रायगड जिल्हा हा शेकापचा बालेकिल्ला. या जिल्ह्यात लोकसभा, विधानसभा निवडणुका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शेकाप विरुद्ध काँग्रेस अशाच व्हायच्या. या जिल्ह्यात भाजपचा जिल्हा परिषद सदस्यदेखील निवडून येत नव्हता, परंतु 2019च्या विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यात भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर (पनवेल), रवी पाटील (पेण) हे दोन आमदार निवडून आले. अपक्ष म्हणून …
Read More »Monthly Archives: October 2019
शेतकर्यांना आधाराची गरज
राज्याच्या निरनिराळ्या भागांत ऐन दिवाळीच्या काळात शेतकर्यांच्या डोळ्यांत पाणी तरळले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्याने प्रशासकीय यंत्रणा नव्याने सरकार स्थापनेच्या औपचारिकतेकरिता खोळंबलेली आहे. दिवाळी हा खरे तर आनंदाचा, चैतन्य जागवणारा सण. महाराष्ट्रात या सणाला अगदी गोरगरिबांच्या दारी सुद्धा मिणमिळती का होईना पणती तेवताना दिसते. …
Read More »पनवेल रेल्वे स्टेशनवरील जिन्याचे काम थांबविण्याची मागणी
पनवेल : प्रतिनिधी पनवेल रेल्वे स्टेशनवर नवीन पनवेलकडे जाणारा जिना अरुंद असल्याने मोठा जिना बांधण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. हा जिना बांधताना कोणताही विचार न करता तो प्रवाशांना अडचणीचा आणि अपघाताला आमंत्रण देणारा ठरणार असल्याने तातडीने ते काम थांबवण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. मध्य रेल्वेच्या पनवेल स्टेशनच्या फलाट क्रमांक 1 …
Read More »अपुर्या पाणीपुरवठ्याबाबत त्वरित कार्यवाही व्हावी
खारघर : रामप्रहर वृत्त येथील अपुर्या व अनियमित पाणीपुरवठ्याबाबत भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी गुरुवारी (दि. 31) सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र दिले. या पत्रात त्यांनी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याबरोबर एक वर्षापूर्वी ऑक्टोबर 2018मध्ये झालेल्या बैठकीत चर्चिलेल्या मुद्द्यांवरील कार्यवाही कुठपर्यंत झाली आहे, याबाबत विचारणा केली. त्याचबरोबर पाणीपुरवठ्याबाबत …
Read More »अंकुर घरतला मानाची गदा
अलिबाग ः प्रतिनिधी अटीतटीच्या कुस्तीत एकचाक डावावर प्रतिस्पर्ध्याला असमान दाखवत टाकादेवी स्पोर्ट्स क्लबचा मल्ल अंकुर घरतने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत मानाची गदा पटकावली. सोलापूर जिल्ह्यातील मु. मेडद, ता. माळशिरस येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय कुस्ती मैदानात टाकादेवी स्पोर्ट्स क्लब, मांडवाचा पैलवान अंकुर अशोक घरत याने कोल्हापूरच्या सचिन पाटीलला पराभूत करून मानाची …
Read More »देवेंद्र फडणवीस भाजप गटनेतेपदी
मुंबई ः प्रतिनिधी भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बुधवारी (दि. 30) झालेल्या बैठकीत फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आली. निवड केल्याबद्दल फडणवीस यांनी सर्व आमदारांचे आणि नेत्यांचे आभार मानले, तसेच महायुतीचा निवडणुकीत विजय झाल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचेही आभार मानले. राज्यात पुन्हा …
Read More »सायकल प्रवासातून स्वच्छतेचा संदेश
दोघे करताहेत उरण ते उत्तराखंड प्रवास उरण : वार्ताहर गेल्या पाच वर्षांपासून देशात स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून अनेक सामाजिक संस्था, व्यक्ती यासाठी काम करीत आहेत. अशाच प्रकारे दोन जण सायकलवरून उरण ते उत्तराखंड असा सुमारे अडीच हजार किमी प्रवास करून स्वच्छतेचा संदेश …
Read More »शेतकरीराजा पुन्हा हरला भातशेतीचा जुगार!
पोलादपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून तयार झालेल्या भातपिकाची कापणी सुरू करतेवेळी भाताचे भारे लवकर सुकण्यासाठी ऑक्टोबर हिट असल्याने रस्त्यालगतच्या गवतावर टाकून उन्ह देण्याचा प्रयत्न शेतकर्यांकडून सुरू झाला, मात्र तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली अन् शेतकरीराजा पावसावर लावलेला कोकणातील भातशेतीचा जुगार सलग पाचव्या वर्षीदेखील हरला आहे. पोलादपूर तालुक्यात गेला महिनाभर ऑक्टोबर …
Read More »‘पीओके’ ताब्यात हवा
पोओके अर्थात पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. काल पाच मजुरांची हत्या झाली. शाळेवर गोळीबार झाला. पीओके ताब्यात आला तरच हे थांबेल. पीओके हा आपला अंतर्गत प्रश्न आहे, हे भारताने स्पष्ट सांगितले आहे आणि चीननेही त्यात मध्यस्थी करण्याची मागणी केली नाही. तो ताब्यात घेताना एक लक्षात ठेवले पाहिजे की तेथील …
Read More »चांभार्ली-मोहोपाडा रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी
मोहोपाडा : प्रतिनिधी दांड-रसायनी रस्त्यावरील चांभार्लींचा उतार हा जीवघेणा असून या रस्त्यावरून प्रवास करताना अनेकांना जीवाला मुकावे लागले आहे. या रस्त्याच्या उतारालगत दुकाने, कार्यालये आहेत. येथे नागरिकांची नेहमी रहदारी असते. शिवाय रस्त्यालगत शिवनगर वसाहत, एमआयडीसी वसाहत, जय प्रेसिजन कंपनी, एनआयएसएम सेबी प्रकल्प, शिशुविकास बालमंदिर, जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, प्रिआ …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper