रात व केंद्रात विराजमान झाल्यापासून मुरूड तालुक्यातील तीन महत्त्वाच्या बंदरांना कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मिळाल्याने पर्यटक व स्थानिक नागरिकांना मोठी सुविधा मिळाली आहे. केंद्र शासनाच्या सेतू व वाडी जोड प्रकल्पांतर्गत मुरूड तालुक्यातील तीन बंदरांना मोठा निधी मिळाला व या भागाचा विकास होण्यास मोठी मदत झाली. भारतीय …
Read More »जल्लोश हवा, उन्माद नको
मुंबापुरीतील मराठी संस्कृतीचा दहीहंडी हा गणेशोत्सवाइतकाच ठळक घटक आहे. परंतु गेली काही वर्षे मात्र ट्रकमधून घोळक्याने जाणारे गोविंदा कालबाह्य व केविलवाणे दिसू लागले आहेत. इतर मंडळी आपापले कामाधंद्याचे दिनक्रम पार पाडण्यात मश्गुल असताना यांनी मात्र जिवाची जोखीम पत्करून दहीहंड्या फोडत शहरभर भटकायचे. उसने अवसान आणण्यासाठी प्रसंगी दारूचाही आधार घ्यायचा. या …
Read More »पनवेल ः चांगू काना ठाकूर विद्यालयात पूर्व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण जयंतीनिमित्त दहीहंडी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला.
Read More »आरोग्य संमेलनात श्री धूतपापेश्वर यांचे आरोग्य शिबिर
नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी येथे दि. 22 ते 25 ऑगस्ट दरम्यान‘वर्ल्ड आयुष एक्स्पो 2019’ हे भारतातील पहिल्या आयुष संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आयुर्वेद औषध उत्पादनात अग्रगण्य असलेली ‘श्री धूतपापेश्वर लिमिटेड’ या कंपनीने संमेलनाला भेट देणार्या सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. …
Read More »मोरू नारायण म्हात्रे विद्यालयात फुटली ‘चॉकलेट’हंडी
उलवे नोड ः रामप्रहर वृत्त मोरू नारायण म्हात्रे विद्यालय, उलवे नोड, पूर्व प्राथमिक शाखेत कृष्ण जन्माष्टमीनिमित्त चॉकलेट हंडी फोडण्यात आली. चिमुरड्या राधा-कृष्णने नृत्य सादर केले ’कृष्णा’ अॅनिमेटेड चित्रपटातील दहीहंडी दृश्य पाहताना विद्यार्थ्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. या प्रसंगी विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर, मुख्याध्यापिका नम्रता न्यूटन, सेकंडरी पर्यवेक्षक भरत जितेकर यांची …
Read More »प्रा. डॉ. संदीप घोडके यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
पनवेल ः रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील रहिवासी व रयत शिक्षण संस्थेत कार्यरत असलेले प्रा. डॉ. संदीप विलासराव घोडके यांना भारत सरकारच्या यूजीसी व नॅक यांच्याद्वारे मान्यता प्राप्त असा डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नावाने जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार बेंगलोरस्थित आयआयएसईआरमार्फत भव्य अशा कार्यक्रमात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. डॉ. संदीप विलासराव …
Read More »किसान मानधन योजनेचा लाभ घ्या ; तहसीलदार अमित सानप यांचे शेतकर्यांना आवाहन
पनवेल ः बातमीदार प्रधानमंत्री किसान मानधन योजना (पीएम-केएमडीवाय) संपूर्ण देशात सुरु करण्यात आली असून 18 ते 40 वयोगटातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी पात्र आहेत. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकर्यांनी लाभ घेण्याचे आवाहन पनवेलचे तहसीलदार अमित सानप यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक …
Read More »जि. प. सभेत दूषित पाणी पेटले
अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेची गुरुवारी (दि. 22) झालेली सर्वसाधारण सभा दूषित पाणीप्रश्नावरून गाजली. उमटे धरणातून गावागावांत वितरित होणार्या दूषित पाण्याच्या बाटल्या सभागृहात आणल्याने सभागृहातील वातावरण चांगलेच तापले होते. गणेशोत्सवापूर्वी जलशुध्दिकरण प्रकल्प कार्यान्वित करून पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देत अध्यक्षा आदिती तटकरे यांनी वेळ मारून नेली. नादुरुस्त पाणीपुरवठा योजनांचा आणि …
Read More »काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पुंडलिक पाटील भाजपत
कर्जत : बातमीदार काँगे्रसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेच्या अर्थ आणि बांधकाम समितीचे माजी सभापती पुंडलिक तथा बंधू पाटील यांनी नुकताच पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी भाजप नेते माजी मंत्री रविशेठ पाटील, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष किरण ठाकरे, हृषीकेश जोशी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper