पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाची विकासकामे पाहता विविध पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्याअंतर्गत पनवेल तालुक्यातील मोरबे आणि कानपोली येथील शेकापच्या अनेक कार्यकर्त्यांनी बुधवारी जाहीर पक्षप्रवेश केला. प्रवेशकर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षात स्वागत केले. पनवेल येथील माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी …
Read More »Monthly Archives: October 2019
वाजे, दुंदरे येथे शेकापला धक्का
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांतील नेते भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहेत. त्याअंतर्गत वाजे आणि दुंदरे येथील शेकापच्या अनेक पदाधिकर्यांनी कमळ हाती घेतल्याने ग्रामीण भागात शेतकरी कामगार पक्षाला लागलेली गळती कायम आहे. भारतीय जनता पार्टीच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या पक्ष प्रवेशावेळी शेतकरी कामगार पक्षाचे दुंदरे येथील …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत खारघरमध्ये पक्षप्रवेश
खारघर : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. त्याअंतर्गत खारघर विभागातील शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. हा सोहळा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये मंगळवारी (दि. 1) झाला. खारघर येथील रामशेठ …
Read More »पनवेलमध्ये भाजपचा प्रवेशोत्सव; देवद, पनवेल येथे पक्षप्रवेश
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश करणार्यांचा ओघ कायम आहे. त्याअंतर्गत देवद आणि पनवेलमधील शेकापच्या अनेक पदाधिकार्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केल्याने भाजपची ताकद आणखीणच वाढली आहे. हा पक्षप्रवेश सोहळा भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. 1) झाला. भाजपच्या पनवेल येथील …
Read More »अंजुमन इस्लाम महाविद्यालयात प्लास्टिकमुक्तीसाठी शपथ
मुरूड : प्रतिनिधी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून येथील अंजुमन इस्लाम जंजिरा महाविद्यालयात बुधवारी (दि. 2) प्लास्टिकमुक्त भारताची शपथ ग्रहण करण्यात आली, तसेच महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व डीएलएलई विभागातर्फे कागदी व कापडी पिशव्या बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. सुरुवातीला महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ‘प्लास्टिकमुक्त …
Read More »नेरळमध्ये पिंपळ वृक्षांची लागवड
कर्जत : बातमीदार महात्मा गांधी जयंतीनिमित्त बुधवारी (दि. 2) नेरळमधील हुतात्मा स्मारक परिसरात वन विभागाच्या वतीने पिंपळ झाडाच्या रोपांची लागवड करण्यात आली. यावर्षी राज्यात वन विभागाने 33 कोटी वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. या उद्दिष्ट्यपूर्तीची आठवण राहावी म्हणून वन विभागाने महात्मा गांधी जयंतीदिनी पिंपळ वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय घेतला होता. …
Read More »बिबट्याच्या कातडीसह सात आरोपी जेरबंद
Exif_JPEG_420 नागोठणे : प्रतिनिधी बिबट्याचे कातडे घेऊन जाणार्या सात जणांना पनवेलचे संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन पथक आणि नागोठण्यातील वन विभागाच्या पथकाने कातडे आणि तीन दुचाकींसह मंगळवारी (दि. 1) सायंकाळी उशिरा ताब्यात घेतले. आरोपींना बुधवारी (दि. 2) दुपारी रोह्याच्या प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता, सातही जणांना तीन दिवस वन कोठडीत …
Read More »कार्यकर्त्यांनो, कामाला लागा -रविशेठ पाटील
नागोठण्यात प्रचार कार्यालयाचे उद्घाटन नागोठणे : प्रतिनिधी सन 1995पासून मी निवडणूक लढवत असून, नागोठणे विभागाने मला कायमच सहकार्य केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पूर्ण करीत पेण मतदारसंघातून मला उमेदवारी दिली असून, कार्यकर्त्यांनी जोमाने प्रचाराच्या कामाला लागावे, असे आवाहन महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांनी येथे केले. भाजपचे नेते, …
Read More »जागतिक आदर्श
स्वच्छ भारत अभियानाचे सर्वात मोठे योगदान हे आहे की याचा सर्वाधिक लाभ गोरगरीबांना व महिलांना मिळतो आहे. शौचालयांच्या अभावी गावोगावी महिलांची अवस्था अतिशय वाईट होती. खेड्यापाड्यातील शाळांमध्ये शौचालयाची सोय नसल्याने कित्येकदा मुलींना शाळेत जाणे थांबवावे लागत होते. महिला व मुलींना या दुर्दैवी स्थितीतून बाहेर काढण्याचे मोलाचे काम मोदी सरकारने केले …
Read More »प्लास्टिकमुक्त खोपोलीसाठी पालिका सरसावली
खोपोली : प्रतिनिधी स्वच्छ भारत अभियानांतर्गत खोपोली नगरपालिकेने प्लास्टिकमुक्त खोपोलीसाठी कंबर कसली आहे. यासाठी मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी प्लास्टिक संकलनासाठी तीन केंद्रे उभारली. खोपोली गावात दीपक हॉटेल चौक, एसटी बस डेपो, तसेच शिळफाटा येथील रमाकांत हॉटेलसमोर अशी ही केंद्रे प्लास्टिक संकलन करतील. यासाठी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper