Breaking News

Monthly Archives: October 2019

मुरूड तालुक्यात सरासरी 65 टक्के मतदान

मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील मतदान केंद्रावर सोमवारी सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुरूड तालुक्यातील सरासरी 60 टक्के मतदान झाले होते. मतदानाची वेळ संपेपर्यंत  मतदान 65 टक्क्यांवर जाईल, असा अंदाज निवडणूक अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, अलिबाग-मुरूड मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.34 टक्के मतदान झाले होते. मुरूड तालुक्यात सकाळपासूनच …

Read More »

पालीतील दोन मतदान केंद्रांवर ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनचा तांत्रिक घोळ

मशीन बंद पडल्याने मतदारांत गोंधळ व संभ्रम पाली : प्रतिनिधी विधानसभेच्या पेण मतदारसंघामधील पाली (ता. सुधागड) येथील दोन मतदान केंद्रांवर सोमवारी (दि. 21) तांत्रिक घोळ झाला. येथील ग. बा. वडेर हायस्कूल मतदान केंद्रामधील ईव्हीएम मशीन, तर राजीप उर्दू शाळा मतदान केंद्रातील व्हीव्हीपॅट मशीन  तांत्रिक कारणामुळे बंद पडल्या. त्यामुळे या दोन्ही …

Read More »

परतीच्या पावसाने मुरूडमध्ये भातशेतीचे नुकसान

मुरूड : प्रतिनिधी परतीचा पाऊस मुरूड तालुक्याला झोडपत असून, हातातोंडाशी आलेल्या भातपिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे तालुक्यातील बळीराजा अडचणीत आला आहे. मुरूड तालुक्यात सलग तीन दिवस कोसळणार्‍या पावसामुळे कापणी झालेली भात पिके वाया गेल्याचे चित्र समोर आले आहे. प्राथमिक अंदाजानुसार या परतीच्या पावसामुळे 15 ते 20 टक्के भातशेती बाधित …

Read More »

रायगड पोलीस दलातर्फे पोलीस हुतात्म्यांना आदरांजली

अलिबाग : प्रतिनिधी रायगड पोलीस दलातर्फे सोमवारी (दि. 21) पोलीस शहीद स्मारकास पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पचक्र अर्पण करून, तसेच मानवंदना देऊन पोलीस शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. पोलीस हुतात्मा दिनानिमित्त रायगड पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे पोलीस स्मृतिदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लडाखमधील भारताच्या सीमेवर …

Read More »

निवडणूक प्रशासनाने केली रुग्णवाहिकेची सोय

अलिबाग : जिमाका जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना सोमवारी अलिबागपासून 10 ते 20 किमीच्या परिसरातील मतदान केंद्रावर रुग्णवाहिकेद्वारे पोहचवून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल व नगरपालिकेच्या वतीने चार रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. सोमवारी दुपारपर्यंत …

Read More »

कर्जतमध्ये 101 वर्षीय आजीकडून मतदान

कर्जत : बातमीदार कर्जत विधानसभा मतदारसंघातील जिते येथील मतदान केंद्रावर सोमवारी (दि. 21) 101 वर्षीय आनंदीबाई बाळू गायकवाड यांनी  मतदानाचा हक्क बजावला. त्याचवेळी अपघातात दोन्ही पाय निकामी झालेले कशेळे येथील संजय दाभणे यांनीही मतदान केले.  जिते येथील आनंदीबाई बाळू गायकवाड यांनी आपला मुलगा मारुती यांच्यासह मतदान केंद्रात जाऊन मतदान केले. …

Read More »

निवडणुकीमुळे मुरूड बाजारपेठेत शुकशुकाट

सुटी असूनही पर्यटकांची पाठ मुरूड : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याठी सोमवारी शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच बँका आणि खासगी आस्थपनांना सुटी देण्यात आली होती. मतदानाला महत्त्व देत मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, सुटी असूनही मुरूड बाजारपेठेत शुकशुकाट होता. एरव्ही सुटीच्या दिवशी मोठ्या संख्येने येणार्‍या पर्यटकांनीही सोमवारी मुरूडकडे …

Read More »

तरुणांसह दिव्यांग व वृद्धांनी बजावला मतदानाचा अधिकार

सुधागड तालुक्यात दुपारपर्यंत 50 टक्के मतदान पाली : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी मतदान घेण्यात आले. पेण, सुधागड, रोहा मतदारसंघात सर्वत्र शांततेत मतदान झाले. सुधागड तालुक्यात दुपारी 4.15 वाजेपर्यंत 50 टक्के मतदान झाले होते. सुधागड तालुका प्रशासनाकडून मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक ती जय्यत तयारी करण्यात आली होती. तालुक्यात एकूण 80 केंद्रांवर …

Read More »

जिल्ह्यात उत्स्फूर्त मतदान

कर्जतमध्ये सखी मतदान केंद्रावर गर्दी; महिलांकडून सेल्फी कर्जत : बातमीदार कर्जत विधानसभा मतदारसंघात सोमवारी शांतपणे मतदान झाले. शहरातील शारदा मंदिर शाळेत उभारण्यात आलेल्या सखी मतदान केंद्रावर महिला मतदारांची मोठी गर्दी झाली होती. अनेक महिला मतदार येथे सेल्फी काढण्यात मग्न झाल्या होत्या. मतदारांना आकर्षित करण्यासाठी निवडणूक विभागाकडून काही मतदान केंद्रांवर सेल्फी …

Read More »

मतदान यंत्रे निघाली केंद्रांवर; आज मतदान

पनवेल ः विधानसभा निवडणुकीला सोमवारी (दि. 21) मतदान होत आहे. निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. रविवारी मतदान यंत्रे त्या-त्या मतदान केंद्रांवर पोहोचली. मतदान केंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठी खास एसटीच्या बसेस, खाजगी वाहने आरक्षित करण्यात आली होती. (छाया ः लक्ष्मण ठाकूर)

Read More »