Breaking News

Yearly Archives: 2019

महाड आगारात दुरुस्ती पथक वाहन दाखल

महाड : प्रतिनिधी एसटीच्या महाड आगाराच्या ताफ्यात आणखी एक सुविधा प्राप्त झाली आहे. नुकताच आगारात दुरुस्ती पथक वाहन दाखल झाले आहे. त्यामुळे एसटी बस कुठेही बंद पडली तर तत्काळ त्याठिकाणी हे दुरुस्ती पथक वाहन दाखल होणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील अत्यंत महत्वाचे आणि मध्यवर्ती ठिकाण असलेल्या महाड एसटी आगारात दाखल झालेल्या …

Read More »

श्रीरंग बारणेंना 50 हजारांचे मताधिक्य मिळवून देऊ

आमदार बाळा भेगडे यांची ग्वाही खोपोली : प्रतिनिधी खासदार श्रीरंग बारणे हे जनसामान्यांना सहज उपलब्ध होणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांची जनमानसात मनमिळाऊ नेता अशी प्रतिमा आहे. त्यांच्याकडे कामाची निष्ठा असल्याने तेच पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून येणार आहेत, असा विश्वास व्यक्त करुन बारणे यांना मावळ तालुक्यातून 50 हजार मतांची आघाडी मिळवून …

Read More »

खारघरमध्ये आज कर्करोग जागरूकता चर्चासत्र

पनवेल : कर्करोगाविषयी लोकांत जागरूकता निर्माण करण्यासाठी धन्वंतरी आरोग्यदूत सेवा संस्थेच्या वतीने खारघरमध्ये बुधवारी (दि. 3) चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये एशियन कॅन्सर हॉस्पिटलच्या डॉ. निशा नायर मार्गदर्शन करणार आहेत. या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे. 1 ते 7 एप्रिल हा …

Read More »

पालकांनो, आपल्या मुलांचा कल जाणून घ्या

पालक म्हणून त्यांना आपल्या मुलांना सोडून द्यायचंय मुक्तपणे अवकाशात विहारायला, पण भीती आहे पोकळीत हरवण्याची. मिठीत घट्ट धरून प्रेम व्यक्त करायचंय, पण भीती वाटते त्याच्या गुदमरण्याची. मुलांनी खूप खूप मोठं व्हावं असं वाटतंय कारण भीती आहे समाजाच्या विचारांतील खुजेपणाची.म्हणूनच पालकांची बर्‍याचदा मला विचारणा होते, कोणतं बोर्ड चांगलं? डडउ, उइडए की …

Read More »

परदेशात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

पनवेल : बातमीदार परदेशात नोकरीला लावतो, असे सांगून एका 23 वर्षीय तरुणाकडून दोन लाख रुपये घेऊन त्याची फसवणूक करण्यात आली असल्याचा प्रकार खारघर येथे घडला आहे. आरोपीविरोधात खारघर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. शिवराज घोटने (23) याचे शिक्षण बारावीपर्यंत झाले असून, तो नोकरीच्या शोधात होता. नोकरीच्या शोधात असताना त्याची …

Read More »

बेवारस वाहनांबाबत पोलिसांचे आवाहन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील सीबीडी पोलीस ठाणे यांच्या आवारात मोटार अपघातातील दुचाकी वाहने जमा असून, वाहन मालकांना वारंवार कळवूनदेखील ही वाहने अद्याप पोलीस ठाण्यात पडून आहेत. संबंधित वाहने ज्या व्यक्तीच्या मालकीची असतील त्यांनी तत्काळ सीबीडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून ताब्यात घ्यावीत; अन्यथा त्याचा लिलाव करण्यात येऊन येणारी …

Read More »

हवामान बदलाचे आव्हान

देशभरात 60 हजार पेट्रोल पंप उभारण्यास आपल्याला 70 वर्षे लागली आणि आता देशात इलेक्ट्रिक वाहनांना आवश्यक अशी व्यवस्था उभारण्यासाठी अधिकच वेळ लागेल. कारण इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग करिता सुमारे पाच लाख चार्जिंग स्टेशन्स उभारावी लागतील. हवामान बदल हे मानवतेसमोरील आजचे सर्वाधिक मोठे आव्हान असून निसर्गाशी सूर जुळवून घेत जगणे हा त्यावरील …

Read More »

लोकसभा निवडणूक : सहा जण तडीपार, 180 शस्त्रे जमा

पनवेल : बातमीदार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील परवानाधारक शस्त्र जमा करण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे. निवडणुकीदरम्यान बळ, पैसा, आमिष यांचा वापर होणार नाही याकडे प्रशासनाला लक्ष पुरवावे लागते. त्यामुळे निवडणूक जाहीर होताच परवानाधारक शस्त्र जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 2मधून सहा जणांवर तडीपारीची …

Read More »

‘त्या’ खुनी आरोपींना शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हान

पनवेेल : वार्ताहर पनवेलजवळील पळस्पे ते जेएनपीटी या एनएच 4 बी महामार्गावर डोंबाळे कॉलेजसमोर असलेल्या पुलाखाली 15 दिवसांपूर्वी एका इसमाचा अज्ञात कारणावरून अज्ञात आरोपींनी खून केला होता. या खुनाचा अद्यापही उलगडा न झाल्याने पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विनोेद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक (गुन्हे) निशिकांत विश्वकार व त्यांची पथके …

Read More »

हातभट्टीवर पोलिसांची धाड पाणदिवे येथून गावठी दारूचे साहित्य हस्तगत

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील पाणदिवे येथील पूर्वेकडील जंगलात गावठी दारूच्या हातभट्टीवर उरण पोलिसांनी धाड टाकली असून, हातभट्टीची गावठी दारू निर्मिती करणार्‍या साहित्यासह हजारो रुपये किमतीचे द्रावण जप्त करण्यात आले आहे, मात्र हातभट्टीची दारू तयार करणारे दोन आरोपी फरार झाले आहेत. उरण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्याच्या पूर्व विभागातील पाणदिवे येथील …

Read More »